नवीन लेखन...

झिम्मा

पिझ्झा बेकतो, वास सुटतो मुंबईचा राजा डिस्को खेळतो रोल रोल रोल रॉक अॅण्ड रोल जाझच्या तालावर सांभाळा तोल सर सर गोविंदा येतो मजवरी चिखल फेकीतो या या होंडावरती या आमचा नखरा पहा पहा सलवार कमीज बॉयकट वेण्यांची नको कटकट आमच्या वेण्या कोठल्या फॅशनसाठी छाटल्या गौरी बसली नाह्याला हॅलो शांपू लावियला शांपू झाला फेसच फेस गौरीचे झाले […]

सासू सून संवाद (३)

सासू : अगं अगं सूनबाई सून : काय म्हणता सासूबाई? सासू : माझा गाऊन तू, काय गं केला ? सून : भांडीवाल्या बाईच्या मुलीला दिला. सासू : अगं अगं सून बाई सून : काय म्हणता सासूबाई? सासू : माझं घड्याळ तू, पाहिलेस का गं ? सून : चुन्याची डबी रोज जातं मागं. सासू : अगं अगं […]

क्लिष्ट ईश्वरी मार्ग

संसारातील ऐहिक सुखे,  धडपडीने मिळवीत असे प्रयत्नातील आनंद खरा,  भोगण्यांत तो दिसत नसे…१, उबग येई ह्याच सुखाची,  जीवन खर्चीले ज्या करितां त्या सुखांत समाधान नव्हते,  जाणवले तेच मिळतां…२, प्रभू मिलनाचा आनंद तो,  चिरंतर ते समाधान देयी ईश्वरी मार्ग खडतर असूनी,  क्लिष्टता येते मनाचे ठायीं..३, तसेच चाला उबग सोसूनी,  कठीण अशा त्या मार्गावरती यश येईल कष्टाचे परि, […]

श्रद्धांजलि ।

सुळीं दिले येशूला   वेडेपणाच्या भरांत खिळे ठोकले अंगाला   रागाच्या ओघांत   ।।१।। समर्पण केले देहाचे   परि न सोडी ध्येय बलिदानाच्या मार्गाचे   हेच महत्व होय   ।।२।। सुळावरी तो जातांना   वदला आकाशी बघूनी क्षमा कर प्रभू त्यांना    ते आहेत अज्ञानी   ।।३।। कळले नाहीं ज्ञान   अज्ञान सागरांत जाणले तत्वज्ञान    उशीर केला त्यांत   ।।४।। उपयोग नाही आतां   वेळ गेली निघूनी जाण […]

विहीण

माझ्या विहीणाई बाई तुम्हा बहीण मानते जपली जी अमानत तुम्हा हाती सोपवते द्यावी मायेची सावली पुन्हा पुन्हा विनवते कधी सोसलेना तिने उन्हातान्हाचे चटके तिच्या सोनपावलांची दारी उमटली नक्षी आनंदाने भारारला गगनात तेव्हां पक्षी अशी अंगणी खेळता कधी झाली पहा मोठी अजूनही सान बाळी तिच्या बाबा दादासाठी कन्या परक्याचे धन किती सांगू या मनाला हृदयाच्या हुंदक्याला आता […]

भाव जाण तू देवा

कर पडले चरणीं भाव जाण तू देवा   ।।धृ।।   देह झुकला तुझ्या पुढती लिनतेनें मान वाकती मनाची करूनी एकाग्रता भावनेला वाट देतां अश्रू दाटले नयनी  अंतरीचा दिसे ओलावा    १ कर पडले चरणी   भाव जाण तू देवा,   प्रथम येई भावना, जागृत करते ती मनां मनाचा ताबा देहावरी तोच तुजला प्रणाम करी घे प्रभू तू जाणूनी   अत:करणातील […]

भोंडला (सेलचा) (८)

अरडी ग बाई, परडी रस्त्यावरती गर्दी ही गर्दी कशाची ही गर्दी सेलची चला चला मैत्रिणींनो सेलला स्वस्त्यात कपडे आणायला स्वस्त्यात साड्या आणायला सुधाताई मंदाताई आणायला दुकानदाराची चलाखी ८०० ची साडी ५०० ला ५०० चा ड्रेस ३०० ला चला चला मैत्रिणींनो सेलला स्वस्त्यात कपडे आणायला स्वस्त्यात साड्या आणल्या घरी नेऊन पाहिल्या ड्रेसचा रंग झला फिका वाया गेला […]

नाच ग घुमा (२)

नाच ग घुमा नाच ग घुमा कशी मी नाचू ह्या गावचा त्या गावचा ऑर्केस्ट्रा नाही आला रिदम नाही मला कशी मी नाचू ह्या कोपर्‍यावरचा त्या कोपर्‍यावरचा टेलर नाही खुला नवा ड्रेस नाही मला कशी मी नाचू ह्या रोडचा त्या रोडचा पार्लर नाही खुला मेकप नाही मला कशी मी नाचू ह्या गावचा त्या गावचा शूमार्ट नाही खुला […]

भोंडले (४)

ब्लॉकचे पैसे भर ग मुली भर ग मुली मग जा आपल्या सासरला सासरला ब्लॉकचे पैसे भरले ग आई भरले गं आई आता तरी जाऊ का सासरला सासरला ब्लॉक ताब्यात घे ग मुली घे ग मुली मग जा आपल्या सासरला सासरला ब्लॉक ताब्यात आला ग आई आला ग आई आता तरी जाऊ का सासरला सासरला ब्लॉकची सजावट […]

वेळेची किमया

वेळ येता उकलन होते,   साऱ्या प्रश्नांची जाणून घ्या हो थोडे तुम्ही,  रीत निसर्गाची…१, जेंव्हां तुम्हाला यश ना मिळते, एखाद्या प्रश्नी, वेळ नसे योग्य आली,  हेच घ्यावे जाणूनी…२, प्रयत्न सारे चालूं ठेवतां,  यश ना मिळे कांहीं काळासाठी थांबवा,  प्रयत्न सगळे…३, काळ लोटतां प्रयत्न होती,  पुनरपि सारे, उकलन होवून गुंत्यांची,  आख्खे निघती दोरे…४, कुणी म्हणती ग्रह अनूकुल,  ह्या […]

1 252 253 254 255 256 434
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..