नवीन लेखन...

पंढरीच्या विठुराया

पंढरीच्या विठुराया, आता उचल झडकरी, काय ठेविले या दुनियेत, वाट बघ मृत्यूची पाही,–!!! चिंता, काळज्या, ताण, जीवन का घेरलेले, दिसत नाही कुठेही, सुखाचे आभाळ भरलेले,–!!! कोण म्हणतो मृत्यु भयानक, तो तर हरीचा दूत असे, समस्या आणि अडचणी, यातून मुक्ती देत असे,–!!! मज मोक्ष नको, स्वर्ग नको, हवी आहे सुटका फक्त, जिवाचा पक्षी अडकला, उघड पिंजरा कर […]

गायिका गाऊ लागे

गायिका गाऊ लागे , शास्त्रीय गान ते “सुस्वर”, रसिकश्रोते स्तंभित, लुब्ध” होती गानावर, नाद ताल स्वर , आलापी अंतरे मुखडे, रसिकांच्या दुनियेत, रोमांच “अंगावर खडे, स्वरा–स्वरांचे तरंग, काळजाला हात घालती, स्वर्गीय सुरांची पकड, सगळेच तिला वश होती, संगीताची दुनियाच न्यारी, रसिकांना “खिळवून” ठेवे, ब्रह्मानंदी लागता टाळी बुडणे त्या स्वरसमुद्री, परमानंद”” देई संगीत, दुःखे सगळी विसरती, अशा […]

अनुभवाचे शहाणपण

बदलून गेले जीवन   अर्थ कळल्यानंतर परिस्थितीची आली जाण   जाग आल्या नंतर  ।।१।। श्रीमंतीच्या नादानें   ऐषआरामी झालो पैशाच्या गर्वाने   माणुसकी विसरलो   ।।२।। तारुण्यातील उर्मीने   अहंकारी बनविले शरिरातील गुर्मीने   निर्दयी मज ठरविले   ।।३।। धंद्यामध्ये येता खोट   निराश अति झालो गरिबीची चालतां वाट   प्रेमळ मी बनलो   ।।४।। देह बनला दुर्बल   विकार तो जडूनी जर्जर- पिडीतां बद्दल   सहानुभूती आली मनी   […]

मातृभू तुझ्या करता

मातृभू तुझ्या करता, सर्वस्वाचे देतो दान, रक्षणासाठी केवळ तुझ्या, सज्ज माझे पंचप्राण,—!!! कितीतरी बघ आजवर, झाले तुझसाठी अर्पित, बिमोड करून शत्रूचा, निनाद तुझा गर्जत,—!!! भारत माते तुझी माती, आम्हा प्रिय प्राणाहून,— “पाईक” आहोत तुझे आम्ही, त्रिवार वंदन तुजसी करुन—!!! वाचवू आम्ही तुला, करुन जिवाची कुरवंडी, तीच खरी तुझी सेवा, बांधल्या आम्ही खुणगाठी,—!!! हिम्मत जर कोणी, करेल […]

मदमस्त तारुण्य बहर

मदमस्त तारुण्य बहर, पाहून कसा मी, जागच्या जागी थिजलो, दया कर जराशी, तुला पाहुनी अचानक, बर्फासारखा विरघळलो,–!!! सुवर्णचंपकी कांती तुझी, चाफेकळीगत नाक, भिरभिरणारे टपोरे नेत्र, अन लाल कपोती गाल, –!!! भुरभुरणारे केस उडती, कसे वाऱ्यावरती, जसा सुगंधच होतो, येणाऱ्या झुळकेवर स्वार,–!!! धडधडणारे उरोज पाहून, पुरता मी ढांसळलो, लटपट चालीने त्या, एकदम गांगरुन गेलो,–!!! शब्द “मंजुळ” किती, […]

तू असा, तू कसा,

तू असा, तू कसा, कोसळता धबधबा जसा, अखंड जलप्रवाहाची जादू, ओघ खळाळता जसा,—!!! तू असा, तू कसा, वावटळीचे वादळ जसा, दाही दिशांना कवेत घेऊ, पाहणारे थैमान’च जसा, तू असा, तू कसा, भडकता ज्वालामुखी संतापाचा डोंह उसळता, आगीचा डोंब जसा,–!!! तू असा, तू कसा, दरीइतका खोल जसा, आंत आंत डोकावता, गहिरा गहिरा गूढ जसा, तू असा, तू […]

यातना आणि वेदना

यातना आणि वेदना, जीवन दुसरे असते काय, भोग आणि उपभोग, असे त्याचे दोन पाय ,,–!!! स्वार्थ अन् भांडण, हेच त्याचे अवयव, कधीकधी फक्त कींव, कधीकधी चांगुलपण, ,–!!! दया करुणा उपकार, सारेच जीवन विसरले, म्हणूनच आज सगळ्यांना, जीव न-कोसे करणारे,–!!! समस्या अडचणी यांचा, त्याभोवती घेराव , कसे कुणाला ठाऊक, करेल कधी संपूर्ण पाडांव,–!!! असेना का तरीही, त्यातच […]

शोधूं कोठें त्यास ?

शोधत होतो रुप प्रभूचे,   एक चित्त लावूनी  । अवंती भवंती नजर फिरवी,   श्वास रोखूनी  ।।१।। शांत झाले चंचल चित्त,   शांत झाला श्वास  । ह्रदयनाडी मंद होऊनी,   चाले सावकाश  ।। २।। पचन शक्ती  हलकी झाली,   जठराग्नीची  । शिथील झाली गात्रे सारी,   देह चैतन्याची  ।।३।। देहक्रियांतील प्राणबिंदू ,  असे ईश्वर  । समरस होतां त्याच शक्तिशीं,   होई स्थिर  ।। […]

तुझे तुलाच अर्पण !

तुझेच घेऊनी तुलाच द्यावे,  भासते ही रीत आगळी  । उमजत नाही काय करावे,  तुझीच असतां सृष्टी सगळी  ।।१।। वाहणाऱ्या संथ नदीतील,  पाणी घेऊन अर्घ्य देतो । सुंदर फुले निसर्गातील,  गोळा करुन चरणी अर्पितो ।।२।। अन्न ग्रहण करण्यापूर्वी,  नैवेद्य तुजला दाखवितो । जगण्याचा तो मार्ग दोखवी,  ह्याचीच पोंच आम्ही देतो ।।३।। विचार ठेवूनी पदोपदीं,  साऱ्यांचा तूं असशी […]

ज्ञानाग्नि पेटवा

हातातील काडी    घासतां  पेटीवरी अग्नि त्याच्यातील   ज्वाला त्या धरी लपलेला अग्नि     घर्षणाने पेटतो अज्ञान झटकता    ज्ञानी उजाळतो चितांत असतो     प्रभू सदैव शांत ओळखण्या त्यासी   लागताती संत संत हाच गुरु        मार्गदर्शक असे चित्तातील प्रभूला     जागवित असे उजळण्या मन   घर्षण लागे संताचे पेटवा ज्ञानाग्नि     सार्थक होई जीवनाचे — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

1 233 234 235 236 237 434
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..