नवीन लेखन...

कुठून आलो, कुठे निघालो

कुठून आलो, कुठे निघालो,– कळिकाळाचे पांथस्थ,– मार्ग दिसो न उमजो, राहावे लागे तटस्थ,–!!! जन्मप्रसंगी बाळाच्या, आईला होती प्रसववेदना, कोणास ठाऊक म्हणे त्या, कोणाच्यातरी मरणयातना,—!!! सुखाच्या लागता मागे, मोहमयी खेळ चाले, ठरती बघतां बघतां ते, मायेचे किमयागार सारे,—!!! आभास दिसती सुखाचे, जो तो त्यासाठी तडफडे, हव्यास ठेवून असे, पदरात शेवटी काय पडे,—!!! सौंदर्य पाहुनी वरवरचे, जो तो […]

दुःख विसर बुद्धी

कसे मानू उपकार, देवा तुझे देऊन बुद्धि विसर, करी कल्याण माझे ।।१।। खेळ आहे जेथें, हार जीत आहे घर बांधणीते, पड झड पाहे ।।२।। असे जन्ममरण, ह्याच देहीं हेच असतां जीवन, सुख दुःखे पाही ।।३।। एक दुःख येतां, मन होई निराश काळ पुढे जाता, विसरे ते सावकाश ।।४।। एका दुःखाचा चटका, दग्ध करी मनां जमता दुःखे […]

सखया तुझ्याचसाठी

सखया तुझ्याचसाठी, मन माझे अंथरले, पायरवाने रे तुझ्या, हर्षभरित ते जाहले, सखया तुझ्याचसाठी, डोळ्यात दिवे लावले, पंचप्राणांच्या ज्योतींनीं, मनोमन तुझं ओवाळले, सख्या तुझ्याचसाठी, हृदयाचे सिंहासन केले, विराजमानी त्यावर तुला, स्वप्न डोळा पाहिले, सख्या तुझ्याचसाठी, ओठी गीत स्फुरले, शब्दांचे हार करुनी, फक्त तुज अर्पियले, सखया तुझ्याचसाठी, चित्ती उगा थरारले, नवथर भावना कल्लोळी, रात्रंदिन बघ हिंदोळले, सखया तुझ्याचसाठी, […]

क्षितिजी आभाळ टेकलेले

क्षितिजी आभाळ टेकलेले, विस्तीर्ण असूनही झुकलेले, आहे केवढे मोठे तरीही, नतमस्तक होऊन वाकलेले, झाड आहे बहरलेले, पाना फुलांनी लगडलेले, अंगोपांगी त्याच्या भरलेले, पण तरीही संन्यस्तपणाने, सदैव कसे झुकलेले, फांदी फांदी फुललेली, असंख्य जागी डंवरलेली, फळाफुलांनी वाकलेली तरीही लीन झालेली, पिकले फळ झुकलेले, गोड–गोड मऊ झालेले, फांदीला खाली लागलेले, समर्पित, आयुष्य केलेले,-! आभाळी ढग भरलेले, नवसंजीवने ओथंबलेले, […]

तूच माझा चंद्र

तूच माझा चंद्र, अन् तूच चांदण्यांची संगत, तुझ्याशिवाय प्रीतीला रे, येईल का पुन्हा रंगत, रात्र आहे चमचमती, हवेत सुटला गारवा ,— तुझ्यावाचून फुलत नाही, येथील रातराणीचा ताटवा, रात्र असे देखणी,– हर एक चांदणी भाळते, निकट जाण्या चंद्राच्या, त्यांच्यातच होड लागते, इथे धरेवर मी, तुझ्यासाठी तरसते, तुझ्या नावाचा चंद्र , माझ्या भाळी रेखिते, विरहार्त समुद्री,अशा सदैव माझे […]

लाटांवर लाटा उसळत

लाटांवर लाटा उसळत, तयार होते भिंत, अगणित थेंबांच्या रेषा, अशा, कोसळती अविरत, थ सोनसळीप्रकाश त्यावरी त्यांच्यावरी बघा खेळतो, जलथेंबांचे अखंड नाच, पाहुनी तो चमचमतो, खालवर जाऊन पाण्यात, जादूगार तो किमयाकरे रंग सोनेरी हिरवे निळे, जांभळे पांढरे त्यात पसरे, लाटांची खळबळ ऐकून, हसे तटस्थ तो किनारा, चलबिचल”त्यांचीपाहत राही विस्तीर्ण दूरवर पसरलेला,-! लाटांचे चढउतार चालू, एक दुसरीवरी उसळे, […]

संस्कारा प्रमाणे

समान बल ते असतां समोर, टक्कर त्याची होई सबळ दुर्बल ह्यांचा संघर्ष,  टळत नेहमी जाई….१, मर्दूमकीचा विचार ठेवूनी,  मैदानी उतरी त्याच स्थरावर सारे घडते,  मुरले जे शरिरी….२, ज्ञानी लढतो ज्ञानी जनाशी, वाद-विवाद करूनी हात घाईची सिमा परि,  तो टाळी विचारांनी…..३, मस्तावले शरिर असतां,  धक्का-बुक्की होते देहामधली जमली शक्ती,  बाह्य मार्ग शोधते….४, दिसून येतो ऊर्जा वापर,  देह […]

तू नावाचे तूफाsssन

तू नावाचे तूफाsssन , मी कसे पेलावे,— वाऱ्याचा अखंड स्त्रोत, सुसाटपणात वाहून जावे,— नुसता वारा कसला वादळच, त्यात भरकटत जावे,-? होत्याचे नव्हते करत, कितीदा तुला मी पेलावे, तू तर कोसळती उल्का, पतन किती जोरात तुझे, ओंजळ माझी चिमुकली, सांग कसे हाती धरावे,—!!! विलक्षण स्वैर प्रभावाने , जिथे तिथे वागशी, –!!! तुझ्या चमकत्या हुशारीने, बरेच जण पडती […]

ऋतूचे चक्र आणि मन

कडाक्याची थंडी, दात कुडकडुती, हात-पाय गार, काटे अंगी येती नकोसा वाटतो,  मजला हिवाळा, वाट मी बघतो,  येण्या तो उन्हाळा सुकूनची जाते,  हिरवे ते रान शरिर राहते,  घाम निथळून लाही लाही होता,  त्रस्त होई जीव, शोधण्या ते ढग,  मन घेई धाव थांबवितो कामे,  वादळी तो वारा, पर्जन्याचा मारा,  पडताती गारा पाणी चहूकडे,  वाटते सुकावे, वर्षा ती जावूनी, […]

देशासाठी वीरमरण ते

देशासाठी वीरमरण ते, भाग्यवान” किती तुम्ही, कितीदा मागावे मरण असे, मिळत नाही “जन्मोजन्मी,” –!!! भारत मातेची सेवा” करता, देह तुम्ही हो ठेवला, — देशसेवा करता करता, पाईकांनी कसा बळी दिला,–!!! अगदी पुण्यकर्म हे ठरे, असा मृत्यू तुमच्या नशिबी, नेताना तुम्हाला तोही घाबरे, पडलात ना देशाकारणी,–!!! ज्या मातीत खेळलो,वाढलो, तिचे केले रक्षण तुम्ही,– आईला पूजताना शेवट, कुडी […]

1 230 231 232 233 234 434
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..