एकाग्रतेने जगा

जगण्या झाले कठीण क्षण, अन्यायाने सीमा गाठली । चक्र आहे दैव गतीचे, समजूत कुणीतरी मना घातली  ।।   जीवन मार्ग सरळ असता, फेरे पडती नशीबाचे  । अनेक वाटा दिसून येता, भटकणे मग होई जीवाचे  ।।   विसरूनी जातो मार्ग आपला, तंद्रीमध्ये भटकत असता  । बोलफूकाचे देत राही, नशीब दैव म्हणता म्हणता  ।।   असंख्य वाटा अनेक […]

सिकंदरची शांतता

दिग्वीजयाच्या स्वारीवरती,  निघे सिकंदर सैन्य घेवूनी जग जिंकण्या ध्येय मनाशीं,  महान आशा उरी बाळगूनी आश्वा रुढ ते सैनिक सारे,  सिकंदराच्या मागें धावती लगाम खेचूनी वृक्षा पाशीं,  एक साधू तो बघूनी थांवती पृच्छां करितां साधू म्हणाला,  शांत चित्त तो बसला असे मिळविण्यास ते कांहीं नसतां,  शोध प्रभूचा घेत दिसे सिकंदर वदे देश जिंकूनी,  संपत्ती घेई लुटून सारी […]

ग्रह परिणाम

वळून बघता पूर्व आयुष्यी, प्रखरतेने हेची जाणले घडले नाही कधीही ते ते, हवे असूनी मनी योजीले….१ सभोवतालची देखूनी स्थिती, आखती योजना कल्पकतेने खेळामधली चाल नियतीची, ध्यानी न येते दुर्दैवाने…..२ मार्ग तिचे ठरले असूनी, बांधलेले इतर जीवांशी अपूर्व योजना निसर्गाची, कळेल कुणाला सहज कशी….३ जाळीतल्या धाग्याची टोके, गुंतली असती ग्रह गोलाशी फिरता फिरता खेच पडे, वा ढीली […]

परावलंबी

जीवन हर घडिला अवलंबूनी, आहे दूजावरी व्यर्थ मग कां अभिमान, बाळगतोस उरी नऊ मास होता गर्भामध्यें, जेंव्हा आईच्या शोषण केले अन्न सारे, रक्तामधूनी तीच्या माता पित्याच्या कष्टाचा तो, घाम गळत होता तुझे बालपण फुलविण्या,  ओलावा देत होता घर गृहस्थीचे सुख भोवतीं,  पत्नी मुला पासूनी समाधान ते मिळतां तुजला, गेला बहरुनी वृद्धत्वाला काठी लागतें, स्थिरावण्या तोल सदा […]

कोण आहेस तूं कृष्णा ?

सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा  ? ।।धृ।। जीवन तूझे ‘बहूरंगी’ सर्व क्षेत्री अग्रभागीं आवडतोस तूं सर्वाना   ।।१।। सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा  ? दहीं दूध खाई लपून तूप लोणी नेई पळवून ‘खादाड’ वाटलास सर्वांना   ।।२।। सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा  ? फळे चोरली बागेमधली गोपींची शिदोरी नेली ‘चोर’ वाटलास सर्वांना   […]

असावा सुंदर पापलेटचा बंगला

असावा सुन्दर पापलेटचा बंगला चंदेरी रुपेरी सुरमईचा चांगला पापलेट्च्या बंगल्याला सारंग्याचे दार धारदार डेग्याच्या कुर्ल्या पहरेदार   दोन कोळंब्याच्या खिड्क्या दोन हॅलो हॅलो करायला लॉबस्टरचा फोन मांदेल्याचा सोनेरी रंग छानदार बांगड्यांना अंगभर खवले फार फार   बंगल्याच्या छतात कालवा रहातो शिंपल्यातल्या तिसर्यांशी लपाछपी खेळतो लांब लांब करल्यांचा नाच रंगला बोंबिलाचा मासा मस्त चांगला   किती किती […]

पानिपत

आपापल्या महालात तुम्ही सर्वेसर्वा असता, मग तुम्ही पेशवे असा किंवा हुजरे सरदार असा किंवा शिलेदार. बाहेर पडल्यावर मात्र तुम्ही बनता जगातील कुणीतरी, लहानमोठे. कुणापुढे तरी तुम्हाला झुकावं लागतं . पण , आणखी कुणाला तरी तुम्ही स्वत:पुढे वाकायला लावता . आणि त्यामुळे , फक्त त्यामुळेच , तुम्ही मोठे मोठे बनत जाता – डोंगराएवढे पर्वताएवढे . पण , […]

लाडक्या नातीस

जन्मापासूनी बघतो तुला, परि जन्मापूर्वीच ओळखले, रोप लावले बागेमध्ये, फुल तयाने दिले ।।१।। चमकत होती नभांत तेंव्हा, एक चांदणी म्हणूनी, दिवसाही मिळावा सहवास, हीच आशा मनी ।।२।। तीच चमकती गोरी कांती, तसेच लुकलुकणे, मध्येच बघते मिश्कीलतेने, हासणे रडणे आणि फुलणे ।।३।। चांदणीचा सहवास होता, केवळ रात्रीसाठी, दिवस उजाडतां निघून गेली, आठवणी ठेवून पाठी ।।४।। नको जाऊस […]

नामस्मरणाचे कोडे

मनी वाटते नाम तुझे, सदैव मुखी यावे, कर्तव्या माजी एकाग्र असतां, कसे बरे हे व्हावे ? कोडे हे उकलून घ्यावे……।। धृ ।। श्वास चालतो रात्रदिनीं, लक्ष्य न  घेई खेचूनी, ऊर्जा मिळते देहातूनी, परि मनास बंधन नसावे….१, कोडे हे उकलून घ्यावे एकचि कार्य एके क्षणी, एकाग्रता येई दिसूनी, अवसर मिळे मग कोठूनी, त्याच घडीला कसे नाम घ्यावे……२, […]

आशिर्वाद

मिळवलेस तूं जे जे काही, कौतूक त्याचे सारे करतील स्तुती सुमनातील भाव जमूनी, हृदयामधले दालन भरतील….१ उचंबळूनी जाशील जेव्हां, बांध फुटेल नयनामधुनी ओघळणारे अश्रू सांगतील, भाग्य तुझे ग आले उजळूनी….२ दरवळू दे सुंगध सारा, नभांत जातील यश तरंग स्वर्गांमधुनी  ‘भावू ‘बघतील भीजव त्यांचे सारे अंग…३ (चि. वर्षा विद्यापीठांत सर्व प्रथम आल्याबद्दल) — डॉ. भगवान नागापूरकर

1 228 229 230 231 232 304
error: कॉपी कशाला करता? लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची ? स्वत:च लिहा की....