नवीन लेखन...

जगावे कसे पक्ष्यासारखे

जगावे कसे पक्ष्यासारखे, आभाळी स्वैर उडणारे, ध्येय आपुले दिसताच, पुन्हा जमिनीवर उतरणारे,–!!! जगावे कसे केवड्यासारखे, धुंद, मोहक वशीकरणाने, समोरच्याला ताब्यात घेणा‌रे,–!!! जगावे कसे कापरासारखे, स्वत:स अर्पण करुन, ज्वलनही सोसणारे,– ओवाळून ओवाळून , त्यात आनंदें संपणारे,–!!! जगावे कसे चित्त्यासारखे, संकटाच्या थेट भेटीस जाणारे, निडरतेने दबा धरुन, ताकदीने हल्ला करणारे,–!!! जगावे कसे “अत्तरासारखे*, स्वत: सुगंधित बंदिस्त राहून, दुसऱ्याला […]

चिंतन

ज्याचे चिंतन आम्हीं करितो तोच ‘शिव ‘ ध्यानस्थ भासतो स्वानुभवे चिंतन करुनी चिंतन शक्ति दाखवितो   १ जीवनाचे सारे सार्थक अन्तरभूत असे चिंतनांत चिंतन करुनी ईश्वराचे त्याच्याशी एकरुप होण्यात   २ सारे ब्रह्मांड तोच असूनी अंश रुपाने आम्हीं असतो जेव्हां विसरे बाह्य जगाला तेव्हांच तयात सामावितो   ३ चिंतन असे निश्चीत मार्ग प्रभुसंपर्क साधण्याचा लय लागूनी ध्यान लागतां आनंदीमय […]

पोटभरू पाखरू मी

कितीक गावांच्या अंगणात रमलो स्थिर कुठेच  होऊ शकलो नाही     || पोटभरू पाखराची भटकंती ती दानापाणी सरता थांबू शकलो नाही   || भरभरून दिले त्या माणसांनी घेणेकरी मी देणे फेडू शकलो नाही    || मायेचे झरे या माणसांच्या मनात दुस्वास त्यांचा करू शकलो नाही      || साधी भोळी माणसे होती फार ती माणसांना अंतर देऊ शकलो […]

गृहित

रात्र येत राहते दिवस येत राहतो आपण गृहितच त्यांना धरत राहतो असेच महिने येत राहतात असेच वर्ष जात राहतात आपण गृहितच त्याना धरत राहतो केस पांढरे अंगावर सुरकुत्या पाठीत बाक लटपटणं वगैरे होत राहते मग आपल्याला गृहित धरत राहतात ते रात्र दिवस माहे साल काळाचे घटक येत जात राहतात ……आपण कुठे कुठेच गृहित धरायला नसलो तरी […]

देशभक्तीची लाट

देशभर देशभक्तीची लाट आली वाटतं कुणी जवान शहीद तर झाला नाही ना! अनोळखीचा बिल्डर नमस्कार करतोय येत्या इलेक्शनला उभा राहणार तर नाही ना? जास्तच जरा बोलणे गोड वाटले त्याचे उधारबिधार नाहीतर काही काम तर नाही ना? (कुरकुरतं …. शरीर नाही पेलवत पेग पुढचा एकच ब्रँड सारखा बोअर झाला तर नाही ना?) मंदिर प्रश्न पुन्हा येत आहेत […]

वियोग

सहवासाचे सुख जेवढे,  वियोगाचे दुःखही तेवढे  । बांधल्या प्रेम बंधन गाठीं,  तुटता विसरुन जाती  ।।१।। लपुन बसती दुःख खुणा, समज न येई त्याची कुणा  । उडून जातां शाल सुखाची,  व्यक्त होई मग दुःखे जीवाची  ।।२।। कशास करितो प्रेम असे ते,  सहवासाने वाढत जाते  । फुग्यापरी जातां फूटूनी,  दुःख सारे जीवनीं  आणिते  ।।३।। दाखव प्रेम त्याच ठिकाणी, […]

रिक्त प्रेमाचा घट

रिक्त झालीस तू ,  लुटवूनी प्रेमाचा घट  // भावंडाचे संगोपन रमवूनी त्यांचे मन आईच्या  कामी मदत देऊन आनंदिले बालपणी, गीत गावूनी नीट  //१// रिक्त झालीस तू , लुटवूनी प्रेमाचा घट   लक्ष्य संसारी प्रेम पतीवरी मुलांची जोपासना करी संसार सुखाचे प्याले, भरी काठोकांठ //२// रिक्त झालीस तू ,  लुटवूनी प्रेमाचा घट   होता मुले मोठी संसार त्यांचा थाटी राहुनी त्यांचे पाठी सुखासाठी त्यांच्या,  करी देहकष्ट   //३// रिक्त झालीस तू ,  लुटवूनी प्रेमाचा घट   ईच्छा उरली […]

धोकादायक

महानगरपालिकेने धोकादायक इमारतीतील रहिवाश्याना इतरत्र हलविले आणि काही पाखरांनी तेथेच संसार मांडले — श्रीकांत पेटकर 

आणखी का …… रे?

नाव आहे गाव आहे ….आणखी का जोडणे रे ? साम आहे दाम आहे…..आणखी का ओढणे रे ? माणसांनी माणसाला वाटले आपापल्यापरि जात आहे , पात आहे…..आणखी का तोडणे रे ? राहण्याला झोपण्याला पाहिजे जागा किती तर दोन आहे,चार पाहे……आणखी का लोढणे रे ? केवढ्या चालीरिती ….चाली दलालांच्या असे या शाप आहे ,पाप आहे…..आणखी का खोडणे रे […]

इतनी मुद्दत बाद मिले हो

मुळ गझल “मोहसीन नक्वी” यांची आणि “गुलाम अली” यांनी गायलेली सुंदर रचना . मी मराठीत सरळ सरळ रूपांतर केले . बघा आवडते का ?   इतनी मुद्दत बाद मिले हो किन सोचों में गुम रहते हो ( किती दिवसानंतर भेटते तू गं कोणत्या विचारात डुबते तू गं) तेज़ हवा ने मुझसे पूछा, रेत पे क्या लिखते […]

1 226 227 228 229 230 434
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..