नवीन लेखन...

साथ लतावेलींची

साथ लतावेलींची, सोबत झाडफांद्यांची, संगत तूप साखरेची, तशी जोडी आपुली, आपण दोघे पती-पत्नी असूयांत जन्मोजन्मी,–!!! हिमगौरी कर्वे.©

संध्यासमय येताच पक्षी

संध्यासमय येताच पक्षी, घरट्याकडे सारे निघाले, किती दूर, किती योजने, लांबवरी फार उडाले,–||१|| किलबिलाट करत पिल्ले, असतील वाट पाहत, सय येता त्यांची एकदम, पंखात जसे बळ शिरत,–||२|| आपुले घरटे नजरेस पडतां, जीव भांड्यात कसा पडे, पिल्ले सुरक्षित पाहता, आनंदओसंडे चहूकडे,–!!||३|| धोका किती कोवळ्या जिवांना, सोडून जायचे निराधार, नाग साप मांजरांचा , डोळाच असता त्यांच्यावर,-!!||४|| नित्य कामास […]

चेतना

ओठावरले गीत माझे,  आज कसे हे रुकून गेले गीतामधले शब्द रूकता,  ओठ कसे हे सुकून गेले….।। धृ ।। आकाशातील थवे पाहूनी, चंचल माझी नजर झाली भिर भिरणाऱ्या दृष्टी पटावर असंख्य चित्रे उमटूनी गेली चित्र बघूनी नाचे मन जे पाषाणा परी स्थिर कां झाले….१ ओठावरले गीत माझे आज कसे हे रुकून गेले गीतामधले शब्द रूकता ओठ कसे […]

किती पाहुणे उडून येती

किती पाहुणे उडून येती, या देशातून त्या देशात, स्थलांतर त्यांचे असे पाहुनी, चकित होतो आपण मनात,–!! हजारोंची संख्या त्यांची, एकरंगी नि एकढंगी, सारखेच सगळे दिसती, सारख्याच त्यांच्या ढबी,–!!! आभाळातून उडताना, बहुतेकांना ना थकवा, हे पाहुणे असती वेगळे,– वेळेवरती– आपुल्या गावा,–!!! आगळेपण त्यांचे उठून दिसे,–!!! किती पिढ्या गेल्या तरी, हजारो वर्षे येती ते, दरवर्षी परिपाठ असे,– मार्ग […]

बकुळीची ओंजळभर फुले

बकुळीची ओंजळभर फुले, तू देतां हातांत,– विसरून आपुले भान सारे, उभी राहिले अंगणात,–!! सुवास त्यांचा आसमंती, जरी ती असती ओंजळीत, बाहेरील जगाहून अधिक, दरवळ उरला माझ्या मनात,–!!! चोरटी ती भेट आठवे, लज्जेचे पांघरूण भोवती, संकोचांचे किती कब्जे, आज स्मृती मनी खेळती,–!!! तू हाती हात घेता , मी जशी फूल झाले , पाकळीगत नाजूक, बहरून कशी उठले,–!!! […]

जगण्यात मौज आहे

जगण्यात मौज आहे, सुखदुःखाची फौज आहे, रिवाजांचे शासन आहे, रीतींचे आसन आहे, आश्वासनांचे नभ आहे, निराशांचा पाऊस आहे, क्वचित आशेचा किरण आहे, कल्पनांचे साम्राज्य आहे, वज्राहून कठोर वास्तव आहे, लोण्याहून मऊ हृदय आहे सैतानाहून कठोर भावना आहे, संताहून हळवे कुठे मन आहे, देवाहून थोर कधी माणुसकी आहे, पत्थराहून टणक अनीती आहे, अत्याचाराचा विळखा आहे, कधी प्रेमाचा […]

पुनर्भेट

ही कविता जरुर वाचा आणि त्यानंतर… मी काया आणि तू आत्मा असं समजून सुद्धा वाचा… म्हणजे वेगळा अर्थ समजेल. […]

सरोवरात कमलिनी फुलतां

सरोवरात कमलिनी फुलतां, भ्रमर भोवती विहरू लागे, पाकळ्यांचे सौंदर्य पाहता, त्याचा मनमोर नाचू लागे,–! मोह पडे अगदी त्याला, टपोऱ्या मोहक कमळाचा, गुणगुणत मस्त मजेत, वाऱ्यावरती झोके घेत, उतावीळ एकदम तो, झटकन तेथे आला,–!!! ती आपल्याच नादात असे, ना तिच्या गावी त्याचे येणे, डुलता डुलता झुळकेबरोबरी,‌ तारुण्याचा तो आनंद उपभोगणे,–!!! मोहित भुंगा जवळी येता, गुंजारव सारखा करे,– […]

कर्तृत्वाचे कल्पतरू

जीवन गंगा वहात राही, फुलवित सारी जीवने, पडेल प्रवाहीं तिच्या कुणी,  लागते त्याला वाहणे….१, काही काळ वाहतो देह,  डूबून जाणे लक्ष्य तयाचे कसा वाहतो केंव्हां डुबतो,  वेग ठरवी हे प्रवाहाचे….२, बुडूनी जाती देह प्रवाही,  कर्मे आतील तरंगती वाहत वाहत नदी किनारी,  स्थीर होवून काठी राहती,….३, देह क्षणाचा जरी,  त्याची कर्मे चिरंतर राहती कर्तृत्वाच्या कल्पतरूनी, इतर जणांना […]

मुक्तछंद

आलास, ये वरूणराजा वाट पाहतो आहोत, अगदी चातकागत,— थोडा रेंगळ आमच्यासमवेत, भिजवून टाक धरणीला, तुझ्या संततधारेने, अरे तिला संजीवन दे रे,–!!! ती तडफडत्ये उन्हाने, रणरणतेपण खाते रे तिला, नखशिखांत भिजू देत तिला, तुझ्या जलप्रवाहांनी,— तरसता, पोळलेला तडफडतां, माणसाचाही आत्मा,— होईल संतुष्ट तिच्या भिजण्याने, धरती एकदा तृप्त होऊ दे, चराचर सृष्टी होऊ दे समाधानी, तू फक्त ये […]

1 200 201 202 203 204 434
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..