नवीन लेखन...

आईचे ऋण

मूर्तिमंत वाटे देवी लक्ष्मी          प्रेमळ स्वरूप माझे आई धन्य जहलो जन्म मिळूनी       उदरामाजी तुझिया ठायी प्रेमाचा तो सागर देखिला      तुझ्याच ह्रदयाजवळी जावूनी निकटपणाचा आनंद घेत         नऊ मास मी उदरी राहुनी दुग्धामृत पाजून मजला            वाढवी अंकुर काळजीने घास भरवण्या काढून ठेवी         उपाशी राहून आनंदाने निद्रा न लागे तुजला तेंव्हा           आजारी जेंव्हा मी पडलो पाणी दिसले तुझ्या नयनी           […]

  आत्मविश्वास

आत्मविश्वास जागृत ठेवूनी,  कार्य घेवूनी तडीस नेती  । कधीही न राही अवलंबूनी, मदतीसाठी दूजा वरती  ।। ईश्वर करीतो मदत तयांना,  मदत करी जे आपले आपण  । आपल्यातची तो ईश्वर आहे,  असते याची जयास जाण  ।। विश्वासाने हुरूप येई,  जागृत करीती अंतर चेतना  । लक्ष्य सारे केंद्रीत होता,  यश चमकते प्रयत्नांना  ।।   — डॉ. भगवान नागापूरकर […]

सासरी जाताना

हास्यमुखाने निरोप दे ग, प्रेमाने भरला विसरावी मी ओढ येथली,  जाता सासरला…. ।। धृ ।।   खूप दिले तू प्रेम आजवरी, सदैव ठेवीत पदर शिरी, पंखांना परि शक्ती देवूनी,  सांग मला ग घेण्या भरारी सैल कर तू पाश आपला…१, हास्य मुखाने निरोप दे ग प्रेमाने भरला,   संसारातील धडे देवूनी,  केलीस तयार कष्ट घेवूनी कुठे लोपला आज विश्वास तो, […]

श्री कृष्णाची भक्ताला मदत

घटना घडली एके दिवशी    प्रभू बसले जेवण्या रुख्मिणी त्यांचे जवळी    होती वाढण्या  ।।१।। चट्कन उठूनी ताटावरुनी    धावत गेले दारीं क्षणिक थांबूनी तेथे    येऊनी बसले पाटावरी  ।।२।। प्रश्न पडला रुखमिणीस   काय गडबड झाली श्रीकृष्णाची धावपळ    तिजला नाही कळली  ।।३।। चौकशी करतां कृष्ण बदले    कहानी एका भक्ताची हरिनाम मुखी नाचत होता    काळजी नव्हती लोकांची  ।।४।। वेडा समजोनी त्यासी […]

भावशक्तीची देणगी

भावशक्तीची देत देणगी, उपकार तुझे झाले करण्यास तव जवळीक,  कामास तेच आले   जिंकून घेई राधा तुजला,  उत्कठ करुनी प्रेम उचंबळून त्या भावना, साधियले तेच कर्म   भक्तीभावाची करिता बात, ती तर असे आगळी पावन करण्या धाऊन जाती,  सर्व संत मंडळी   भजनांत मिरा रंगली,  ध्यास तुझा घेऊन नाचत गांत राहिली,  केले तुझ पावन   दया […]

विधी कर्माना सोडा

रूद्राक्षाच्या माळा घालूनी,  भस्म लावीले सर्वांगाला वेषभूषा ती साधू जनाची,  शोभूनी दिसली शरिराला खर्ची घातला बहूत वेळ,  रूप सजविण्या साधूचे एक चित्त तो झाला होता,  देहा भोंवती लक्ष तयाचे शरिरांनी जरी निर्मळ होता,  चंचल वाटले मन त्याचे प्रभू मार्गास महत्त्व देतां,  विसरे तोच चरण प्रभूचे विधी कर्मात वेळ दवडता,  प्रभू सेवेसी राहील काय ? देहाच्या हालचाली […]

निरोगी देही नामस्मरण

शरीर निरोगी असतां तुमचे,  नामस्मरण ते करा हो प्रभूचे ठेवू नका कार्य  उद्या करिता,  हाती काय येई वेळ गमविता शरिराच्या जेव्हा नसतात व्याधी,  राहू शकतात तुम्हीच आनंदी आनंदातच सारे होवू शकते,  प्रभू चरणी चित्त लागून जाते व्याधीने जरजर होता शरिर,  कसे होईल मग ते चित्त स्थिर स्थिरांत दडला असूनी प्रभू तो,  स्थिर होवूनीच बघता येतो नाशवंत […]

चाफा आणि मोगरा

चाफा आणि मोगरा गंधर्व कुठले हे, धरातलावर येऊन, सर्वांस मोहवती खरे, शापित म्हणू त्यांना तर सुगंधाच्या राशी, जो तो कुरवाळे त्यांना, घेऊन थेट हृदयाशी, –!!! हिमगौरी कर्वे ©

  वचन

वाणी मधूनी शब्द निघाला,  कदर त्याची करीत होते  । मुखावाटे बाहेर पडे जे,  वचन त्याला समजत होते  ।। दिले वचन पालन करण्या,  सर्वस्व पणाला लावीत होते  । प्राणाची लावून बाजी,  किंमत शब्दांची करीत होते  ।। स्वप्नामध्ये दिले वचन,  हरिश्चंद्र ते पालन करी  । राज्य गमवूनी सारे आपले, स्मशानी बनला डोंबकरी  ।। प्राण आहूती देई दशरथ, वनी […]

अर्थ

“अर्थ” चांदण्याही विझलेल्या चंद्रही जणू निजलेला सावळले नभ सारे गाती वाहते वारे ——————तू कुठे?!!१ थेंब थेंब शिडकावा कुठूनसा हळु व्हावा वाऱ्याच्या कुणी पाठी झाडे का झिंगताती ———————तू कुठे?!!२ कसली ही झाली नशा धुंद जशा दाही दिशा पंखाविन तरल तनु अवकाशी झेप जणु ———————तू कुठे?!!३ जिवनाचा अर्थ नवा चराचरा उमगावा या हळव्या क्षणी जरा स्पर्श हवा प्रेमभरा […]

1 198 199 200 201 202 434
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..