चिमणी

बऱ्याच दिवसानंतर मोकळ्या नभात उडताना एक चिमणी दिसली चिव – चिव करत घरात माझ्या नजरेसमोरून ती उडत गेली आमच्या घरासमोरच्या पूर्वीच्या मोकळ्या अंगणाची आठवण करून गेली मागे कधी आजीने सांगितलेल्या चिमणीच्या गोष्टीची आठवण देऊन गेली बऱ्याच दिवसापासून फक्त चित्रात दिसणारी चिमणी आज प्रत्यक्षात सामोरी आली बऱ्याच वर्षानंतर आमच्या घरात जणू ती नवीन पाहुनीच आली चिमण्या घटता […]

देहाला कां शिणवितां ?

शरिरातील अवयव सारे, यंत्रावत् असती आपल्यापरी कार्य करुनी, कार्यारत राहती यंत्रामधल्या मुख्य गाभ्याला, आत्मा म्हणती कुणी अविरत मिळे चैत्यन्य शरीराला, त्याचे कडूनी शुद्ध अशुद्ध संस्कार सारे, अवयवी घडती त्याच रुपें आत्म्याकरवी, परिणाम तो होती खाणें शुद्ध पिणेशुद्ध विचार निर्मळ, पवित्र ते संगम होता योग्य साऱ्यांचा, शुद्धीकरण घडते उपास तापास करुनी कांहीं, शिणविती देहाला हट्टयोग साधूनी कित्येक, […]

“आनंद” भावना

ध्येय असावे तुमचे नेहमीं आनंद मिळवण्याकडे ‘आनंद ‘ हाचि ईश्वर असतो समजून घ्याहो हे कोडे ।।१।। शरीर देई ‘सुख ‘ तुम्हांला क्षणिक ते तर असती सुखाच्या पाठीशी छाया असते ‘दुःख ‘ तयाला संबोधती ।।२।। सुखाबरोबर नाते असते सदैव अशाच दुःखाचे वेगळे त्यांना कुणी न करती जाणा तत्त्व हे जीवनाचे ।।३।। ‘आनंद ‘ भावना असे एकटी नसे […]

बघूनी सू्र्यपूजा पावन झालो

हासत आली सूर्य किरणे,        झरोक्यातून देव्हाऱयात न्हाऊ घालूनी जगदंबेला,        केली किरणांची बरसात पूजा केली किरणांनी,          जगन्माता देवीची प्रकाश स्पर्शूनी चरणाला,     केली उधळण सुवर्णाची तेजोमय दिसूं लागले,        मुखकमल जगदंबेचे मधूर हास्य केले वदनीं,     पूजन स्विकारते सूर्याचे रोज सकाळी प्रातःकाळीं,      येऊनी पूजा तो करितो भाव भक्तिने दर्शन घेऊनी,      सृष्टीवर किरणे उधळितो कोटी कोटी किरणांनी,       तो देवीची पूजा करितो […]

तपसाधनेतील परिक्षा

तपसाधनेतील परिक्षा (काव्य स्फूर्ती) पूजित होतो प्रभूसी ध्यान एकाग्र करुनी भाव भक्तिने तल्लीन होत असे भजनी ।।१।। काव्यस्फूर्ति देऊनी कवि बनविले मजला शब्दांची फुले गुंफवूनी कवितेचा हार बनवविला ।।२।। सुंदर सुचली कविता आनंदी झाले मन ध्यास मज लागता गेलो त्यांतच रमून ।।३।। पुजेमधले लक्ष्य ढळले काव्याच्या मागे जावूनी भजनांतील चित्त वेधले तपोभंग तो होऊनी ।।४।। मधाचे […]

1 197 198 199 200 201 231