स्मरण असू दे

हे जगदंबे !  सदैव होते नाम मुखी गे लोप पावले आज कसे ते तू मज सांगे…..१ लागत नव्हते जेंव्हां कांहीं तूज पासूनी धुंदीमध्ये राही मी तुझ्याच मधूर नामी….२ काही हवेसे वाटू लागले एके दिवशी विचारांत मी डूबू लागलो त्या सरशी….३ आनंदाचे वलय निर्मिले इच्छे भोवती गुंगूनी गेलो पूरता त्यातच दिन राती….४ तगमग करूनी तेच मिळविता आज […]

चुकीचे तर्क

मोठ-मोठ्याने आरडत ओरडत, स्वत:शीच बोलत होता विचार जरी गतिमान होते, विषय तोच तो घोळत होता…..१, तऱ्हेवाईक बघूनी वागणे, खुळा त्याला समजत होते वेडेपणाचा प्रकार समजूनी, दुर्लक्ष्य त्याजकडे करित होते…२, वृक्षाखाली बसूनी एकटा, डोळे मिटूनी शांत दिसला त्याच विषयाचा विचार मनी, चक्र गतीने घोळू लागला…३, बाह्यांगाची बघूनी शांतता, ज्ञानी त्यास समजू लागले मतप्रदर्शनी तर्क आधार, चुकीचे घेणारे ते ठरले…४ […]

कृष्ण बाललीला

चकित झाले गोकूळवासी बघून बाललीला सांगा कोण आहे तरी कृष्ण ? विचारी यशोदेला   ।।१।। प्रासादातील मोदक खातां तोंड ते उघडले मुखामध्ये मोदक नसूनी ब्रह्मांड ते दिसले   ।।२।। उच्छाद मांडूनी कालीयाने पाणी केले दुषित मर्दन करण्यासाठीं त्याचे उडी टाकी डोहात   ।।३।। पूतना असूनी राक्षसिण स्तनांत होते विष स्तनपान करुनी त्यानें तीला केले कासाविस   ।।४।। खोड्या बघूनी यशोदेनें […]

अवमूल्यन

उत्साहाने करित होता,  सारे कांहीं इतरांसाठी क्षीण होवूनी जाता शरीर,  आधार तयाला झाली काठी…१, धनाचा तो प्रवाह वाहतां,  गंगाजळीचे पाणी पाजले दुजाकरिता त्याग करूनी,  समाधानी ते इतरा केले….२, धन संपत्तीचे झरे आटतां,  प्रेमळपणाचे शब्द राहीले कालक्रमणाच्या ओघामधल्या,  दुर्बलतेस कुणी न जाणले…३, अपेक्षा ती सदैव असते,  मिळत रहावा सहयोग अवमूल्यन ते केले जाते,  दुर्लक्ष करूनी दुर्बल अंग…४ […]

आत्म्याचे मिलन

आत्म्याचे मिलन परमात्म्याशी हेच जीवनाचे ध्येय असे आत्मा ईश्वरी अंश असूनी त्यालाच मिळण्या उत्सुक असे देह पिंजऱ्यांत अडकता बाहेर येण्या झेप घेई तो अवचित साधूनी वेळ ती कुडी तोडूनी निघून जातो कार्य आत्म्याचे अपूरे होता पुनरपी पडते बंधन चक्र आत्म्याचे चालत राही मुक्त होण्याचा येई तो क्षण डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८४०

सत्य, अहिंसा, साधी राहणी

सत्य, अहिंसा, साधी राहणी, . महात्मा गांधींची विचारसरणी तत्वांची सगळ्या किती हेटाळणी, ‌ कोण आणतो सांगा आचरणी, –!!! असत्याच्या आधाराने, हिंसक, मारक, वर्चस्वाने, वागतात पोकळ दिमाखाने, राष्ट्रपुरूषाची मनोरथे”च निराळी,-! स्वातंत्र्याचा वाईट अर्थ, सगळे स्वैराचाराचे भक्त, माणसाचे वागणे नि:सत्व, गांधींच्या तत्वांना तडा जाई,–!! सोदाहरणाने राष्ट्रपित्याने, स्वच्छतेचा मार्ग शिकवला, आम्ही घाणीच्या बुजबुजाटाने, समतोल निसर्गाचा बिघडवला,-! घर , गाव […]

चांदण्यांची सैर करू

चल, चांदण्यांची सैर करू, अंबरी, ढगां-ढगांत विहरू, कडेकडेने मेघांच्या,जाऊ, हळूच,मऊ मऊ दुलईत शिरू,-!! मिचकावून डोळे आपुले, चांदण्यांची वरातच पाहू, सुंदर चमचमत्या प्रकाशात, त्यांची आभा नीट न्याहाळू,–!! काळ्याशार गालिच्यावर नभांत, वावरते प्रकाश–झोत पाहू, इकडून तिकडे हलत्या प्रवासी, चंद्राचीही धांदल बघू,—!! कोण त्यांच्यात अधिक सुंदर, मनी मानसी स्पर्धाच लावू, चंद्राचा मुखडा लोभसवाणा, पाहून आपण अचंबित होऊ,–!! धरेवर ती […]

रूप असे देखणे

रूप असे देखणे काळजां भिडले भारी, डोळे असती लकाकते, पाणीदार जसे मोती, काया कशी तुकतुकीत, नजर फिरता हाले, सुंदर तांबूस वर्ण, त्यावर पांढरे ठिपके, शिंगांची नक्षी डोई, दिसते वर शोभुनी, हिंडते बागडते रानी, कुणी बालिका की हरणी, –?? चपल चंचल वृत्ती, अचूक आविर्भाव मुखी, क्षणोक्षणी मान वेळावी, भय दाटले नयनी,–!!! पाय मजेदार हलती, नाजुकसे ते हडकुळे, […]

काळजाच्या भेटी

काळजाच्या भेटी, आलीस सई गाठी, खूण पटता आत्म्यांची, किती आनंदी दिठी,–!!! ||१|| काळजाच्या भेटी आलीस सखे राती पूर गप्पांचा येता , वाढत जाय भरती,–!!! ||२|| काळजाच्या भेटी , आलीस मैत्रिणी, जिवांचे दुवे सांधीत, घट्ट हृदयाची नाती,–!!! ||३|| काळजाच्या भेटी, आलीस सये पाठी, सुखदुःखांच्या हिंदोळी, दोघी बसू एकाच झुली,–!!! ||४|| काळजाच्या भेटी , आलीस तू सहेली, सह […]

चादर कायेवर लपेटून धुक्याची

(एका हिंदी कवितेचा मुक्त अनुवाद) चादर कायेवर लपेटून,धुक्याची, पायवाटेची सैर करावी, थेंब स्पर्शती पायांना अनवाणी, जाणीवही ती सुखावह किती,–!! निळे-गहिरे स्वैर तरंग, हृदयाला जेव्हा छेदती, असेच आपुले गुपित एखादे, ते कसे उलगडती,–! केसांच्या बटांना स्पर्शून, झुळूक जाते एखादी, आपल्या प्रेमाची जाणीव, देऊन जाते ना कधी,–!!! दूरवर उभ्या झाडांवर, पक्षी कूजन करिती, हृदयाला ताजेतवाने, करुन सोडती अगदी, […]

1 2 3 215