दैवी देणगी

लुळा पांगळा बसूनी एकटा,  गाई सुंदर गाणे, आवाजातील मधूरता,  शिकवी त्याला जगणे….१, जगतो देह कशासाठी,  हातपाय असता पांगळे मरण नसता आपले हाती,  जगणे हे आले…..२, लुळा असला देह जरी, मन सुदृढ होते जगण्यासाठी सदैव त्याला,  उभारी देत होते…..३, गीत ऐकता जमे भोवती,  रसिक जन सारे नभास भिडता सुरताना, शब्द उमटती वाह ! वा रे ! ….४, असमान्य ते एकचि मिळता, […]

देह बंधन – मुक्ती

बंधन मुक्तीसाठीं असतां,  बंधनात ते पाडून टाकी कर्मफळाचे एक अंग ते,  टिपतां राही दुसरे बाकी…१, साध्य करण्या जीवन ध्येय,  देह लागतो साधन म्हणूनी सद्उपयोग करूनी घेतां,  साध्य होईल हे घ्या जाणूनी…२, हिशोब तुमचा चुकून जाता,  तोच देह बनतो मारक विनाश करितो मागें लागतां, मिळविण्यास ते ऐहिक सुख….३, बंधन पडते आत्म्याभोंवती,  शरिरांतल्या वासने पायी वासनेच्या आहारी जातां, […]

राजमाता कैकयी

अकारण कां नांवे ठेवता सदैव कैकयीला  । चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्ही राजमातेला   ।।धृ।। जेव्हां दशरथ युद्धास जाई  । कैकयी त्याच्या सेवेत राही  ।। राजनीति अन् युद्धनीति ही  । अवगत झाली सारी तिजला   ।।१।। चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्हीं राजमातेला नजीकच्या त्या देशामधूनी  । रावणादी असुरी शक्ती वाढूनी  ।। सामान्य जनाला जर्जर करुनी  । हा हाः […]

बंदीस्त करा मनाला

वातावरणी वस्तू पडतां,  नाश पावते लवकर ती हवा पाण्याच्या परिणामानें,  हलके हलके दूषित होती ठेवूं नका उघडयावरती,  वस्तू टिकते निश्चीतपणे दूषितपणाला बांध घालता,  कसे येई मग त्यात उणे बाह्य जगातील साऱ्या शक्ति,  आघात करती मनावरी दुषिततेचे थर सांचूनी,  मनास सारे दुबळे करी देहामध्यें बंदीस्त ठेवून, एकाग्रचित्त करा मनाला कांहीं न करता येते तेव्हां, राग लोभादी बाह्य […]

परमार्थ व संसार आहेत एकच

उपास तापास करुनी,   शिणवित होतो देहाला भजन पूजन करुनी,   पूजीत होतो देवाला   ।।१।। कथा किर्तनें ऐकूनी,   पुराण मी जाणिले माळ जप जपूनी,   प्रभू नामस्मरण केले   ।।२।। वेचूनी सुमनें सुंदर,   वाही प्रभूचे चरणीं फुलांचे गुंफूनी हार,   अर्पण केले कंठमणीं   ।।३।। जाऊनी तीर्थ यात्रेत,   दर्शन घेतले तीर्थांचे प्रसिद्ध देवालयांत,   चरण स्पर्षिले मूर्तीचे  ।।४।। मनामध्यें ठेऊन शांती,   मूल्यमापन केले […]

पुनर्भेट

तुझ्या आठवणींची ठिणगी पडते अन, बेचिराख होतं भोवतालचं जग उरतो आपण दोघंच फक्त तू आणि मी ————————ll १ ll अनंताच्या प्रवासाने थकलेला तू अन, मी अज्ञातांच्या जगात भांबावलेली ताटातुटीचं भय पांघरून तू आणि मी ————————ll २ ll तू अबोल, मुका, की असहाय्य? अन, तुझ्या भेटीने सुखावलेली मी आता विसाव्याच्या कवेत तू आणि मी ————————-ll ३ ll […]

अहं ब्रह्मास्मि

एके काळीं हवे होते, मजलाच   सारे कांहीं आज दुजाला मिळतां आनंद मनास होई माझ्यातील   ‘मी ‘ पणानें विसरलो सारे जग तुझ्यामध्येंही ‘ मी ‘  आहे, जाण येई कशी मग जेंव्हा उलगडा झाला साऱ्या मध्ये असतो ‘मी’ आदर वाटू लागला, जाणता  ‘अहं  ब्रह्मास्मि‘ — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

प्रेमाचा झरा

निशब्द झाली होतीस तू मीही निशब्द झालो होतो नदी किनारी आपण दोघे एकमेकांत गुंतलो होतो प्रेम म्हणजे काय असते दोघांनाही माहित नव्हते प्रथम दर्शनी मन दोघांचे घायाळ मात्र झाले होते | जे मनात तेच ओठात पटकन रिते केलेस तू मन मी मात्र तुजसवे बोलण्यास शब्दात अडकत होतो जितक्या वेगाने आलीस तितक्याच वेगाने दूर गेलीस मी मात्र […]

देवा

देवा तुझे जरी सुंदर आकाश मी तुझा प्रकाश अंधारी का——————ll १ ll सुंदर वेलींना सुंदर हि फुले माझीच का मुळे खुडलेली ——————-ll २ ll साखरेचे खाई त्याला तूच देशी मी का रे उपाशी तुझ्या घरी ——————ll ३ ll भिकारी तुही तुझ्या आईविना माझ्या का वेदना जाणेनाशी ——————ll ४ ll काठीला तुझ्या आवाजच नाही तरी त्राही त्राही […]

प्रेमाचा उगम

दाखवू नकोस प्रेम तुझे उपरेपणाच्या भावनेने  । तसेच मिळेल परत तुला केवळ वाणीच्या शब्दाने  ।। कंठामधूनी भाष्य निघाले आदळे कर्णपटावरी  । प्रेमाचा बघूनी ओलावा परिणाम होई मनावरी  ।। शब्द निघता हृदयामधूनी झेप घेई हृदयस्थरावरी  । आत्म्याची तळमळ भिडते आत्म्याच्या गाभ्यावरी  ।। खोलवर आणिक जाता ईश्वर बिंदूत विलीन होतो  । सत्याचा शोध लागूनी आनंदाचा पाऊस पडतो  ।। […]

1 2 3 226