नवीन लेखन...

डॉक्टरांनी आपल्याला एक्स-रे, सी.टी. स्कॅन अशा चाचण्या करण्यास सांगितल्यावर आपण एक्स रे क्लिनिकमध्ये जातो खरे; पण या चाचण्या, त्यांची नावं याने पुरते गोंधळून जातो. या चाचण्या आता कॉमन झाल्या असल्या तरीही क्लिनिकमधल्या यंत्रांनी छाती दडपुन जाते. म्हणूनच याविषयीचे समज, गैरसमज, चाचण्यांची नेमकी पद्धत याविषयीची ही लेखमाला. क्ष किरणांचा शोध लागून आता १०० हून जास्त वर्ष लोटली आहेत. हे एक प्रतिमाशास्त्रच आहे. त्याचप्रमाणे अल्ट्रासाउंड लहरी, विद्युतचुंबकीय लहरी व किरणोत्सर्ग (आयसोटोप्स) इत्यादींचा उपयोग करुन रुग्णाच्या शरीरातील इंद्रियांची व त्यांच्या कार्याची सूक्ष्म व सखोल माहिती प्रतिमेच्या स्वरुपात मिळवणे या तत्वावर आधारलेल्या प्रतिमाशास्त्राचा आवाका खूप मोठा आहे. सुप्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉ. श्रीकांत राजे यांनी हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने मांडला आहे.

छातीचा एक्स-रे

आधुनिक विज्ञानात प्रतिमाशास्त्राने कितीही प्रगती केली तरी क्ष किरणांचे महत्व अजिबात कमी होणार नाही. कमी खर्चात भरपूर व सूक्ष्म माहिती देण्यात क्ष किरण शास्त्र समर्थ आहे आणि याचेच उत्तम उदाहरण म्हणजे छातीचा एक्स-रे. क्षुल्लक तक्रारीतही डॉक्टर रुग्णाला छातीचा एक्स-रे काढायला लावतात व यात डॉक्टरांची काहीही चूक नाही कारण छातीचा एक्स-रे म्हणजे रुग्णाच्या आरोग्याची कुंडलीच आहे.
[…]

आधुनिक एक्स-रे आणि प्रतिमाशास्त्र

काही वर्षांपूर्वी मी लिहिलेल्या “मेडिकल इमेजिंग” या मराठी पुस्तकाला मोठा प्रतिसाद मिळाला. या विषयावरील ते पहिलेच मराठी पुस्तक होते. मात्र छापील पुस्तकाच्या मर्यादांपासुन दुर होउन जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा व्हावा यासाठी या पुस्तकाला लेखमालेच्या स्वरुपात लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी इंटरनेटचा मोठा उपयोग होईल हे पटल्यामुळे ही लेखमाला सुरु करत आहे. “मराठीसृष्टी”सारख्या लोकप्रिय पोर्टलवरुन या लेखमालेतील लेख इंटरनेटशी जोडलेल्या हजारो मराठी माणसांपर्यंत पोहोचण्यास उपयोग होणार आहे.
[…]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..