नवीन लेखन...

जुन्या आठवणींना उजाळा देणारे लेखन

जुन्या गोष्टींमधले नवे आणि नव्यातले काही जुने

चाळीस पन्नास वर्षांपूर्वी कोकणातल्या आमच्या गावाकडच्या खेड्यात असलेली जीवन -पद्धती आरोग्याच्या हितासाठी किती योग्य होती ही दृष्टी थोडी उशिरा म्हणजे आज मोठे झाल्यावर, जग पाहिल्यावर, शिकले सावरल्यावर मिळाली. सगळंच जुनं वाईट नसतं आणि टाकून देण्यासारखे नसते ही जाणीव जुन्या आठवणी कुरतडत राहाते आणि काहीतरी हरवल्याच्या भावनेने जीव कासावीस होत राहातो. […]

फॉन्टफ्रिडमची १८ वर्षे…

आजचा दिवस आणखी एका कारणानेही खास आहे. बरोबर १८ वर्षांपूर्वी, २००१ साली आजच्याच दिवशी, म्हणजेच विजयादशमीला, `लोकसत्ता फॉन्टफ्रिडम’ या सॉफ्टवेअरचं अनावरण झालं आणि बघता बघता ते सॉफ्टवेअर इतकं प्रचंड लोकप्रिय झालं की आजमितीला जगातील किमान ४ लाखांहून जास्त संगणकांवर ते इन्स्टॉल झालंय. […]

भाऊचा धक्का…. आठवणीतला !

एकेकाळी कोकणी आणि गोंयकार प्रवाशांनी गजबजणाऱ्या मुंबईतील भाऊच्या धक्क्याला यंदा दीडशे वर्षं पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने भाऊच्या धक्क्याच्या इतिहासाची ही सफर…. सुरेंद्र बा जळगांवकर यांनी लिहिलेली ही सोशल मिडियातली पोस्ट शेअर केलेय. […]

माझा सिनेमा !

भारतातले ‘सिनेमावेडे’ लोक १९५२ सालात जन्मले असावेत हा माझा लाडका आणि दृढ समाज आहे. कारण मी त्याच सालात या पृथ्वीचा भार वाढवलंय. या पूर्वीच्या पिढीचे सिनेमा बद्दल ‘एक छछोर नाद!’ असे मत होते. असो. (मी महाराष्ट्रातला तेव्हा ‘सिनेमा ‘ म्हणजे ‘हिंदी सिनेमा’ असाच घ्यावा.)  […]

मुंबईतल्या रेल्वे स्टेशनांवरचे ब्रिटिशकालीन रॅम्प्स

मध्य रेल्वेवरच्या चिंचपोकळी आणि करी रोड या स्टेशन्सशी माझा लहानपणापासूनचा संबंध. त्याचं कारण माझं आजोळ लालबागचं. माझं राहाणं पश्चिम रेल्वेवरच्या प्रथम अंधेरी आणि नंतर दहिसरचं. लहानपणी अंधेरीला राहात असताना, आईच बोट धरून मामाकडे जाण्याचा आवडता मार्ग म्हणजे, ‘४ लिमिटेड’ बस. वरच्या डेकवर सर्वात पहिल्या सीटवर जाऊन बसलं, की स्वर्ग हातात आल्याचा आनंद व्हायचा. अंधेरी पश्चिमेतल्या ‘कॅफे अल्फा’च्या समोरच्या पहिल्या स्टोपवर बस आली, की आपली आवडती सीट पकडायची आणि टकमक पाहत लालबाग मार्केटच्या स्टॅपवर उतरायचं, ह्यात बडा आनंद होता. […]

मे महिन्याची सुट्टी

पोरांना मे महिन्याची उन्हाळी सुट्टी पडली की घरातल्या बायकांना जरा निवांतपणा मिळतो मग याच उन्हाळी सुट्ट्यांचा सदुपयोग या बायका इतर वार्षिक घरगुती पदार्थाच्या साठवणीने करतात. जसं कि, चिनीमातीच्या बरण्यांमध्ये लोणचं बनवून वर्षभरासाठी मुरवत ठेवणे, लाल मिरची, शंकासुरी मिरचीचे लाल मसाले (कांडायला) दळायला देणे, नानकटाया बनवून बेकरीत भाजायला देणे, आमपोळ्या, फणसपोळ्या, मुरांबा बनवणे, फणसाचे काप तळणे वगैरे. […]

टीव्हीच्या आठवणी…

चॅनेल्स नव्हती,रिमोट नव्हते त्यामुळे जे काही समोर सुरू आहे, ते भक्तिभावाने पाहत सगळं कुटुंब रंगून जायचं…त्यातल्या त्यात टीव्हीचा आवाज कमीजास्त करणं हीच काय ती हालचाल.. तेव्हाचा रिमोट हा घरातील शेंडेफळ असे.. […]

कलकत्ता मेल व्हाया नागपूर – भाग ३

नियतीने हा वन डाऊन चा मार्ग माझ्यासाठी पुढे अनेकदा निवडून ठेवला होता आणि थेट सिक्कीम, भूतान , आसाम पर्यंत या गाडीच्या मदतीने माझे पाय लागले. आता वन डाऊन च्या तोडीची गीतांजली व दुरांतो एक्सप्रेस या गाड्या दिमतीला आहेत. परंतु आजही वन डाऊन नागपुर मेल तशीच रुबाबात आपला प्रवास करीत आहे. […]

आंबेटाकळीची आमराई

माझे मूळ गाव खामगाव तालुक्यामधील आंबेटाकळी आहे. प्राथमिक शिक्षण गावातच झालेले असून गावाचे वैशिष्ट्ये म्हणजे, नावाप्रमाणे आंबेटाकळी शिवारात आमराई होत्या. त्या लोप पावल्या असल्या तरी आठवणी मात्र कायम आहेत. याविषयी… […]

कलकत्ता मेल व्हाया नागपूर – भाग २

दत्तूकाका व माझे वडिल अनेक वर्षे खडकपूरला सुट्टीमध्ये जातच राहिले. मोठी रेल्वे कॉलनी. रोज निरनिराळ्या गाड्यांच्या गप्पा त्यातही वन डाऊन विशेष चर्चेत असे. गाड्यांचे टाईमटेबल व त्या लेट का होतात यावर तासन्तास काथ्याकूट. या सर्व मार्‍याचा दत्तूकाकांच्या मनावर असा काही जबरदस्त पगडा बसला की त्यांनी चक्क इंजिनमधील फायरमनची नोकरी पकडली. […]

1 6 7 8 9 10 16
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..