नवीन लेखन...

जुन्या आठवणींना उजाळा देणारे लेखन

चित्रपटांमधील “अढळ” स्मृतिचिन्हे !

चित्रपटातील कथानकाला ,संवादांना स्वतःचे असे स्थान असते. पण काही परिणामकारक प्रसंग त्या चित्रपटाचा पोत ३६० अंशातून बदलतात आणि कायमचे लक्षात राहतात. कथा पुढे तर नेतातच पण अभिनयाने जो अभिप्रेत असलेला संदेश देतात तो बराच काळ टिकतो. हिंदी चित्रपटांमधील मला आवडलेले चार प्रसंग- […]

मजेमजेचे खेळ

आज हे खेळ राहिले नाहीत. . . कुठेच. मुलांच्या बालपणातही दडपणाने शिरकाव केलेला आहे. टिव्ही, मोबाईल, गेम याकडे आकर्षित झाली आहेत मुले. खूप हुशार असलेली ही पिढी मात्र प्रचंड तणावाखाली दिसत आहे. यांना भरकटत जाण्या अगोदर त्यांच्यातल्या सर्जनशीलतेला समृद्ध करण्यासाठी जाणीव पूर्वक भयमुक्त वातावरण निर्मितीची आवश्यकता आहे. . . […]

आरोग्य व्यवस्थेचा हुsर्रेव

ही गोष्ट फार जुनी असून पूर्ण आठवत ही नाही तशी. पण जे मनात ठसतं ते मात्र आपण कधीच विसरु शकत नाही. वर्षानुवर्षे ते तसंच दिसतं डोळ्यासमोर. आपल्या बालपणीच्या आठवणीत रमायला सर्वांनाच आवडतं. कित्येक माणसं आपलं बालपण वारंवार आठवत आठवत च जगत असतात. इतरांना ते सांगत असतात. ते सांगताना व आठवताना खूप गंमत वाटते. […]

बाकावरचे दिवस

पूर्वी आमच्या गावात एक डॉक्टर यायचे महिण्या पंधरा दिवसातून एकवेळा. त्यांना बसण्यासाठी हक्काचं ठिकाण म्हणजे आमच्या शाळेचा व्हरांडाच. तिथंच पेशंट यायचे तपासून घ्यायचे. आम्ही निरीक्षण करायचो. एकदा डॉक्टर ते त्यांचे साहित्य तिथेच सोडून थोडे कुठे तरी गावात गेले होते. आम्हाला त्या साहित्याचे खूप कुतूहल होते. आम्ही चार-पाच मुले तिथे आलो आणि व्हरांडयातील एक एक सहित्य हाताळून पाहू लागलो. कधीच न हाताळलेले ते साहित्य हातात घेऊन एकमेकांना दाखवून मजा घेत होतो बिनधास्तपणे. […]

‘अस्सं माहेर’ सुरेख बाई …..

मागच्‍या पिढीतील ताई-भाऊ, काकू-बापू आणि आमच्‍या आई-वडिलांचे आदर्श संस्कार आमच्‍या सर्व बहीण भावंडांवर झालेले. रोज रात्री आम्‍ही सर्वजण बसून ‘रामरक्षा’ म्‍हटली. ‘मानसिक शांती’ हीच जमेची बाजू. माझे माहेर गिरगावांत आंग्रेवाडीत. तिथे आम्‍ही लहान असताना गाववाले विष्णू साठे, रघू आगाशे वगैरे मंडळी तासनतास येत व गप्पा मारीत. ती अशी कां येत असत? हयाच उत्तर कोकणात आल्‍यावर त्‍यांची बाजूचीच घरे पाहून मिळालं. कोकणातून मुंबईत आल्‍यावरसुद्धा एकमेकांना भेटण्याची ओढ आणि आपलेपणा. […]

मोफत पाठ्य पुस्तकातील ज्ञान गंगा

काही वर्षा पूर्वी महाराष्ट्र  सरकारने  शालान्त  परीक्षेपर्यंतच्या  विद्यार्थ्यांना  सर्व  पाठयपुस्तके  मोफत  वाटण्याची  घोषणा  केली.  ती  अमलात  आणेपर्यंत  आता  फक्त  आर्थिकदृष्टया  कमकुवत  वर्गासाठीही  लागू  करण्याची  घोषणा  नंतर  केली .  मोफत पाठ्य पुस्तक योजने वर त्या काळी बरीच चर्चा झाली. मला माझे शालेय जीवन आठवले. […]

बालपणीची ‘स्मृती चित्रे’

लहानपणीचे संस्कार जसे आयुष्यभर टिकतात ताशा या आठवणी आणि स्मृती सुद्धा! माझे बालपण ‘गिरगाव’, येथील एका ‘मोक्याच्या जागी , अगदी रहदारीच्या रस्त्यावरील आंग्रेवाडीत  संपन्न झाले. त्यात एकत्र कुटुंबात वाढलेली आम्ही भावंडे त्यामुळे आमच्या आठवणीसुद्धा तितक्याच भिन्न भिन्न , गमतीच्या, आनंदाच्या आणि नवलाईच्या. महाराष्ट्राच्या ‘लोक कला जीवनातील आख्यायिका आणि त्यांचे बालपणी घडलेले दर्शन हि माझी स्मृती चित्रे झाली आहेत. […]

टपाल पेटी…

तुमच्या आमच्या साऱ्यांच्या जीवनात कितीतरी महत्वाची भूमिका बजावणारी ही टपालपेटी आता फारशी दिसत नाही. पूर्वी ती अशीच कुठेतरी शहराच्या मध्यवर्ती चौकात, झाडाच्या खोडाला, गावात कुणाच्या तरी दारात तरी लावलेली असायची. ठराविक वेळेला ती पेटी उघडण्यासाठी टपाल खात्याचा कर्मचारी यायचा आणि गाठोड भरून पत्र, पाकिट घेऊन जायचा. […]

कल्हईवाला…

आज हे सारे आठवण्याचं कारण म्हणजे… घरातला शेवटचा पितळी तांब्या देण्यासाठी बाहेर काढला गेला होता. हा तांब्या मोडमध्ये देऊन स्टिलचे कुठलेतरी भांडे घेण्याची योजना आखली गेली होती. त्या पितळी तांब्याला पाहून कल्हईवाला चाचा आठवला. पितळी तांब्याला चिकटलेले सारे जुने संदर्भ आठवले आणि आठवणी समोर उभ्या ठाकल्या…. […]

आजी तुझी आठवण येते…

– एके दिवशी दुपारचा चहा झाल्यावर आजींनं सगळ्यांना एकत्र बोलावलं .बेडखालची बॅग बाहेर काढली आणि उघडली . म्हणाली , ” तुम्हाला वेळ कसा घालवायचा हाच मोठा प्रश्न आहे ना , मग मी आता या बॅगेतला सगळा भूतकाळ तुमच्यासमोर ठेवते . वेळ कसा जाईल ते तुम्हाला कळणार सुद्धा नाही . ” आणि मग इतके दिवस दडवून ठेवलेला मौल्यवान खजिना बाहेर काढावा , त्याला अलगद हाताळावा , तसं आजी एकेक वस्तू बाहेर काढू लागली . […]

1 5 6 7 8 9 16
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..