नवीन लेखन...

जुन्या आठवणींना उजाळा देणारे लेखन

स्टीलचा पेला

आम्ही म्हणजे आमच्या घराण्यात या चित्रात दिलेल्या आकाराचा पेला गेली आठ दहा दशके तरी वापरत आहोत. पुर्वी पितळिचे होत. मग जर्मन सिल्वर व १९७०-८०पासून स्टीलचे. […]

आठवणींचे निर्माल्य !

१९९६ साली माउलींच्या संजीवन समाधीला ७०० वर्षे पूर्ण झाली त्यावेळचे बरेच काही आठवत आहे. बाबा महाराज सातारकर यांचे वेल्हाळ “कैवल्याचा पुतळा ” बघणे/ऐकणे त्यावेळी मस्ट होते. माऊलींची लडिवाळ भाषा बाबा महाराजांनी अलगद टिपली आहे. प्रा. राम शेवाळकर यांच्या ओघवत्या आणि नादमयी भाषेत संत ज्ञानेश्वरांविषयी व्याख्यान ऐकायला मिळाले. येथेही पांडित्य नव्हते पण बरीच अज्ञात दालने खुली झाली. माउलींचा “योगी ” प्रवास दृगोच्चर झाला. […]

मालगुडीचे दिवस

आर. के. नारायण यांनी मालगुडी या काल्पनिक गावाच्या पार्श्र्वभूमीवर अनेक कथा लिहिल्या. त्यामध्ये गावातील सर्वसामान्य अशा अनेक व्यक्तीरेखा घेऊन त्यांच्या जीवनातील चढ-उतार, आशा-निराशा, आनंद-दुःख, राग-लोभ अप्रतिमरित्या रेखाटले. […]

वाळवण, साठवण – आठवण !

सगळं काही “साथी हाथ बढाना ” टाईप. १०-१२ जणी मिळून तितक्याच घरांसाठी वाळवण आणि साठवण निगुतीने करायच्या. मेहनताना वर लिहिलाय तसा – किंचित चव. तुलना वगैरे नसायची. २-३ महिन्यात वर्षभराची बेगमी ! त्याकाळी हे सगळंच सर्रास दुकानांमध्ये मिळत नसे. त्यामुळे गृहिणी जिंदाबाद ! […]

तेव्हा (१९७२) ते आज (२०२१)

पन्नास वर्षे कालनदीतून वाहून गेली आणि ती सगळी चिमुरडी(?) मुले, आता साठी उलटलेली आजोबा मंडळी झाल्यावर पहिल्यांदाच औपचारिकरीत्या दोन दिवसांसाठी भेटली. […]

‘सुन्या सुन्या’ – उध्वस्त स्मिताचा अल्बम !

कितीतरी पारितोषिके मिळालेली स्मिता मला भावून गेली. अतिशय बोलक्या डोळ्याची, मनस्वी कलावंत ! ” उंबरठा ” हा सर्वार्थाने तिचा चित्रपट होता. आणि हे गाणेही केवळ तिचेच होते. जब्बारला तिच्यापेक्षा समर्थ पर्याय त्यावेळी तरी मिळाला नसता. […]

पुराव्याने शाबित

भांड्यांवर नाव टाकण्यामागे कारण असं असायचं की, कधी शेजारी पाजारी ते भांडं काही वस्तू घालून दिलं, तर ते सहज परत मिळावं व त्याची त्यांच्या भांड्यात सरमिसळ होऊ नये म्हणून…त्यावर नाव असल्याने आपण ते भांडे आपलेच आहे, हे ‘पुराव्याने शाबित’ करु शकतो.. […]

कस्टम शाॅपी

त्याकाळी वर्तमानपत्रात कस्टमने जप्त केलेल्या वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांच्या जाहिराती असत. काही जाहिराती ‘छोट्या जाहिराती’ सदरात येत असत. पहिल्या पानावर जाहिरात असायची ती ‘घरोंदा’ कस्टम शाॅपीची! त्या जाहिरातीत परदेशी घड्याळे, पर्फ्युम, कॅमेरे, व्हिडिओ कॅमेरे, टेप रेकाॅर्डर, व्हिसीआर, खेळणी यांची यादी व किंमती दिलेल्या असत. […]

टेलिफोन

आमच्या टेलिफोनमुळे काही विनोदी घटनाही अनुभवास येत होत्या. जेंव्हा सुरवातीला आमच्याकडे टेलिफोन आला तेव्हा आमच्या एका शेजाऱ्याने त्याच्या बायकोला आमच्या फोनवर फोन केला. मी त्याच्या बायकोला जाऊन बोलावून आणलं. यापूर्वी फोनवर कधीही न बोललेली बाई टेलिफोनचा रिसिव्हर हातात धरतात थरथर कापू लागली जणू तिला मलेरियाचा ताप भरलेला असावा. आमच्याच शेजारची दुसरी एक स्त्री टेलिफोनचा रिसिव्हर कानापासून तीन चार इंच लांब धरायची. […]

कुंकू… काल आणि आज

भारतीय स्त्रीला सौभाग्याच्या या लेण्याची पूर्वापार परंपरा आहे. शेकडो वर्षांपासून स्त्री कपाळावर लाल रंगाचा कुंकवाचा टिळा लावत आलेली आहे. खेडेगावात कुंकू लावण्याच्या पद्धतीवरुन त्या स्त्रीच्या नवऱ्याचा व्यवसाय कळत असे. राजा रवीवर्माच्या अनेक देवी, अप्सरा, ऋषिकन्यांच्या चित्रांतून आपण त्यांच्या कपाळावर लाल रंगाची खूण पाहिलेली आहे. […]

1 3 4 5 6 7 16
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..