नवीन लेखन...

जुन्या आठवणींना उजाळा देणारे लेखन

फोर्टमध्ये फिरताना – भाग १

फोर्टमधल्या अनेक आयकॉनिक इमारतींच्या आत जाऊन त्या बघण्याचं भाग्य मला लाभलं. मात्र त्यावेळी आजच्यासारखं मोबाईलमधल्या कॅमेर्‍यांचं प्रस्थ नसल्याने दुर्दैवाने फोटो मात्र काढले गेले नाहीत. ती रुखरुख कायमची रहाणार आहे. […]

पाणी पाणी

माझा जन्म नागपूर मधील १९४२ च्या प्रचंड उन्हाळयातला. मी बहुदा पाणी पाणी म्हणून पहिले रडणे सुरू केले असावे. जन्मत: दुधापेक्षा मला पाणी जास्त प्रिय आणि यामुळेच पाण्याने सतत माझा पिच्छा पुरवला आहे. […]

रेल्वे स्थानकांवरील झगमगीत “वजन” यंत्रे

या मशीनवर उभं राहून त्यात नाणं टाकलं की एक चक्र फिरायचं.. ते फिरताना डिस्को लाईटस लागायचे आणि चक्र थाबलं की एक टिकिट बाहेर यायचं. या तिकिटावर तुमचं वजन छापलेलं असायचं, सोबत तुमचं भविष्यही असायचं आणि शिवाय एखाद्या फिल्मस्टारचा फोटोपण असायचा. […]

आठवणीतले गिरणगाव

लालबाग च्या आसपासचा हा परिसर ह्या परिसरात असलेल्या कापडांच्या गिरण्यांमुळे गिरणगाव म्हणून प्रसिद्ध होता. तीन शिफ्ट मध्ये जाणाऱ्या कामगारांचा लोंढा हा परिसर रात्रंदिवस जिवंत ठेवीत असे. गिरण्यांच्या भोंग्यावरून टाईम लावला जात असे. फूट-पाथ प्रशस्त होते आणि तरीही भरलेले असत. त्यावर फेरीवाले, भाजीवाले असायचे, कामगार वर्ग आपल्या छोट्या मीटिंगी येथेच करत. दुकानांमधून गर्दी डोकावत असे. रात्री २ ते सकाळी पाच एवढा वेळ हा परिसर त्यातल्या त्यात शांत असे. गिरण्यांचा संप झाल्यावर आणि पुढे गिरण्या बंद होऊन इथला कामगार वर्ग देशोधडीला लागल्यानंतर ह्या गिरणगावाची रया गेली ती पुन्हा आलीच नाही. […]

‘लाय लाय लाय लाय लायेकरणी’ कोळीगीताच्या निमित्ताने

“लाय लाय लायेकरणी” हे असेच एक कोळीगीत. त्यात त्याकाळच्या वेगळ्या प्रदेशात राहाणाऱ्या कोळी बायकांच्या विशिष्ट वेषभूषेवरून, चाली रीती वरून, बोली भाषेवरून ती कोणत्या गावातील  आहे हे ओळखता यायचे. ह्या गाण्यात त्याचेच वर्णन केले आहे. नीट ऐकाल तर त्यावेळच्या मुंबईत असणाऱ्या गावांची नावे (वेसाव, भांडुप, वरळी, दांडा, मालवणी, कुलाबा, शिवडी, शिव, वसई, कर्जत माहीम वगैरे) आपल्या कानावरून जातील. […]

कोकणात विमान भरारी

कोकणाच्या प्रवासाचे हे असे टप्पे – जलमार्ग, खुष्कीचा मार्ग (रस्ते), रेल्वे मार्ग आम्ही पाहिले आणू अनुभवले. पण विमानतळ तयार होऊन येथे हवाई वाहतूक सुरु होईल असे वाटले न्हवते. अजून वाशी – नवी मुंबई येथे विमानतळ व्हायचा आहे, त्यापुढे कोकणाला विमान उड्डाणाला प्रायोरिटी असेल असे वाटले न्हवते. […]

देशाटन ते पर्यटन; माझ्या नजरेतून

एकूणात गांव किंवा तिर्थयात्रा या पलिकडे त्या काळात देशाटन नव्हतं..परदेश तर खुप दुरची गोष्ट होती, आपला प्रान्त, आपला देश बघावा असंही काही फार जणांना वाटत नव्हतं. मुळात त्यावेळच्या बहुतेकांचं जग सिमित होतं. उत्पन्न मर्यादीत. एक जण कमावणार आणि दहा जण खाणार. महत्वाकांक्षाही सिमित, म्हणजे देन वेळचं जेवण, सणासुदीला एखादं लुगडं-कापड आणि मुलांची व गांवावरुन शिकण्यासाठी आलेल्यांचं शिक्षण, एवढीच. […]

मुंबैच्या टॅक्सीला लागलेल्या हळदीची गोष्ट

मुंबयची काली-पिली म्हंजे, मुंबयची काळी-पिवळी टॅक्सी. मी पाहिली ती देखणी, आटोपशीर, बांधेसूद फ्याट (‘फियाट’) गाडी. ॲंबेसिडर टॅक्सी मुबईत क्वचितच दिसायची आणि तिच्यावर ‘मोठी टॅक्सी’ असं ठसठशीतपणे लिहिलेलं असायचं. टॅक्सी असो कोणतीही, पण त्या काळात ड्रायव्हर असायचा तो सरदारजीच..! त्या काळात टॅक्सी म्हणजे काय तरी अप्रुपच वाटायचं. खाजगी गाड्या तर अगदी दुर्मिळ. टॅक्सीत बसणं म्हणजे स्वर्गप्राप्ती झाल्यासारखंच वाटायचं. […]

डोके ज्याचे त्याचे

झिरो कट ! आता पुन्हा या फॅशनची चालती आहे ! कानाच्या वर चार बोटाच्या पट्ट्यातले केस या कानापासून व्हाया मानगूट ते त्या कानापर्यंत झिरो मशीनने काढून टाकतात. ट्रॅकटरने शेत नागरल्यासारखं दिसत ! त्यात एक ठळक पाय वाट पण बरेचदा केली जाते ! टाळू वर केसांचं ‘ओयासिस’ तसेच ! या ‘ओयासिसचे पुन्हा व्हेरिएशन्स आहेतच, मागे, पुढे नायतर उभे शिंगा सारखे ! […]

1 8 9 10 11 12 16
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..