नवीन लेखन...

व्यवस्थापन

एकेक दिवा वाटू या !

आपण शेवटचे दमदार हस्तांदोलन कधी केले आहे, आठवतंय? आणि हो, दुसऱ्याला शेवटची घट्ट, उबदार मिठी उसासून कधी मारलीय? म्हटलं तर या छोट्या, नगण्य गोष्टी -इतरवेळी त्यांच्याकडे सहसा लक्षही दिले जात नाही. पण अचानक या क्षुल्लक भासणाऱ्या “सहवासाचे” आवर्तन महत्वाचे ठरले आहे. या “ना स्पर्श” कोरोना पर्वात आपल्याला खिळखिळे करण्याचे सामर्थ्य आहे, हे आत्ता आत्ता लक्षात येऊ लागले आहे. […]

संकटकाळात नेतृत्वाची कसोटी !

संकटाला तोंड देण्यासाठी आणि हाताळण्यासाठी मानवता हा गुणविशेष नेतृत्वाने आत्मसात केला तर प्रतिसाद अधिक शीघ्र आणि संकटमुक्ती अधिक वेगाने शक्य  होईल. कृतीसाठी सामुहिक  स्वर , स्वतःबद्दलची मक्तेदारी आणि इतरांचे आपल्यावरील दायित्व यांचा विचार नेत्याला करावाच लागतो. […]

मंदीतील सुवर्णसंधी

सरकारची धोरणे,वाढते प्रदूषण कमी करण्याचे आव्हान आणि हळूहळू होणारी जनजागृती या मुळे ग्राहक इलेक्टिक वाहनाकडे वळायला नुकतीच सुरवात झाली आहे. हजारो कोटींची गुंतवणूक विद्युतवाहना मध्ये होत आहे. कोव्हिडं चा हा काळ आणि वाहनवर्गाचे संक्रमण लवकरच संपेल आणि पेट्रोल/डिझेल व विद्युत वाहनांना लवकरच चांगले दिवस येतील. ज्या उद्योजकांना वाहन क्षेत्रात व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी, विशेषतः ज्यांना ऑटो डीलर बनायचे आहे त्यांच्यासाठी येते एक वर्ष खूप महत्वाचे आहे. तुम्ही या वर्षात विद्युत दुचाकी वाहनांची डीलरशिप खूप कमी गुंतवणूकीत घेऊ शकता आणि 2025 नंतर येऊ घातलेल्या विद्युत वाहन क्रांतीचा घटक बनून, प्रचंड नफा व स्थैर्य मिळवू शकता. […]

सल्ला – दान आणि व्यसन

प्रस्तुत लेखात सल्ला / उपदेश देण्याच्या समाजाच्या / लोकांच्या सर्वव्यापी सवयीला / व्यसनाला नेमकी कोणती मानसिकता आणि कारणे असावीत, ते दान की व्यसन, त्याच्या वाट्याला  जाणे का टाळावे वगैरेचा एक अनुभव-जन्य लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न केला आहे.  […]

ससा आणि कासव : नव्या भूमिकेत

सकाळी दहा वाजेपासून कुणाशीही काहीही न बोलता त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली…… त्यांची ही कृती पाहून रस्त्याने जाणारे मुले मुली आणि इतर मंडळी त्यांच्या कामात मदत करू लागली….. केक गम यांच्या गटात सामील होत होता….. दोनाचे दोन हजार स्वयंसेवक कधी झाले हे कोणालाही कळले नाही आणि संपूर्ण शहरातला कचरा अवघ्या दोन तासात गोळा करून झाला….. आता त्या शहरातली प्रत्येक नाली, प्रत्येक फुटपाथ, प्रत्येक सिग्नल, प्रत्येक चौक आणि प्रत्येक रस्ता स्वच्छ दिसत होता. […]

कोरोना ‘चक्रव्यूह’

कुरुक्षेत्रावर द्रोणाचार्यांनी रचलेल्या चक्रव्यूहात अर्जुनपुत्र अभिमन्यू जसा असाह्य झाला होता, तीच हतबलता आज आपणही अनुभवतो आहोत. अभिमन्यूला कौरवांनी गरडा घातला होता, आपल्याभोवती कोरोनाचा विळखा आवळला जातोय. फरक इतकाच की, अभिमन्युला चक्रव्यूह भेद करण्याचं तंत्र अवगत नव्हतं त्यामुळे तो ते छेदून बाहेर पडू शकला नाही. आपल्याला ते ज्ञात आहे. परंतु, ते तंत्र वापरण्यास लागणारं ‘संयमा’स्त्र काहीसं बोथट झाल्याने आपली शिकस्त होतांना दिसतेय. […]

सुट्टीमुळे कार्यक्षमता वाढेल का?

शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना ‘सरकारचे जावई’ म्हणण्याचा एकेकाळी रिवाज होता. कदाचित, सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारे अधिकार आणि दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधा पाहून मत्सराने हा शब्दप्रयोग रूढ झाला असावा! काहीही असो..पण एक गोष्ट मात्र काबुल करावी लागेल कि शासकीय कर्मचाऱ्यांना सरकार कायम जावयासारखी वागणूक देत आलं आहे. […]

मुंबईच्या पोलीस दलाचे सक्षमीकरण कसे करावे ?

आज मुंबई आणि महाराष्ट्रासमोर सुरक्षेची अनेक आव्हाने आहेत.पोलीस दलाचे सक्षमीकरण ही काळाची आवश्यकता आहे ! पोलीस यंत्रणा अजुन सक्षम होण्यासाठी पोलीस प्रशासनात काय सुधारणा करणे अपेक्षित आहे, त्यावर संक्षिप्त विचार या लेखात दिले आहेत. […]

कॅपॅसिटर कृषिपंपाचा तारक, तर ऑटोस्विच मारक

वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषिपंप तत्काळ सुरू करण्याच्या उद्देशाने ग्राहकांनी कृषिपंपांना ऑटोस्विच बसविले आहेत. त्यामुळे परिसरातील सर्व कृषिपंप एकाच वेळी सुरू होऊन रोहित्रावरील भार अचानक वाढतो. परिणामी रोहित्र जळणे, वीजवाहिन्या बंद वा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढते. यातून होणारी गैरसोय व नुकसान टळावे तसेच सुरळीत व योग्य दाबाचा वीजपुरवठा मिळावा, यासाठी शेतकर्‍यांनी कृषिपंपांना ऑटोस्विचऐवजी कॅपॅसिटर बसवले पाहिजे. […]

योग्य विचारातून वैभवसंपन्न व्हा

एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की तुम्हीसुद्धा योग्य विचारांनी अशा प्रकारचे वैभव मिळवू शकता. पॅरामेश्वराचीसुद्धा प्रत्येकाच्या बाबतीत हीच इच्छा असते. […]

1 3 4 5 6 7 13
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..