नवीन लेखन...

आई-बाबा, आजी-आजोबांकडून ऐकलेल्या या जुन्या गोष्टींचा संग्रह !

स्वप्न आणि सत्य

स्वप्न आणि सत्य यांच्यात एकच ‘श्रेष्ठ कोण?’ यावरून भांडण सुरू झाले. ‘स्वप्न’ म्हणाले, मीच श्रेष्ठ. कारण कोणताही माणूस आधी स्वप्ने पाहातो आणि नंतर ते सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्न करतो. त्यामुळे मीच तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. त्यावर ‘ सत्य’ म्हणाले, अनेकवेळा सत्य हे कल्पनेपेक्षाही ( म्हणजेच स्वनापेक्षाही) अतिशय वास्तववादी असते. त्यामुळे मीच तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. दोघांचे भांडण विकोपाला गेले. […]

प्रयत्नांती परमेश्वर

बर्‍याच वर्षांपूर्वी इटलीतील एका शहरातील एका शाळेत घडलेली ही एक घटना. वर्गात एक शिक्षक अतिशय तन्मयतेने शिकवित होते. त्याचवेळी वर्गाच्या खिडकीच्या बाहेर एक मुलगा उभा राहून ते काय शिकवितात हे लक्ष देऊन ऐकत होता. त्या मुलाचे कपडे ठिकठिकाणी फाटलेले होते, पायात चप्पलही नव्हती. हा मुलगा खिडकीपाशी उभा राहिल्याने वर्गातील मुलांचे लक्ष सारखे त्याच्याकडे जात होते. त्या […]

सर्वात वेदनादायक दंश कोणाचा?

एक राजा होता. एके सायंकाळी तो राजवाड्याभोवती असलेल्या बागेत फिरायला गेला. तेथे एका झाडावर मधमाशांचे पोळे होते. असंख्य मधमाशा ये-जा करत होत्या. राजा थोडा वेळ तेथे थांबून त्या मधमाशांचे निरीक्षण करू लागला; परंतु तेवढ्यात एकाएकी एक मधमाशी खाली आली व राजाच्या हाताला दंश करून उडून गेली. राजा कळवळला. बरोबरच्या सैनिकांची धावपळ झाली. गांधीलमाशीच्या दंशामुळे राजाचा हात […]

हुशारपक्षिणी

एक शेतकरी होता. त्याने दरवर्षीप्रमाणे आपल्या शेतात भाताचे पीक लावले होते, कारण त्या भागात चांगला पाऊस पडायचा. त्या वर्षीही चांगलाच पाऊस पडला व हळहळू भाताचे पीक चांगले आले. त्या भाताच्या पिकातील एक मोकळी जागा पाहून एका पक्षिणीने आपल्या पिलांसाठी घरटे केले. ती पक्षीण आणि तिची चार-पाच पिले तेथे मजेने रहात होती, कारण शेतकर्‍याला त्या घरट्याची कल्पनाच […]

मनाची चंचलता

मनावर ताबा मिळविणे, त्याचा संयम करणे किती कठीण गोष्ट आहे ! मनाची एखाद्या वेड लागलेल्या माकडाशी तुलना केली जाते ती अगदी योग्यच होय. एक माकड होते. माकडाचीच जात ती! सगळ्या माकडांप्रमाणेच तेही स्वभावतःच चंचल होते. त्याचा तो स्वभावसिद्ध चंचलपणा कमी वाटला म्हणून की काय, एकाजणाने त्याला यथेच्छ दारू पाजली. माकडाच्या चंचलपणाला आणखीच बहर आला. भरीत भर […]

शेरास सव्वाशेर

धनचंद नावाचा एक हिऱ्याचा एक व्यापारी होता. अनेकदा अत्यंत मौल्यवान हिरे घेऊन तो प्रवास करायचा. खरे तर किमती हिरे घेऊन प्रवास करायची मोठी जोखीमच होती. परंतु धनचंद हा अतिशय चतुर व प्रसंगावधानी होता. त्यामुळे आलेल्या संकटातून तो बऱ्याच वेळा वाचला होता. एकदा दुसऱ्या एका हिरे व्यापाऱ्याशी सौदा करून धनचंद काही किमती हिरे घेऊन रेल्वेने प्रवास करीत […]

गायन वादन करणारा हत्ती

अकबर बादशाहच्या पदरी असलेल्या बिरबलाच्या चतुरपणांच्या गोष्टी प्रसिद्ध आहेत. त्यातीलच ही एक कथा. अकबराच्या दरबारात एकदा एका गवयाचे गाणे झाले. ते गाणे अकबराला इतके आवडले, की त्याने त्या गाण्याला एक हत्तीच भेट दिला. ती भेट पाहून गवई आनंदी व्हायच्या ऐवजी दुःखीच झाला. कारण आधीच त्याच्या कुटुंबाचा चरितार्थ नीट चालत नव्हता. त्यात पुन्हा एवढ्या मोठ्या हत्तीला पोसणे […]

गाठोडे चोरणारा साधू

निराश असा एक माणूस नदीकाठी बसला होता. बाजूला त्याचे गाठोडे पडले होते. नदीच्या प्रवाहाकडे तो उदासपणे पहात होता. तेवढ्यात एक साधू तिथे आला आणि त्याच्या शेजारी उभा राहिला. दोघांची दृष्टादृष्ट झाली. त्या माणसाच्या डोळ्यात अश्रू आलेले पाहून साधू सहानुभूतीने त्याची विचारपूस करू लागला. तो माणूस म्हणाला, ‘माझे नशीबच वाईट आहे. जवळ पैसे नाहीत, कष्ट उपसूनही वीट […]

1 11 12 13
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..