नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

नवतारुण्याची प्रगल्भ डहाळी

वर्तमानात वयाची वाढ तर थांबवता येत नाही नि निसर्गाने ठरवलेले श्वास तर घ्यावेच लागणार असतात. मग हेच जर सत्य आहे, तर ते सत्य ‘सुंदर’ का करायचे नाही? ज्या प्रज्ञेने वैज्ञानिक झेप घेऊन चंद्र काबीज केला, त्याच प्रज्ञेने हे ज्येष्ठपण अधिकाधिक सुसह्य, आनंदमय का करता येऊ नये? स्वानंदी सुरेल व ‘भाव’ जपून नवी ज्येष्ठालये उभारणे, आता जाणिवेने […]

आमची ‘विदयापीठे’

या विद्यापीठांचा काही अभ्यासक्रम नसतो , फी नसते , गृहपाठ नसतो ,पदवी नसते , ( तरीही शहाणी माणसे तुम्ही कोणत्या “घराण्याचे ” हे पटकन ओळखू शकतात ) पुस्तके नसतात . सगळी अनुभूतीची पाठशाळा ! AICTE नको ,NBA नको, UGC नको. […]

‘आशिकी’

काही माणसं ‘हृदयात’ घर करतात तर काही ‘मनात’ घर करतात… गणेशने मात्र त्याची गाणी ऐकणारांच्या ‘कानात घर’ केलंय. […]

काळ बोले कळ काढुनी (सुमंत उवाच – १२२)

एखाद्या गोष्टीचा त्रास होणे, दुःख होणे हे निसर्गाच्या नियमानुसार योग्य आहे पण, जर तेच दुःख गोंजारून पुढे गेले तर आयुष्याला वेग येण्या ऐवजी हातपाय लटपटायला लागतात. प्रगतीचा वेग कमी होतोच शिवाय वैद्याचा खर्च वाढतो. […]

कुस्करलेली कळी – उमललेले फुल – २०

तोंगशे एकटेच ऑफीस मध्ये मौशूच्या जीवनात घडलेल्या प्रचंड उलथा पालथीच्या घटनांचा मेळ लावण्याचा प्रयत्न करत होते. तिच्या आयुष्याची झालेली राखरांगोळी पाहून त्यांचे मन हेलावून गेले होते. […]

वाघीण

किसण्याच्या पाठीतून रक्ताचे थारोळे वाहायला लागले होते,वाघ त्याच्याकडे डरकाळी फोडत क्रूर नजरेने बघत होता. त्याच्या पंज्याने किसन्याचा शर्ट फाटला होता रक्ताने संपूर्ण माखला होता,कसातरी किसन्या उठण्याचा प्रयत्न करत असताना वाघाने पुन्हा त्याच्या दिशेने झडप घातली. […]

‘दिठी’

देवाची भक्ती या सगळ्या मध्ये आपला काही स्वार्थ असतो का? की नाही? असेल तर रामजी माणूस म्हणून बरोबर आहे आणि नसेल तर मग तो दु:खी का आहे?खूप वेळ विचार करत होते. स्वतःचे व अनेक लोकांचे अनुभव आठवले. आणि वाटले की आपण सामान्य माणसं हे सगळं नाही समजू शकत. […]

भूतांपरस्परे जडो (माझी लंडनवारी – 12)

आठ-सव्वाआठची वेळ असेल, मी परत एकटीच गाणी ऐकत बसले होते आणि अचानक दारावर पुन्हा टकटक झाली. दार उघडले तर संतोष आणि अजून दोन अनोळखी चेहरे दारात उभे! मग संतोष आत आला. […]

कोकणची माती आणि तिचे संरक्षण

कोकणच्या मातीमध्ये रुजणारे हे सर्व वृक्ष या भागाला समृध्दी तर देतीलच पण वृक्षांच्या उत्पादनावर आधारित शेकडो कुटिर उद्योग कोकण भूमीला स्वयंसिद्धतेकडे स्वावलंबनाच्या महाद्वारामधून घेऊन जाऊ शकतात. कोकणच्या मातीचे संरक्षण करावयाचे असेल तर या भूभागाचा विकास तेथील निसर्गाला बरोबर घेऊनच करावयास हवा. […]

ज्ञानवृक्षाखालील स्वरवृक्ष !

भुसावळची तापी,सांगलीची कृष्णा, ऋषिकेशची गंगा, नाशिकची गोदावरी अशा नद्यांच्या तीरी उभे राहण्याचे अनेक प्रसंग माझ्यावर आलेत. शेवटी नदीचे ” नदीपण ” तिच्या प्रवाही असण्यात असते. तद्वत ” जयपूर ” असो, वा “किराणा ” किंवा “आग्रा ” घराणे असो , संगीतात प्रवाहीपण आहे का हे माझ्या दृष्टीने महत्वाचे ठरते. […]

1 192 193 194 195 196 489
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..