नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

‘दिठी’

देवाची भक्ती या सगळ्या मध्ये आपला काही स्वार्थ असतो का? की नाही? असेल तर रामजी माणूस म्हणून बरोबर आहे आणि नसेल तर मग तो दु:खी का आहे?खूप वेळ विचार करत होते. स्वतःचे व अनेक लोकांचे अनुभव आठवले. आणि वाटले की आपण सामान्य माणसं हे सगळं नाही समजू शकत. […]

भूतांपरस्परे जडो (माझी लंडनवारी – 12)

आठ-सव्वाआठची वेळ असेल, मी परत एकटीच गाणी ऐकत बसले होते आणि अचानक दारावर पुन्हा टकटक झाली. दार उघडले तर संतोष आणि अजून दोन अनोळखी चेहरे दारात उभे! मग संतोष आत आला. […]

कोकणची माती आणि तिचे संरक्षण

कोकणच्या मातीमध्ये रुजणारे हे सर्व वृक्ष या भागाला समृध्दी तर देतीलच पण वृक्षांच्या उत्पादनावर आधारित शेकडो कुटिर उद्योग कोकण भूमीला स्वयंसिद्धतेकडे स्वावलंबनाच्या महाद्वारामधून घेऊन जाऊ शकतात. कोकणच्या मातीचे संरक्षण करावयाचे असेल तर या भूभागाचा विकास तेथील निसर्गाला बरोबर घेऊनच करावयास हवा. […]

ज्ञानवृक्षाखालील स्वरवृक्ष !

भुसावळची तापी,सांगलीची कृष्णा, ऋषिकेशची गंगा, नाशिकची गोदावरी अशा नद्यांच्या तीरी उभे राहण्याचे अनेक प्रसंग माझ्यावर आलेत. शेवटी नदीचे ” नदीपण ” तिच्या प्रवाही असण्यात असते. तद्वत ” जयपूर ” असो, वा “किराणा ” किंवा “आग्रा ” घराणे असो , संगीतात प्रवाहीपण आहे का हे माझ्या दृष्टीने महत्वाचे ठरते. […]

अधीर मन झाले

आपल्या जीवनप्रवासात असंख्य माणसं भेटत असतात. त्यांच्याशी आपले स्नेहबंध जुळतात. काही काळानंतर किरकोळ कारणावरुन आपण त्यांना दूर करतो. समज गैरसमजातून दिवस, महिने, वर्षे उलटून जातात. वेळीच पुन्हा ती संपर्कात न आल्यास दुरावा वाढत जातो. […]

टाळ हाती असते तेव्हा (सुमंत उवाच – १२१)

हातातली टाळ वाजली की त्यातून येणाऱ्या आवाजाचा एक वेगळाच आनंद आपल्या शरीरात फुलून येतो अन आपणही त्या सुरात बेधुंद होऊन देवाच्या नामस्मरणात तल्लीन होऊन जातो. […]

कुस्करलेली कळी – उमललेले फुल – १९

संगीता रात्री ९ नंतर कामावरून परतत असे. अखंड बॅंकेचा कामात वाहून घेणे हेच तिचे जीवन होते. त्यांच्या घरातील फोनची घंटा वाजू लागली, तिच्या आवाजा वरून ती ट्रंक कॉलची आहे हे आजींच्या लक्षात आले. […]

कटि पतंग

भूतकाळातील ऐश्वर्य. वैभव. लोकांनी दिलेला मान आणि बरेच काही आठवत असते. पण कुणीही आपल्याला विचारत नाहीत हे लक्षात आले की वाईट वाटते. कोलमडून जातो. शेवटी आपणहून अलिप्त होऊन स्थितप्रज्ञ होतो.. […]

नवीन इनिंग्स (माझी लंडनवारी – 11)

मग तीन -चारच्या सुमारास प्रोजेक्ट लीडरने बोलावले. त्याच्या पुढचा डेस्क खाली होता. त्या कॉम्प्युटरवर त्याने एक इंटरफेस ओपन करून ठेवला होता आणि अगम्य भाषेत मला ते काम करायला सांगितले. […]

घटा घटांचे रुप आगळे

सदाशिव पेठेत माझं बालपण गेलं. रस्त्यावरच घर असल्याने जाता येता रस्त्यावरील माणसांचं निरीक्षण करण्याचा मला त्यावेळी छंदच लागलेला होता. कळायला लागल्यापासून केशव कुलकर्णीला मी पहात होतो. […]

1 191 192 193 194 195 487
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..