नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

रोमहर्षक… लंडन ! (माझी लंडनवारी – 18)

प्रियांकाने लंडनला आल्यापासूनचे सगळे किस्से सांगितले. ती एका स्काऊटच्या कॅम्पसाठी इथे आली होती. त्यांच्या ग्रुपला नॅशनल लेव्हलवर गोल्ड मेडल मिळाले होते आणि त्या ग्रुपला लंडन मधल्या ग्लोबल स्काऊट कॅम्पसाठी इन्व्हिटेशन होते. तो कॅम्प नऊ दिवसांचा होता. जंगलामध्ये टेंट मध्ये रहात होते ते! किती थ्रिलिंग अनुभव होते तिचे. […]

एक परीस स्पर्श – भाग १

आपल्या या कथेतील नायक विजय ! तो ही त्या परिसासारखाच आहे. त्याच्याही वाट्याला आले आहे परिसाचे जगणे ! कसे ? ते या कथेतून आपल्याला हळू हळू उलगडत जाईलच…तसं पाहिलं तर परीस हा एक दिसायला सामान्य दगडच असतो असं म्हणतात. तसाच आपला नायकही दिसायला एक सामान्य नव्हे अतिसामान्य माणूसच आहे… […]

“ग्रेस “म्हणजेच अभिजातता !

ग्रेस यांच्या कवितावाचनाची एक CD मी काही वर्षांपूर्वी विकत आणली आणि हे व्यक्तिमत्व माझ्यावर प्रभाव टाकून गेले. सो कॉल्ड “दुर्बोधतेचा “शिक्का त्यांच्यावर मारून मराठीजन मोकळे झाले असले तरी ही व्यक्ती मराठी शब्दांना ज्या अलौकिक उंचीवर नेऊन ठेवते त्याचे विस्मयकारक अनुभव मी अनेकवेळा घेतले. […]

वाघीण – भाग ३

दुपारचे  दोन वाजले होते,  रखरखत्या उन्हात सुगंधा घराकडे निघाली होती. सकाळपासून अन्नाचा एक दाणा सुध्हा पोटात गेला नव्हता. त्यामूळे तिला थकवा आला  होता. आपली अशी अवस्था आहे, तर आपल्या चिमुकल्याच काय हाल झाले असतील, या विचारत ती होती. […]

भरत-भेट

शुटींग सकाळी आठला सुरु झालं होतं.. मला जायला थोडा उशीर झाला.. तोपर्यंत भरत जाधवचा सीन शूट झालेला होता.. साधा झब्बा व धोतर नेसलेल्या अभिनेत्याची व माझी, ती दुसरी ‘भरत-भेट’ होती. […]

ठाण्याची रंगपरंपरा

आज महाराष्ट्राच्या सह-सांस्कृतिक राजधानीचा मान मिरवणाऱया ठाणे शहराचा साधारणत सातव्या शतकापासून लिखित इतिहास आढळतो. या इतिहासात डोकावल्यावर लक्षात येते की, इतिहासकाळात ठाणे हे वैभवाच्या शिखरावर असलेलं, भरभराटीस आलेलं, व्यापारी उलाढालींचे आणि राजकीय हालचालींचे केंद्र असलेलं संपन्न नगर होतं. नाटकाच्या संदर्भातील पहिली नोंद मिळते ती रावबहादूर भास्कर दामोदर पाळंदे यांच्या संदर्भातील. ऑफिशिएटिंग मराठी ट्रान्सलेटर म्हणून सरकार दरबारी काम पाहिलेले पाळंदे साहित्यिक होते.  ‘गीत सुधा’ आणि ‘रत्नमाला’ हे ग्रंथ त्यांनी लिहिले होते. मुख्य म्हणजे ‘विक्रमोर्वशिय’ या संस्कृत नाटकाचे त्यांनी मराठीत गद्य पद्यात्मक भाषांतर केले होते.  तिथून ठाण्याची नाट्यपरंपरा उगम पावली, असं म्हणता येईल. […]

मकर संक्रमण !

१५ मे १९८३ साली कु. राजलक्ष्मी भगवान नाईक ही सौ. राजलक्ष्मी नितीन देशपांडे बनून माझ्या आयुष्यात आली. म्हणून आम्हां उभयतांसाठी हे संमेलन आणि व्यासपीठ जीवनाचा एक अविभाज्य घटक बनून राहिले आहे. त्यानंतर इस्लामपूरला असताना आम्ही नियमित या संमेलनात जात असू. […]

छडी रे छडी

वसुधाला, वसंतरावांच्यात झालेला हा अचानक बदल सुखावत होता.. त्यांनीही वसंतरावांना, मनापासून साथ देण्याचे ठरविले. […]

संक्रमण !

माझं नवं ( आणि दहावं ) पुस्तक ” पांढरा पडदा ” येतंय या महिना अखेरीपर्यंत ! हे पुस्तक मी माझ्या पत्नीला अर्पण केलंय. फार पूर्वी तिने “वाटेवरच्या कविता ” हा तिचा काव्यसंग्रह मला अर्पण केला होता. ही उशिराची रिटर्न गिफ्ट ! संक्रांतीच्या पर्वाच्या पार्श्वभूमीवर !! […]

आयुष्याचा गुंता आणि गुंतणं

आपल्याला ना सगळंच हवं असतं. काही ना काही सांगायचं असतं, समोरच्याने ते ऐकायला हवं असतं, नाही ऐकलं तर आपल्याला ते फार लागतं, मग आपल्याला समजून घेत नाहीत म्हणून आपण गळा काढतो. एकूण काय तर सगळ्या दोऱ्या आपल्या हातात हव्या असतात. […]

1 188 189 190 191 192 489
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..