नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

आम्ही सार्‍याच गांधारी

किती युगं लोटली गांधारी होऊन गेल्याला. गांधारी! नव्हे, नव्हे- पतिपरायण गांधारी. सती-साध्वी गांधारी. किती शतकं उलटली

पतिपरायण गांधारी होऊन गेल्याला. काळाची उलथापालथ झाली. कलियुग अवतरलं. वर्णसंकर झाला. वर्णसंकराचा बाऊ वाटेनासा

झाला. माणसांचीही उलथापालथ झाली. पोशाख बदलले. आचार-विचार बदलले. पाश्चात्त्य-पौर्वात्य भेदाभेदातलं अंतर फारसं उरलं

नाही. स्त्री- पुरुषांच्या कुटुंबातल्या जबाबदाऱ्यांची सरमिसळ झाली. आर्थिक सहभागाची तिला मुभा मिळाली. शिक्षणाची दारं तिच्यासाठी खुली झाली. बदलली नाही ती स्त्रीविषयक धारणा. पुरुषांची तर नाहीच नाही. सुखासुखी हाती आलेले सर्वाधिकार

फारच थोडे सोडू शकतात. बव्हंशी (मूठभर 20 टक्के सोडून) स्त्रीचीही स्वत:विषयीची धारणा बदलली नाही. पतिपरायणतेचं बिरुद मिरविण्याची स्त्रीची हौस फिटली नाही आणि पतिपरायण स्त्री ही पुरुषाची हावही सुटली नाही. कारण आम्हाला हव्या आहेत फक्त गांधारी.
[…]

कविता (१) / प्रोडक्ट कविता

शब्दांच्या साच्यात आम्बट – गोड, कडू – तिखट भावनांचा रस ओततो आणि तैयार करतो फास्टफूड सारखा स्वादिष्ट प्रोडक्ट ‘कविता’. — विवेक पटाईत

न्हैचिआड

वेंगुर्ल्याहून शिरोड्याकडे जातान वाटेत मोचेमाडची खाडी लागते. ही खाडी ओलांडली की डाव्या कुशीला जे गांव येतं ते आमचं न्हैचिआड. न्हय म्हणजेच नदीच्या अथवा खाडीच्या आड ते न्हैचिआड ! आमचं हे न्हैचिआड डोंगराच्या उतारावर वसलेलं आहे. गावात आम्हा इनामदार रेग्यांची पाच घरं आणि इतर शेतकर्‍यांची म्हणजेच इथल्या भाषेत कुळांची चाळीस पन्नास घरं. गावात वरचा वाडा आणि खालचा वाडा असे दोन भाग येतात. आमची घरं खालच्या वाड्यातली.
[…]

मैत्र आत्म्याला भिडणारे (फ्रेंडशिप डे विशेष)

कोणाचे तरी कोठे तरी मैत्रीचे नाते जुळते. बऱ्याच वेळा मैत्री व्यक्तीसापेक्ष असते. पण तसा विचार केला तर आवडीच्या क्षेत्रात कार्यरत असल्यास त्या क्षेत्राशीही मैत्रीचे बंध निर्माण होतात. मग अशा मैत्रीला काय नाव द्याल ? कशी असेल त्याची अनुभूती ? जाणून घ्यायचेय ? नेमके हेच प्रश्न समोर ठेवून आम्ही बोलते केले प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि प्रकाश आमटे यांना…
[…]

मिठाई

त्यानी मुठ उघडुन दाखवली, हातातले ५० रु. आजीकडे दिले व शेठनी “जा मी तुला माफ़ केलेय. हे पैसे घे आणि घरी जा या पैशाची मिठाई खा.” अस सांगीतल्याच सांगीतल. आजीला सुजलेला सख्याचा गाल दिसत होता, उपाशी दुसरी दोन नातवंड दिसत होती. आज घरात खायला काहीच नव्हत. आणखीन दोन दिवस उपाशी राहाव लागणार होत. तीनी ते पैसे देवासमोर ठेवले. सख्याला जवळ घेतल त्याच्या दुखर्‍या गालावरुन हळुवार हात फ़िरवत म्हणाली “सख्या, अरे ते मोठे लोक आहेत. आपण फ़ार लहान आहोत. शेठेनी मारल तर काय होतय ?तेच आपले अन्नदाते आहेत.” […]

1 185 186 187 188 189 198
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..