विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

निवृत्ती नंतरच्या व्यथा !

सगळयाच निवृत्तीधारकांसं निवृत्ती नंतर काही दिवस व महिने बरे वाटते कारण रोजच्या धकाधकीच्या घाईगर्दी व लोटालोटीचा ट्रेनचा प्रवास सरलेला असतो. मुख्य म्हणजे मस्टर नसते त्यात पुरूषांना सकाळी आरामात ऊठता येते त्यामुळे वेळ बरा जातो. काही जणांची नोकरी व्यवसायात मिळणारी चिरीमीरी बंद झाल्याने आर्थिक तंगी असते. कुटुंबाची आर्थिक ओढाताण व्यसनं व नसत्या गरजा पैशा विना कशा पुर्‍या करायच्या हे प्रश्न मनात सतावत असतात. तसेच मानाची खुर्ची व पद नसल्याने सगळी कामे स्वतःहून करणे क्रमप्राप्त असते आणि हेच कुठेतरी खटकतं म्हणून निवृत्ती नको असते. निवृत्तीपासूनच निवृत्त असा पृथ्वीतलावर एकच अपवाद असेल तो म्हणजे राजकारणी !
[…]

काळी लक्ष्मी

काळ्या लक्ष्मीची आराधना करणारे हे राक्षसी उपासक आपल्या घरातील लक्ष्मी चोरतात व बाहेरची ड्रग व आतंकवाद रुपी पीडा घरात आणतात. काळ्या लक्ष्मीच्या बळावर रात्रीच्या अंधारात कृष्णकृत्य करून कधी- कधी सत्ता ही प्राप्त करतात.
[…]

उपवर तरुणींसाठी

अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क मध्ये एक अगदी वेगळे स्टोर निघाले आहे. हे स्टोर फक्त स्त्रियांसाठी आहे. पुरुषांना येथे येण्याला बंदी आहे. तसेच एखादी स्त्री या स्टोरला आयुष्यात फक्त एकदाच भेट देऊ शकते. हे स्टोर सहा माजली उंच आणि भव्य आहे. या स्टोर मध्ये नवरे मिळतात! लिली नावाची २७ वर्षे वयाची, विवाहीत्सुक पण अति चिकित्सक तरुणी घाई घाईने त्या […]

३१ मे – “वर्ल्ड नो टोबॅको डे”….निमित्ताने ( तंबाखूचे अर्थकारण व आरोग्य )

३१ मे “वर्ल्ड नो टोबॅको डे” ही एका दिवसाची नवलाई न राहता जगातील तंबाखु व्यसनी माणसांनी कायम स्वरूपी रोजच्या जीवनात आमलात आणली तर त्यांची तसेच त्यांच्या कुटुंबाची आर्थिक बचत व आरोग्याची काळजी घेतली जाईल.
[…]

निळे फुलपाखरू / एका फुलपाखराची गोष्ट / घरात घडलेली सत्य घटना

त्याचा आईस काय माहिती, इथली झाडे एका स्वार्थी माणसाने कापून टाकली आहेत. त्याची आई इथे आली – झाड व वेली दिसली नाहीत – पण अंडी घालण्याची वेळ झाली असल्या मुळे त्याचा आईला गमल्यातल्या एका रोपट्यावरच अंडी घालावी लागली असेल. झाडा एवजी बैठकीच्या खोलीत त्याचा जन्म झाला. एखाद रात्र आपल्या जन्मस्थानी घालवून तो पुढच्या प्रवासासाठी निघून केला असता. जिवंत राहीला असता तर पुढच्या पिढी साठी अंडी घालण्यास परत इथआला असता. पण ते होण आता शक्य नाही. भारी मनाने फुलपाखराला उचलले आणि बाहेर फेकले. पुन्हा वाश बेसिन वर येऊन हात धुऊ लागलो. लेडी मेकबेथची आठवण आली. कितीही हात धुतले तरी आपण या पापातून मुक्त होऊ शकतो का? असा विचार मनात आला.
[…]

मोबाईल !

वापर चांगल्या कार्यासाठी झाला तर खूप फायदा आहे परंतु बर्याच जणांना आजूनही मोबाईल फोन वरून बोलतांना भान राहत नाही आणि इतरांना त्याचा त्रास होतो. बहुतेक वेळा सार्वजनिक ठिकाणी बोलतांना सावकाश व मुद्याचेच बोलावे हे लक्षात न राहिल्याने त्याचे सार्वजनिक भाषण होते व नाकोत्या (गुप्त) गोष्टी सगळ्यांना समजतात आणि त्याचा गुंड फायदा घेतात मग पास्तावला होते
[…]

थोरली पाती… धाकटी पाती

आधुनिक वाल्मीकी ग.दि.माडगूळकरांच्या जीवनातील अनेक अज्ञात ह्रदयस्पर्शी प्रसंग आणि त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या अपकाशित पैलूंवर प्रकाशझोत टाकणार्‍या विविध आठवणींचा ‘‘मंतरलेल्या आठवणी‘‘ हा खजिना मराठी रसिकांसाठी खुला होत आहे. श्रीधर माडगूळकरांच्या लेखणीतून साकारलेल्या या पुस्तकातील एक आठवण खास मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी. […]

आशा भोसले – एक सांगितिक आश्चर्य

आशाताईंच्या सहा दशकांच्या महान कारकिर्दीकडे नुसती नजर टाकायची म्हटलं तरी थक्क व्हायला होतं. एक हजारांपेक्षाही जास्त हिंदी चित्रपटांतून त्यांनी बारा हजारांपेक्षाही जास्त गाणी गायलेली आहेत. शिवाय इतर अनेक भाषांतली गाणी वेगळीच. मग चित्रपटेतर गायन गजला, पॉप म्युझिक, मराठी नाट्य संगीत, भावगीते, बालगीते, भक्तिगीतं, अभंग वगैरे वगेरे वगैरे… चतुरस्र हा शब्दही कमी पडावा अशी कामगिरी त्यांनी केली आहे. […]

1 151 152 153 154 155 172