नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

सापळा (कथा)

माणूस मुंबईत पाय ठेवतो. तो एकदा या सापळ्यात अडकला की खाऊन-पिऊन इतका गब्बर होतो की, सापळ्यात माणसं अडकतात, उंदीर नाहीत. ते रुळावर बसून गंमत बघतात. […]

माझं माझं दुःख !

दुःख वाटल्याने कमी होतं म्हणे ! हेही पटत नाही. माझ्याकडचं एक किलो दुःख चार जणात वाटल्याने ते प्रत्येकी २०० ग्रॅम ( मी धरून पाच ) होत नाही. माझ्यासाठी ते एक किलोच राहतं आणि प्रदीर्घ काळ टिकतं . नवं दुःख आलं म्हणजे जुनं विसरलो असं होत नाही. ते सतत असतच आणि एकाकी असताना नव्याने, पूर्ण शक्तीनिशी भिडतं. […]

तुम बिन (कथा)

आता जगण्याचा एकमेव आधार ओवी आहे. आम्ही दोघेही एकमेकांसाठी आहोत. मी तुझ्या मुलीला तुझ्यासारखीच बनवीन समिधा हे माझं वचन आहे तुला. सात जन्माची साथ मागायचीस ना माझ्याकडून, आता पुढच्या जन्मी अशी घाई करु नकोस. […]

कोणीतरी आयुष्यात डोकावते तेव्हा…

आज शाळेचा उद्घाटन सोहळा सुरू आहे. कारणसुद्धा तसेच आहे. शाळेसाठी तब्बल ८० लाख रुपये खर्च करून सर्व सोयीसुविधांसह एक एकर क्षेत्रात शाळेची इमारत दिमाखात उभी आहे. आज शाळासुद्धा सर्वांसोबत त्या व्यक्तींची वाट बघत आहे जी व्यक्ती शाळेचे उद्घाटन करणार आहे. […]

डासांचं बेट (कथा)

हातात धरलेला पेपर सुटून खाली पडला. हाताला कुणीतरी जबरदस्त चावा घेतला होता. इतक्या स्वच्छ, नवीन विमानतळावर काय चावणार ? उजेडात काही दिसलं नाही. पण आजूबाजूचे प्रवासी चुळबुळ करताना दिसत होते. त्यता प्रखर प्रकाशात इतस्तत: फिरणार इवले इवले डास दिसत नव्हते. पण चावत होते. […]

सौदा (कथा)

नदीकाठाजवळ पाण्यात, धुक्याच्या पडद्या आडून, थोडा थोडा स्पष्ट होत गेला एका मचव्याचा आकार. मचव्यावर दोन माणसं होती. मचवा काठावर चढला. वल्हवणारा उठून उभा राहिला आणि मचव्याच्या तळातून टोपलीभर मासे घेऊन आणि जाळं खांद्यावर टाकून उतरला. त्याचा जोडीदार जो तोपर्यंत मचव्यातच बसून होता त्यानं ओरडून सांगितलं, “पावलू, येतना तुजें तुबक घेवन यो, एक दोन सोशे मेळटात जाल्यार पळोवया.” (पावलू, येताना तुझी बंदूक घेऊन ये, एकदोन ससे मिळाले तर बघू.) […]

पिठापूर – कुरवपूर यात्रा – भाग ४

अन्नावरम हे एक आंध्र मधील गोदावरी डिस्ट्रिक्ट मधलं गाव आहे. तिथे भारतातील किंबहुना जगातील एकमेव श्री सत्यनारायण महाराज मंदिर आहे. ते डोंगरावर आहे. गाड्या वरपर्यंत जातात. भाविक तीन किलोमीटरचा डोंगर चढून जाऊ शकतात किंवा जातात. […]

मिसेस पॅकलटाईडचा वाघ (संक्षिप्त व रूपांतरीत कथा १७)

साकी ह्या टोपण नावाने मुनरोने बरंच लिखाण केलं. तो विनोदी लेखक म्हणून प्रसिध्द होता. ही एक अशीच विनोदी कथा. भारतात आलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या बायका स्वतःला राजघराण्यांतल्याच समजत. येन केन प्रकारेण प्रसिध्दी मिळवायचा त्या प्रयत्न करीत. पोकळ बडेजाव मिरवीत. अशाच एका इंग्रज बाईने वाघ मारला, त्याचं नर्म विनोदी वर्णन कथेत आलं आहे. खरी गोष्ट माहित असलेली तिची पगारी जोडीदार मात्र त्या संधीचा योग्य वेळी स्वत:ला घर मिळवण्यासाठी करून घेते व चोरावर मोर बनते. […]

पॉवरकट (कथा)

न रडणारं, बुटांचा आवाज ऐकत स्तंभित झालेल, नुकतंच जन्मलेलं बालक इतकं बोलकं असू शकतं? कुणास ठाऊक, कॅमेऱ्याची करामतअसावी. टोपलीत ठेवून ते मूल अलगद छोट्या ओहोळात सोडलं जातं. वाहत वाहत पुढे पुढे जात राहतं. अजूबाजूचा प्रदेश बदलत जातो. […]

घटनेच्या पृष्ठभागाखाली

ख्रिस रॉक आणि विल स्मिथ यांच्यातील ऑस्कर सोहोळ्यातील “देवाण -घेवाण ” दिसलीच असेल दूरदर्शनच्या पडद्यावर ! रॉकने स्मिथच्या पत्नीबाबत खुलेआम एक शेरेवजा विधान केले. त्याबदल्यात व्यासपीठावर जाऊन स्मिथ ने त्याला थोबाडीत दिली. याही घटनेच्या तळाशी काहीतरी शिकवून जाणारा धडा आहे. वरवर न्यायाधीश बनून निकाल देण्याच्या आपल्या (भोचक, अनाहूत) सवयीच्या पलीकडे जाऊन आपली “समज” खोल करणारे काही हाती गवसतंय का हे पाहणे आपल्याला प्रगल्भ करत असते. […]

1 150 151 152 153 154 489
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..