नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

पिठापूर – कुरवपूर यात्रा – भाग ४

अन्नावरम हे एक आंध्र मधील गोदावरी डिस्ट्रिक्ट मधलं गाव आहे. तिथे भारतातील किंबहुना जगातील एकमेव श्री सत्यनारायण महाराज मंदिर आहे. ते डोंगरावर आहे. गाड्या वरपर्यंत जातात. भाविक तीन किलोमीटरचा डोंगर चढून जाऊ शकतात किंवा जातात. […]

मिसेस पॅकलटाईडचा वाघ (संक्षिप्त व रूपांतरीत कथा १७)

साकी ह्या टोपण नावाने मुनरोने बरंच लिखाण केलं. तो विनोदी लेखक म्हणून प्रसिध्द होता. ही एक अशीच विनोदी कथा. भारतात आलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या बायका स्वतःला राजघराण्यांतल्याच समजत. येन केन प्रकारेण प्रसिध्दी मिळवायचा त्या प्रयत्न करीत. पोकळ बडेजाव मिरवीत. अशाच एका इंग्रज बाईने वाघ मारला, त्याचं नर्म विनोदी वर्णन कथेत आलं आहे. खरी गोष्ट माहित असलेली तिची पगारी जोडीदार मात्र त्या संधीचा योग्य वेळी स्वत:ला घर मिळवण्यासाठी करून घेते व चोरावर मोर बनते. […]

पॉवरकट (कथा)

न रडणारं, बुटांचा आवाज ऐकत स्तंभित झालेल, नुकतंच जन्मलेलं बालक इतकं बोलकं असू शकतं? कुणास ठाऊक, कॅमेऱ्याची करामतअसावी. टोपलीत ठेवून ते मूल अलगद छोट्या ओहोळात सोडलं जातं. वाहत वाहत पुढे पुढे जात राहतं. अजूबाजूचा प्रदेश बदलत जातो. […]

घटनेच्या पृष्ठभागाखाली

ख्रिस रॉक आणि विल स्मिथ यांच्यातील ऑस्कर सोहोळ्यातील “देवाण -घेवाण ” दिसलीच असेल दूरदर्शनच्या पडद्यावर ! रॉकने स्मिथच्या पत्नीबाबत खुलेआम एक शेरेवजा विधान केले. त्याबदल्यात व्यासपीठावर जाऊन स्मिथ ने त्याला थोबाडीत दिली. याही घटनेच्या तळाशी काहीतरी शिकवून जाणारा धडा आहे. वरवर न्यायाधीश बनून निकाल देण्याच्या आपल्या (भोचक, अनाहूत) सवयीच्या पलीकडे जाऊन आपली “समज” खोल करणारे काही हाती गवसतंय का हे पाहणे आपल्याला प्रगल्भ करत असते. […]

कागदोपत्री माणूस (कथा)

तसं पाहिली तर त्या कागदपत्रांत काय अर्थ होता? आजच्या हिशेबात तो माणूस, त्याच्या निष्ठा, त्याची कार्यपद्धती जशी काळाच्या ओघातनिष्प्रभ झालेली होती. तसंच त्या कागदपत्रांच. त्यांची कुणाला कधी गरज पडणार नव्हती. […]

एक अनुत्तरित प्रश्न

जीवसृष्टित मानवी जन्म श्रेष्ठ मानला आहे. कारण तो संयमाने, सतर्कतेने, विवेकाने विचार करु शकतो. चांगले काय? वाईट काय? याच्या निष्कर्षा पर्यंत येवू शकतो. जो माणूस आहे तो स्वतः नेहमीच जे अगम्य आहे! जे अतर्क्य आहे! त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो आणि वसुधैव कुटुंबक ही मानवतेची पवित्र भावनां मनांत सातत्याने जागृत ठेवतो. […]

कथे, सरिते, प्रिये… (कथा)

कथे, सरिते, प्रिये! तू एक आदिम सरिता आहेस. हजार वर्षांपासून तुझ्या काठानेच फुलत राहिले माणसाचे आयुष्य आणि भावविश्व. तुला प्राशून, मनामनावर तुझे सिंचन करून समृद्ध होत गेला माणूस! बहरत गेली त्याची संस्कृती हजारो वर्षे केवळ तुझ्यामुळे! […]

टकमक (कथा)

भूक लागलीय पण वडापाव नको, पैसे हवेत. कशासाठी ? मी पैसे देणार नाही हे तिनं ओळखलं असावं. हातातले पैसे परत थाळीत टाकून तिनं ते मोजायला सुरुवात केली. निघतोय असे बघितल्यावर खाली बघूनच म्हणाली, पैसा दिला नाय तर बा मारल. […]

माझी आर्थिक कारकीर्द (संक्षिप्त रूपांतरीत कथा १६)

कथेतील बँक कर्मचारी त्या डीपॉझीटरला हंसतात, म्हणजेच तुच्छ मानतात. आजही खूप मोठ्या पदावरच्या अधिकाऱ्यांना कर्ज घ्यायला येणाऱ्या (नंतर कदाचित बुडवणाऱ्या) उद्योगपतीचं जेवढं महत्त्व वाटतं तितकं सामान्य खातेदाराचं वाटत नाही. ह्या कथेत तो सगळी रक्कम परत काढतो आणि त्याला त्याचे सर्वच्या सर्व म्हणजे छप्पन्न डॉलर्स परत मिळतात. आज जर एखाद्याने ‘छप्पन्न’ डॉलरचे खाते बँकेत उघडून त्याच दिवशी बंद केले तर बहुदा क्लोजरनंतर त्याच्या हातांत सहाच डॉलर परत येतील आणि पन्नास डॉलर्स तीन महिने सरासरी बॅलन्स कमी पडल्याचा चार्ज, कॅश ट्रॅन्झक्शनचा चार्ज, कंपल्सरी डेबिट कार्डाचा चार्ज, अकाऊंट क्लोजर चार्जेस, जीएसटी, वगैरेसाठी कापून घेतले जातील. एकंदरीत बँक ग्राहक लेखकाने दाखवल्याप्रमाणे आजही बँकेचा मिंधाच रहाणार आहे. […]

हेच खरे प्रेम! हाच खरा विश्वास (कथा)

संज्ञा आणि सुकृत बालसोबती. दोघांची घरे शेजारी शेजारी होती. त्यामुळे दोन्ही घरात छान एकोपा होता. एकाच्या घरात शिजले तर दुसऱ्याच्या घरी द्यावे एवढेच नाहीतर एकाला वेदना झाली तर त्याची सल दुसऱ्याला जाणवायची. अशा प्रेमळ आणि सुसंस्कारित वातावरणात संज्ञा आणि सुकृत वाढत होते. […]

1 149 150 151 152 153 487
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..