विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

हे कसले जगणे

हे कसले जगणे …

मीपण छळते क्षणाक्षणाला

विझेल का हे

तिच्या स्तनाच्या मऊ उशीला […]

ती अशीच

ती अशीच

ती अशीच अचानक भेटली

तिचं नाव काय… गाव काय

काही काही माहित नव्हतं […]

राजा आणि त्याचे पाळीव कुत्रे

दरबारात कुत्रे नुसते भुंकायचे नाही तर कधी कधी साखळी तोडून मंत्री आणि सरदाराना चावायला कमी करायचे नाही. पण यात कुत्र्यांची काहीच चुकी नव्हती. कुत्रे म्हणजे एकनिष्ठ आणि आज्ञाकारी. आपल्या दिव्यचक्षुंनी घोटाळेबाज मंत्री आणि सरदाराना ओळखून राजाला सावध करण्यासाठी ते मंत्र्यांवर भुंकायचे. पण त्यांस काय माहित, अधिकांश घोटाळ्यामागे राजाचे आणि राणीचे नातलग असल्यामुळे, राजाला माहित असूनही राजा दुर्लक्ष करायचा. पण कुत्र्यांच्या ह्या भुंकण्यामुळे, मंत्री आणि सरदार घाबरायचे त्या मुळे राजसभेचे कामकाज नेहमीच अर्धवट राहायचे. आणि एक दिवस तर कहरच झाला, कुत्रे शयनग्रहात चक्क ‘राणी’ वर भुंकले……
[…]

मृत्युची चाहूल

अनेक गंभीर व असाध्य आजार असलेल्या रोग्यांना मृत्युशयेवर असताना त्यांच्या शारीरिक व्याधी तपासण्याचा योग येत असे. तशीच त्यांची त्याक्षणाची मानसिकता समजण्याचे बरेच प्रसंग आले. एक वैद्यकीय अभ्यासक म्हणून स्वानुभवाने त्यांच्याकडे लक्ष्य केंद्रीत करीत होतो. व्यक्ती मृत्युची चाहूल लागताना, कोणते विचार करीते.? कसे वागते ? हे गंभीरपणे बघू लागलो. त्यावर लिखाण केले. अनेक रोग्यांकडे त्या दृष्टीकोणातून अभ्यास करीत गेलो. मृत्यु अचानक येतो. मृत्यु घाला घालतो. मृत्यु अनिश्चीत असतो, परंतु निश्चीत येतो. मृत्यु कोणतीही सुचना न देता येतो. अनेक अनेक ही वाक्ये ऐकतो. ती वाचलेली होती, ऐकलेली होती. कांही व्यक्तींचे मृत्यु जवळून बघण्याचे प्रसंग आले व हाताळले गेले. मृत्यु हे जीवनाचे अंतीम सत्य आहे. त्याला माणसे त्याक्षणी कशी सामोरी जातात, ह्याचे मी सतर्कतेने अवलोकन करुं लागलो. कांही टिपणी केल्या. मात्र काय खरे असेल, ह्यावर वैचारीक साराशं काढणे कठीण गेले.
[…]

बोलण्याच्या ओघात……..!

आपल्या प्रत्येकाला काहीना काही सवयी व लकबी असतात. बोलण्याच्या ओघात, काहींना आपले मुद्दे मांडतांना व पटवून देताना हातवारे करून सांगण्याची सवय असते तर काहींना दातांने हाताच्या बोटांची नखे कुडतरत बोलण्याची व ऐकण्याची सवय असते. तर काही व्यक्तींना डोळे मिचकावत बोलण्याची सवय असते. असो.
[…]

बाप

सदर कथेमधे माणसाने मनात अढी धरून ठेवली की किती नुकसान होत ते धयानात येते. कथा नायकाच जीवन

घडवणयात आईचा मोठा वाटा आहे हे वाचकाना कळेलच. कथा वाचून र्‍पातिर्‍किया दयावी ही विनँती. […]

समलेंगिकता एक विकृती

परमेश्वरच्या मनात एका पासून अनेक होण्याची इच्छा निर्माण झाली आणि सृष्टीच्या निर्मितीची सुरवात झाली. वैज्ञानिक भाषेत याला “बिग बैंग” असे म्हणतात. त्या क्षणापासून परमात्मा रचित प्रत्येक जीव “एका पासून अनेक होण्याची” इच्छा मनात धारण करून सृष्टी निर्मितीची परमेश्वराची इच्छा पूर्ण करीत आहे. एक कोशकीय जीव स्वत:ला विभाजित करून एका पासून अनेक होते. परमेश्वराने स्त्री-पुरुष या रूपाने मानवजातीची निर्मिती केली आहे. अन्य जिवांप्रमाणे ‘एका पासून अनेक होण्याची’ परमेश्वरी इच्छा मानवा मधे ही आहे.
[…]

रेनवॉटर हार्वेस्टींग काळाची गरज

वाढत्या लोकसंख्येच्या रेटयाने माणसांच्या मुलभूत गरजा भागवीताना सुखसोयी व विकासाच्या नावाखाली सुंदर वसुंधरेचे अगणित लचके तोडले जात आहेत याला कुणीही अपवाद नाही. पर्यावरणाचे ऐवढया प्रमाणात प्रदुषण होत आहे की तापमान वृद्धीने नैसर्गिक ऋतू बदलत आहेत. पाऊस कुठे कमी तर कुठे जास्त तर कधी अवेळी पडल्याने शेतकर्‍यांचे व नागरिकांचे अतोनात नुकसान होत आहे. पाणी टंचाईने शहर व गावातील माणसांना टँकरने किंवा मैलोंनमैल लांब जाऊन पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
[…]

ट्रेड युनियन्स् आणि संप

जागतिक आर्थिक मंदिमुळे देशात औद्योगिक व इतर क्षेत्रात मरगळ आली आहे. काही कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत तर बर्‍याच ठिकाणी कामगार कपात चालू आहे. आपला हट्ट पुरा करून हवे ते हवे तेव्हां पदरात पाडून घेण्यासाठी लहान मुले ज्या मानसशास्त्राचा वापर करतात त्याच प्रकारे आज सर्वच क्षेत्रातील ट्रेड युनियन्स् आपल्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी संपाचे तंत्र वापरताना दिसतात. प्रथम भारतात ट्रेड युनियन कशी आली ते बघू.
[…]

मुंबईत घर मिळेल का घर?

घर बांधण्यासाठी लागणाऱ्या सर्वच वस्तूंच्या किमंती/भाव गगनाला भिडल्याने घराच्या किंमती वारेपाम वाढल्या आहेत. त्यामुळे भारतात कुठेही घर घेणे सोपे नाही. त्यातून प्रत्येकाचे स्वप्न असते की माझे मुंबईत घर असावे. घर विकत घेण्यासाठी लागणारे भांडवल किंवा स्वत:कडील पुंजी कमी पडते म्हणून बँकेतून कर्ज काढून घर घेण्याचेही धाडस होत नाही. कारण बँकांच्या व्याजाचे दर सर्व सामान्य माणसांच्या आवाक्याच्या बाहेर आहेत. मुद्दल अधिक व्याज फेडण्यामध्ये उभ आयुष्य सरून जाईल.
[…]

1 148 149 150 151 152 172