विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

मस्तकावर शिवलिंग व घंटाधारी रोम येथील द्विभूज गणेश (गुरु) मूर्ती

रोम येथील बार्जीयन मुझियम वेलोस्ट्रेज येथील मस्तकावर शिवलिंग व घंटाधारी द्विभूज गणेश (गुरु) मूर्ती रोम आणि भारतीय संस्कृती ह्यांच्या एकत्रीकरणाचा उत्कृष्ट नमुना आहे. शिव पुत्र, सुर्यपुत्र आणि विघ्नहर्ता म्हणून जगात प्रसिद्ध असलेला श्री गणेश येथे विद्यादायक गुरुस्वामी म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. येथे श्री गणेश गुरु म्हणून ओळखला जातो.
[…]

महाराजलीला मुद्रा श्री गणेश – कंबोडिया

ही गणेशमूर्ती १३ व्या शतकातील असून ती ब्राँझची बनविलेली आहे. मूर्तीवर विविध अलंकार असून ते हिरव्या रंगात दाखविलेले आहेत. या गणेश मूर्तीला दोन हात असून अर्धवट वाकलेल्या स्थितीत बसलेली आहे. उजव्या हातात मोडलेला सुळा व डाव्या हातात ग्रंथ आहे. यातच मांगल्य व ज्ञानाचे दर्शन होते.
[…]

सूर्य विनायक – नेपाळ

भारतीय गणेश उत्पत्ती विषयी असलेली कल्पना डावलून नेपाळ संस्कृतीने आपले गणेश दर्शन घडविले आहे. गणेश हा शिवपुत्र न मानता तो स्वयंभू असून एका सूर्य किरणात त्याचे दर्शन आले आहे असे मानून सूर्य-विनायक हे अधिष्ठान दिले आहे. जगातील इतर राष्ट्रात सुर्यपुत्र हा मान्य असलेला संकेतही नेपाळ संस्कृतीला मान्य असलेला दिसत नाही. ह्या सूर्य विनायकाचे मंदिर काठमांडू पासून आठ मैलावर भाटगांव येथे आहे. ते भव्य आहे. नेपाळच्या चित्रांकित नृत्यगणपतीच्या सभोवती चार गणपती असतात. त्यातील भव्य व मुख्य देवता सूर्य विनायक होय.
[…]

महापियेन – श्री गणेश – ब्रम्हदेश

ब्रम्हदेशातील नदी किनारी वसलेल्या प्रदेशातील मोनलोक म्हणून ओळखला जाणारा हा गणेश “व्यापारी विघ्नहर्ता” म्हणून प्रसिद्ध आहे. ही मूर्ती ६व्या शतकातील असावी. श्याम वंशाच्या कोणा आयुथीयान कारागिराने ही बनविलेली असावी. ह्या गणेशाला महापियेन अशी संज्ञा आहे.
[…]

“दैनिक प्रत्यक्ष” आमुचे!

दैनिक प्रत्यक्ष हे वृत्तपत्र श्री अनिरुद्ध बापू यांनी सन २००५च्या दत्तजयंतीच्या दिवशी प्रसिद्ध केले. हे दैनिक १२ पानांचे असून त्याची किंमत रु.२.५० आहे. दैनिक प्रत्यक्ष सर्व वृत्तपत्रांचे स्टोल तसेच रेल्वे स्टोलवरही उपलब्ध आहे. तसेच घरोघरी येणाऱ्या अन्य वृत्तपत्रा प्रमाणे ही मिळते. प्रत्यक्ष दैनिकात परमपूज्य सदगुरु बापू यांनी लिहिलेले अग्रलेख व विविध विषयांवरील इतर लेखकांनी लिहिलेले लेखही वाचकांस वाचावयास मिळतील. पान चार आणि पाचवर आंतरराष्ट्रीय सदरात विविध माहिती आहे जी इतर वृत्तपत्रात अभावानेच वाचायला मिळते. […]

माझी चेन्नई सफर

माझा हा चेन्नई प्रवास साधारणपणे २७ तासांचा होता व गेली कित्येक वर्षे मी इतक्या लांबवरचा प्रवास केलेला नसल्यामुळे हे २७ तास कसे पार पडणार याबद्दल शंकाच होती. त्यात हा दक्षिणेकडचा प्रदेश अगोदरच मिळालेल्या ब-या-वाईट अशा ब-याच मत-मतांतरांमुळे मनात उगीचच घर करून बसलेला. परंतु चिरंजीवांना भेटण्याच्या निमित्ताने व आनंदात नवीन प्रदेश पहावयास मिळणार असल्यामुळे दुःखापेक्षा सुखच अधिक वाटत होते
[…]

“बोरोचा गणेश” – देश – जावा

हजारो वर्षापूर्वी परदेशात सुद्धा खाणीच्या उत्खननात, मुझियममध्ये आणि अन्य बर्‍याच ठिकाणी श्री.गणपतींच्या मूर्ती, शिलालेख, कोरीवकाम याच्यातून बरीच माहिती उपलब्ध झाल्याने आपल्या ज्ञानात भर पडत गेली. परदेशीय मंडळी जवळ आली त्यांची भाषा, संस्कृती समजायला लागली आणि गैरसमज दूर होण्यास मदत झाली. देशादेशांतील संबंध घट्ट व दृढ होत गेले. अश्याच एका परदेशातील गणपतीची माहिती आपण पाहणार आहोत त्या देशाचे नाव आहे. जावा.
[…]

मुलीचा जन्म आणि कविता

काल माझ्या भाचीचा फोन आला, मामाजी आप दादा बन गये हो, भैया को लाडकी हुई है. इस ख़ुशी में एक कविता हो जाये. खंर म्हणाल तर मी कवी नाही. मराठी भाषेचे शिक्षण ही नाही. छंद, अलंकार कशाशी खातात हे ही माहित नाही. पण हृदयातील भावना शब्दांत उतरविण्याचा प्रयत्न करतो. त्या चिमुकल्या चिमणीच्या जन्माच्या वेळी आजी आणि पणजी सुद्धा तिच्या जवळ होते. त्यांना काय वाटत असेल, त्यांच्या मनातील मला जाणवलेल्या भावना शब्दांत उतरविण्याचा प्रयत्न केला आहे:
[…]

मांजरीच्या गळ्यात घंटी/एक अयशस्वी प्रयत्न

मांजरीच्या गळ्यात घंटी बांधण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अयशस्वी झाला होता. सहज लक्ष गेल त्या घंटीवर ‘लोकपाल’ असे शब्द कोरलेले होते. एक अयशस्वी प्रयत्न
[…]

1 147 148 149 150 151 173