नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

मनाची रचना

मन,देह आणि आत्मा यांचे क्लिष्ट मिश्रण म्हणजे मानव ! या तिघांची एकमेकांशी जुळवून घेण्याची सतत धडपड सुरु असते. आणि त्या जुळणीवर आणि परस्परांमधील समन्वयावर व्यक्तीचे आरोग्य आणि चैतन्य अवलंबून असते.माणसाचे वर्तन, मानसिक प्रक्रिया,संवाद या तिघा घटकांवर अवलंबून असतात. […]

काजळ भरलेले डोळे (कथा)

अनघा दिवाळी अंक २०२० मध्ये अरूणेंद्र नाथ वर्मा यांनी लिहिलेली ही कथा. ती जणू बोलायचं म्हणून बोलत होती. खूप क्षीण आवाजात मिसेस तिवारीने मनोजला म्हटले, ‘कोमा ताले वू’ आणि आपला नाजूकसा उजवा हात त्याच्यासमोर केला. मनोज चकित झाला. त्याच्या एवढंही लक्षात आलं नाही की फ्रेच भाषेत ओळख करून देताना/घेताना ‘हाऊ डू यू डू’साठी वापरलेल्या वाक्याचं उत्तर […]

गहिवर (कथा)

दिवाळी जवळ आली रे आली की रामजी शेठजींचा मूड एकदम बिघडायचा. एक माणूस म्हणून ते चांगले होते पण पदरचा पैसा गेला की त्यांचा जीव कासावीस होत असे. गणपती उत्सवाला शेकड्यांनी वर्गणी द्यायला लागायची. […]

खंडूबा माझ्या साथीला (कथा)

बालेवाडीच्या क्रीडा संकुलाबाहेर जत्रेचं स्वरूप आलं होतं. संकुलाच्या प्रमुख प्रवेशद्वारापुढे भली मोठी कमान उभारलेली होती त्यावर लक्ष घेणारा लांबलचक कापडी फलक लटकवलेला होता, “अखिल भारतीय राज्यातंर्गत मैदानी स्पर्धा २०१९.” […]

हृदयांतर

भाषांचे, उच्चारांचे, संकरांचे आपापले कप्पे असतात. शेजारची भिंत उडी मारून दुसऱ्या अंगणात पटकन घुसता येते, पण तेथे स्थिरावता येत नाही. आपली गांवे, गावकूस सांभाळणे आणि नंतर शक्य असेल तर उंबरा ओलांडणे हे श्रेयस्कर ! […]

पिठापूर – कुरवपूर यात्रा – भाग ७

संक्षिप्त गुरुचरित्र वाचायला ३५-४० मिनिटे लागतात. तेवढा वेळ , थोडा कमी तो कुत्रा तिथेच बसून होता. माझा शेवटचा अध्याय सुरू झाला.मग तो उठून मागच्या बाजूने बाहेर गेला किंवा गेला असावा. माझं वाचन झाल्यावर नमस्कार करून मी उठले आणि कुत्र्याला शोधायचा प्रयत्न केला. पण तो कुठे ही परत दिसला नाही. […]

समोरच्या खिडकीतला तो..

सकाळी मालकीण त्याला घेऊन बाहेर यायची. कुत्रे भुंकायचे, तोही भुंकायचा. मालकीण सपासप त्याच्या पाठीवर वेताचे सपकारे ओढायची. तो फक्त कुंईऽकुंई करुन विव्हळायचा. त्याचं ओरडणं बंदच झालं ते बहुधा कायमचं. मनातल्या मनात दु:खाचे कढ पचवणाऱ्या माणसासारखा फिरताना तो मधून मधून विव्हळताना दिसतो. […]

लोकल

पहिला वर्ग असू द्या नाही तर दुसरा वर्ग, इतक्या गर्दीतून तास-दोन तास मेंढरांसारख डब्यात कोंडून तुम्ही प्रवास करता तरी कसा ? आपल्याला तर गुदमरल्यासाखं होतं. परगांवाहून आलेला पाहुणा सांगत राहतो. ‘आम्हाला याची सवय आहे’ मुंबईकर अभिमानाने सांगत राहतो. रोजची दगदग हसत-हसत झेलत राहतो. लोकल पकडण्याचं आणि उतरण्याचं भयंकर दिव्य रोजचं करीत राहतो. […]

मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या संस्थेचा गौरवशाली इतिहास

ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला पां. के. दातार यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत.  […]

1 146 147 148 149 150 488
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..