विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

किस्सा रघ्याचा !

दुपारची उन्ह करकर तापली होती. रेल्वे स्टेशनच्या दादऱ्याखाली, ते दोन मळक्या, फाटक्या कपड्यातले भिकारी सावली धरून बसले होते. नुकतीच बाराची प्यासिंजर निघून गेली होती. ‘धंद्याच्या’ दृष्टीने त्यांचा हा ‘भाकड’ पिरेड होता. त्या मुळे ते दोघे ‘सुख -दुःखाच्या’ गप्पा मारत असावेत असे, पहाणाऱ्यांना वाटत होते. आणि ते खरे हि होते. ज्यास्त कमाई(विना सायास ) म्हणजे ज्यास्त सुख हे त्यांच्या जीवनाचे सूत्र होते! हाच त्यांच्या गप्पांचा विषय पण होता.  […]

बाव (विहीर)

आमच्या गावात विहीरीला बाव असे म्हणतात. कदाचित बावडी शब्दापासून बाव बोलले जात असावे. मी विहीरीवर जाऊन येतो असं बोलण्यापेक्षा मी बावीवर जाऊन येतो असे बोलले जाते. आमची बाव नेमकी कधी बांधली ते माहीत नाही पण बाबा सांगतात त्या प्रमाणे सुमारे 55 ते 60 वर्षांपूर्वी आमच्या आजोबांनी बावीच्या तळाशी असलेला कातळ सुरुंग स्फोटांनी उडवून खोली वाढवली आणि पक्कं बांधकाम करवून घेतलं होते. […]

डोळा

डोळा ह्या अवयवाकडे आपण जरा डोळसपणे बघायलाच हव. काणा डोळा करण्या सारखा तो अवयव नाही. असतात दोन, पण एकमेकांकडे न बघता एकेच ठिकाणी एकाच वेळी बघतात. मोठे केले की भिती, विस्फारले की आश्चर्य, मिचकावले की खोट खोट आणि एकच मारला की मार खायची लक्षण! कधी काळे, कधी पिंगट, कधी घारे व कधी कधी राजकपूरसारखे निळे. […]

माझी पहिली चित्रपट कथा

रात्री पडल्या पडल्या सहज विचार केला चित्रपटासाठी एखादी कथा लिहावी आणि कथा लिहुन पण टाकली. माझी कथा कोणी स्विकारण शक्यच नव्हत तरी पण एक तुक्का लावला. मला तर वाटतय काहीशे कथातुन माझी कथा लकी ड्राँ’ पद्धतीनी काढली गेली असावी! […]

नऊवारी एअर होस्टेस

बाईंनी माईकवर जाहीर केल “सर्व अलौंन्समेंट म्हराटित होतील तवा समद्यांनी हित ध्यान द्यायाचय. पुन्ह्यांदा सांगन होनार न्हाई. डोईवरच प्यँनल घट लावा नाहीतर तुमच्या बँगा खाली घरंगळतील आनी कुनाची पन टकुर फुटतील. ” माझ्या प्रमाणे ईतरही उठले आणि भितीपोटी पँनल घट्ट बंद असल्याची खात्री करुन घेतली. […]

मुंगळा

मुंगीचे मिस्टर कोण आणि मुंंगळ्याची मिसेस कोण? या बालवयात निरागस जिज्ञासेपोटी विचारलेल्या माझ्या संयुक्त प्रश्णावर मास्तर खूपच कावले आणि निरुत्तर होउन उत्तरापोटी त्यांनी मला तास संपेपर्यंत वर्गाच्या दारात अंगठे धरुन उभे रहायची शिक्षा ठोठावली. शिक्षेच्या अम्मलबजावणीत केलेला माझा अगाउपणा माझ्या चांगलाच अंगाशी आला. […]

पुण्यातील संगीत महोत्सव

गणपती, दसरा- दिवाळी या सणासुदीच्या दिवसांनंतर पुण्यात संगीताचे वेगवेगळे महोत्सव एकानंतर एक चालु असतात. सवाईगंधर्व भीमसेन संगीत महोत्सव, स्वरगंधार आणि शेवटी वसंतोत्सव. सवाईच्या सीझन तिकीटसाठी आतुन फिल्डिंग लावल्यास लाईनमधे उभे राहण व निराशा टाळता येउ शकते, स्वर गंधारमधे स्टुडंट डिस्काउंट असते तर वसंतोत्सव चक्क फ्रीच असतो. तिन्ही कार्यक्रमांसाठी खचाखच गर्दी होत असते. झुंडीने होणार्या ह्या गर्दीत दर्दी आणि “बेदर्दी” दोन्ही गटांचे सभासद आढळतात. […]

मुलाखत

साठी उलटली तरी माझ्या मित्रांना माझा मामा करण्यातच धन्यता वाटते. मी मुलाखत घ्यायची आणि ती सुध्दा एखाद्या प्रथितयश रागदारी गायकाची! संगीतातल ज्ञान तर सोडाच पण ज्या विषयात मी काठावरही पोहू शकत नाही हे माहीती असुनही मुद्दाम पुण्यातील एका प्रख्यात गवयाची मुलाखत घेण्यासाठी त्यांनी माझी व त्यांची वेळ परस्पर बुक करुन टाकली. […]

1 2 3 151