विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

मच्छर

वेधशाळेनी हलक्याहून अधिक आणि मध्यमहून कमी पावसाच्या सरींचा अंदाज व्यक्त केलाय म्हणजे नक्की काय याचा मथितार्थ माझ्याही आधी आमच्या एरीयातील डासांना कळला आणि त्यांनी अक्षरशः हैदोस घातला. मानवीडंखासाठी आसुसलेले त्यांचे दात शिवशिवायला लागले. […]

जीवन ऋतु आनंदाचा….

उगाच कोणाच्या  येण्याची  प्रतिक्षा  करित बसु नये, हा जिवनॠतू  आहे  क्षणाक्षणाला तो बदलत राहतो स्वतःच्या जीवनाशी सामर्थ्याने  लढत जीवनावर  भरभरून लिहिणारे  महान लेखक होऊन गेले  ,  आजही तेवढ्याच  नव्या तन्मयतेने लिहिताहेत. आणि लिहीत राहतील. कारण जीवन या शब्दातून नव्या प्रेरणेची ऊर्जा मिळते. […]

बांड मस… (बोलीभाषेतील लघु कथा)

सोमवारी रातीच्यान जरा गडबड होती घरात. मोठ्या म्हशीला डब्बल भरडा घाल, उरल्या सुरल्या शिळ्या भाकरी मोडून घाल अशी धावपळ गंवडीमामा करत होता. शेलका चारा फक्त त्या मोठ्या म्हशीला घातला व उरलेल्या खंडोरभर 8 जनावरांसनी नुसतं पिंजरावर बसविलं.. ह्या सर्व धावपळीच्या मागच गम्य मला त्या रातीला उमगलचं नाही. त्यानंतर असच सहज फेरी मारून येवूया म्हणून दोन दिवसांनंतर […]

माझा सिनेमा !

भारतातले ‘सिनेमावेडे’ लोक १९५२ सालात जन्मले असावेत हा माझा लाडका आणि दृढ समाज आहे. कारण मी त्याच सालात या पृथ्वीचा भार वाढवलंय. या पूर्वीच्या पिढीचे सिनेमा बद्दल ‘एक छछोर नाद!’ असे मत होते. असो. (मी महाराष्ट्रातला तेव्हा ‘सिनेमा ‘ म्हणजे ‘हिंदी सिनेमा’ असाच घ्यावा.)  […]

मारेकरी!

“श्लोका! हि स्वीटी! माझी होणारी बायको! महत्वाचं म्हणजे हि ‘वास्को’ लीकरवाले पाखरे यांची कन्या आहे!” सुमितने नाटकी ढंगात स्वीटीची ओळख, श्लोकाला करून दिली. लीकरच्या बॅरल सारख्या ‘स्वीटी’ने दोन्ही हात जोडून नमस्कार केल्या सारखा केला.  […]

हर मर्ज की दवा…. ज़िंदा तिलिस्मा… 

जिंदा तिलिस्मात … खरं तर बोली भाषेत जिंदा तलिस्मा… living magic …. जादुई औषध .. एकही कृत्रिम रसायन न वापरता केलेलं … सगळ्या गोष्टी नैसर्गिक … वनौषधी वापरून केलेल्या … म्हणूनच बहुतेक इथल्या उर्दू-हिंदी बोली भाषेत … हर मर्ज की दवा … इतका हैदराबादच्या जनमनाचा त्यावर विश्वास आहे (जसा आपल्याकडे अमृतांजन … कैलास जीवन यावर असतो तसा). पुढच्या वर्षी बरोबर १०० वर्ष होतील, या युनानी औषधाला. हकिम मोहम्मद मोईझुद्दीन फारुकी यांनी हे जादुई औषध १९२० साली निर्माण केलं आणि त्याचा प्रभाव … करिष्मा थोडा थोडका नाही तर शंभर वर्ष लोकमनावर आहे. […]

जैत रे जैत 

गो नी दांडेकरांनी लिहून ठेवलेल्या अनेक अजरामर कांदबर्यांपैकी जैत रे जैत हि ठाकरवाडीतल्या ठाकरांची विशेषतः नाग्या अन् चिंधीची प्रेमकथा. महादेवाच्या गळ्यात बांधलेल्या पोळ्यात विराजमान असलेल्या राणी या मधमाशीविषयीची सूडकथा. […]

छंद 

प्रसिद्ध लेखक व पु काळे त्यांच्या वपुर्झा या पुस्तकात असं म्हणतात कि, माणसाला काही ना काही छंद हवा. स्वप्नं हवीत. पुरी होणारी किंवा कायम अपुरी राहणारी. त्यातून तो स्वतःला हरवायला शिकतो. सापडायला शिकतो. हे ‘हरवणं-सापडणं’ प्रत्येकाचं निराळं असतं. […]

खांदेरी – उंदेरी जलदुर्गदर्शन मोहिम

अलिबाग म्हटलं कि नजरेसमोर उभे रहातात छत्रपती शिवाजी , संभाजी महाराज अन् त्यांचाच वारसा चालवत दर्यावर आपला दरारा निर्माण करणारे इंग्रज , डच, पोर्तुगीज, सिद्धीच्या उरात धडकि भरवणारे सरखेल कान्होजी आंग्रे. अलिबाग म्हटलं कि नजरेसमोर उभे रहातात ते अज्रस्त लाटांचे तडाखे सोसत वर्षानुवर्षे समुद्रात ताठ मानेने बुरुजावर झेंडा रोवून उभे असलेले कुलाबा, खांदेरी – उंदेरी , मुरुड- जंजिरा, कोरलई, रेवदंडा किल्ले. […]

सुखाचा शोध

सुखाच्या प्रत्येकाच्या विविध परिभाषा असतात,प्रत्येकजणाचे सुखाचे परिमाण सुद्धा वेगवेगळे असतात पण सुखाची व्याख्या खूप सोपी व छान आहे,जे समोर आहे ते जगता आल पाहिजे. […]

1 2 3 149