नवीन लेखन...

कायदेविषयक लेखन

सहयोगी सभासद

गुगल आपल्याला असंख्य माहिती पुरवतो. परंतु अचूक माहिती हवी असल्यास वाचनाची सवय असायलाच हवी आणि कायद्यात एकदा वाचले म्हणजे सर्व समजले असे नाही. तर अपडेट राहणे हे आवश्यक असते. काल एका संस्थेत मला संस्थेच्या पदाधिकार्यांनी, त्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे माहित करण्यासाठी बोलावले होते. त्यांचे असे म्हणणे होते की, दोन व्यक्तीनी मिळून जर सदनिका विकत घेतली असेल तरी दुसरे नाव करारात असलेल्या व्यक्तीला निवडणूक लढवण्यासाठी सहयोगी सदस्यचा फॉर्म संस्थेत सादर करावाच लागेल. तुम्हीसुद्धा वरील समितीच्या पदाधीकार्याबरोबर सहमत आहात का? तुम्हाला कधी काय बदल झाले याची माहिती सदर लेखात खास आपल्यासाठी दिली आहे. […]

गृहनिर्माण संस्थेतील सदस्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या मालमत्तेचे हस्तांतरण अधिनियमाबाबत

सोशल मिडिया वर सारखे फॉरवर्ड केले जाणाऱ्या मेसेज मध्ये वरचा क्रमांक लागतो तो “गृहनिर्माण संस्थेत सदस्याच्या मृत्युनंतर हितसंबधाचे हस्तांतरण कसे करावे ” यात अनेक व्यक्ती चुकीचा सल्ला देतात. त्यांना कायद्याचे पुरेसे ज्ञान नसते आणि माहीत नाही हे सांगायला कमीपणा वाटतो. नेहमी कायदेतज्ञ यांचा सल्ला देऊन कागदपत्र केलेले कधीही चांगले. फास्ट फूडची चटक असल्याने सर्व फास्ट करण्यासाठी कायदेतज्ञ यांच्याकडे न जाता गुगलवर शोधून निर्णय घेणारे महाभाग आजही कमी नाहीत असो. आज वरील विषयावर आपणास खालील लेखात माहिती दिली आहे. […]

संस्थेच्या समितीचे, सदस्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे अधिकार

अधिकार मिळाला तरी जबाबदारी याची जाणीव समिती, सदस्य तसेच पदाधिकारी ठेवत नाहीत आणि असहकार सुरु होतो. मनासारखे नाही झाले की, उपनिबंधक किंवा कोर्ट हे सर्वसामान्यासाठी नाही. तेथे काही होणार नाही. अनेकदा आपण चुकीच्या मार्गावर आहोत हे समजून घेण्याची मानसिकताच शिल्लक राहिलेली नसते आणि चुकीच्या मार्गाने व्यक्ती जात राहते. आपणही आपल्या संस्थेचे पदाधिकारी, सदस्य असल्यास अथवा पदाधिकारी होण्यास इच्छुक असल्यास हा लेख आपल्यासाठी आहे. कारण वेळीच आपल्याला अधिकार याची माहिती असल्याने तुम्ही योग्य मार्गावर आहात का याची माहिती मिळेल. सदर लेखात कोणाचे काय अधिकार आहेत हे आपणास समजण्यास मदत होईल. […]

संस्थेच्या देखभाल शुल्क आणि सेवा शुल्क यांची आकारणी

सदनिकाचा ताबा घेतल्यानंतरचे काही वर्ष विकासक देखभाल करतात. त्याचे पैसे त्यांनी आगाऊ घेतलेले असतात. ते सदनिकेच्या आकारमानाप्रमाणे असते. परंतु जेव्हा संस्था नोंदणी होते तेव्हा देखभाल शुल्क हे संस्थेने अवलंब केलेलेल्या उपविधी प्रमाणे करावे लागते. काही संस्था आजही आकारमानाप्रमाणे देखभाल शुल्क आकारतात ते बरोबर आहे असे नाही. संस्थेचे सदस्य सेवा शुल्क म्हणजेच देखभाल शुल्क असे आपण समजत असाल तर ते चुकीचे आहे. या दोन्ही भिन्न बाबी आहेत. असेही म्हणता येइल की, देखभाल शुल्कात सेवा शुल्क समाविष्ट असते परंतु सेवा शुल्क म्हणजे देखभाल शुल्क नव्हे. संस्थेमध्ये उद्भवणाऱ्या अनेक वादांपैकी एक म्हणजे मासिक देखभाल शुल्क. ज्याला आपण “मेन्टेनन्स” असेही म्हणतो. नविन बांधल्या गेलेल्या इमारतीतील सदनिका ह्या एकसमान नसतात त्या वेगवेगळ्या आकाराच्या असू शकतात. उदा. 1BHK ते 5BHK … त्यामुळे सदस्यांना आकारणी कशी करावी यात एकमत होत नाही. अर्थात, सेवा शुल्क सदनिकेच्या आकाराप्रमाणे करता येत नाही. आजच्या लेखात काय आहे सेवा आणि देखभाल शुल्क यामधील नेमका फरक, कशाप्रकारे सदस्यांना मासिक बिलात लावावे शुल्क याबाबतची माहीती आपल्यासाठी. […]

संस्थेच्या समितीची निवडणूक

२०१९ च्या सुधारणेपुर्वी सर्व गृहनिर्माण संस्थाना मतदान घेऊन पदाधिकाऱ्यांची निवड करणे बंधनकारक होते. निवडणूक बिनविरोध करायची असली तरीही निवडणुकीचा कार्यक्रम राबवावा लागत असे. हा कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या माध्यमातून राबविण्यात येत असे. निवडणूक प्रक्रियेत येणारा खर्च संबंधित गृहनिर्माण संस्थांनाच करावा लागत असे. अशावेळी लहान संस्थाना निवडणुकीचा खर्च करणे शक्य होत नसे. त्यात भर म्हणून आरक्षण नमूद केल्याने अनेक ठिकाणी जातीपातीचे राजकारण येऊ घातले होते. बऱ्याच संस्थांच्या आरक्षण असलेल्या जागा रिक्त राहत होत्या. त्यात इच्छुक सदस्य फार कमी असल्याने संस्थेचे कामकाज सुरळीत चालवण्यात बऱ्याच अडचणी येत होत्या. त्यामुळे सहकार कायद्यात उपाय सुचवत (२५० पेक्षा कमी सभासद) लहान संस्थांचे निवडणूक “निवडणूक आयोगामार्फत” न करता संस्थेच्या सर्वसाधारण सभेतच घेण्याचे अधिकार देण्यात आल्याने अनेक संस्थाना त्याचा लाभ मिळणार आहे. परंतु या निवडणुका घेण्यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. […]

संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा

सहकारी गृहनिर्माण संस्थेत प्रामुख्याने वार्षिक सर्वसाधारण, विशेष सर्वसाधारण आणि अधिमंडळ यांची मासिक सभा. सर्वसाधारणपणे नावातून आपण अंदाज घेऊ शकतो को, वार्षिक (वर्षातून एकदा), अधिमंडळ सभा मासिक (महिन्यातून एकदा) परंतु विशेष सर्वसाधारण सभा कधी, कोण, कशाप्रकारे आणि कशासाठी बोलावण्यात येते? याबाबतची माहिती सदर लेखातून आपणास मिळणार आहे. […]

गृहनिर्माण संस्थेच्या प्रवर्तकांची पहिली सर्वसाधारण सभा

डेव्हलपर त्याच्या डोक्यावरील भार लवकरात लवकर उतरवायला उत्सुक असतो. तर कधी दिलेली आश्वासनं बिल्डरने पूर्ण करत नाही तोपर्यत काही सदस्य संस्थेचा ताबा घेण्यास तयार नसतात. काही संस्थेचे सदस्य आणि बिल्डर याचे वाद कोर्टात प्रलंबित असतात. तर अनेक सदस्यांना प्रश्न असतो, संस्था नोदणी झाली… पुढे काय? नविन संस्था एक इमारत १५० ते २०० त्याहून अधिक सदस्य असल्याने कामाचे स्वरूप सुद्धा वेगळे आणि वाढले आहे. अनेक प्रकारचे करार तपासावे लागतात. तेव्हा अशा स्वरूपाच्या कामाची माहिती असलेला कायदेतज्ञ यांच्या सल्ल्याने कारभार केल्यास सदस्याचा वेळ आणि पैसा वाचण्यास मदतच होईल. आजच्या भागात पहिल्या सर्वसाधारण सभेची माहिती आपल्यासाठी. […]

संस्थेच्या सदस्यत्वाचा राजीनामा

केंद्र शासनाच्या सूचनेवरून सहकार कायद्यात २०११-२०१२ पासून २०१९-२०२० पर्यत मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यात आल्या. बऱ्याच सुधारणा अमलात आणण्याआधीच नविन सुधारणा करण्यात आल्या. त्यामुळे अनेकदा सदस्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण होते. बऱ्याच सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये काम करण्यास सदस्य उत्सुक नसतात. त्यात वारंवार होणारे बदल याची काहीही कल्पना नसते. संस्थेमध्ये उपविधीची प्रत मागणी केल्यास उपलब्ध होत नाही. काही संस्थाचा पत्रव्यवहार पाहून तर मला असे आढळून आले की, बरेच जण उपविधीला कायदा समजतात. अनेक संस्थांमध्ये तर त्यांचा स्वत: तयार केलेला कायदा चालतो. जे कायद्याने चुकीचे आहे. प्रत्यक्षात (कायदा) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६०; (रुल्स) महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१, (बाय लॉज) उपविधी, परिपत्रके, आदेश या सर्व वेगवेगळ्या असून या बाबी एकत्र पहाव्या लागतात. तरीही कधी मनात आले की निवडणूक किंवा सर्व पदाधिकारी यांनी एकाच वेळी राजीनामा देणे आणि सरकारी अधिकृत व्यक्ती संस्थेत आणले म्हणजे खूप चांगले केले असे वाटत असले तरी काही महिन्यांनी पुन्हा संस्थेच्या सदस्यांना पुढाकार घ्यावाच लागतो. […]

सहकारी संस्थेत सदस्य होण्याबाबत पात्रता आणि शर्ती

अनेक संस्था पदाधिकारी यांनी विचारलेल्या प्रश्नांत सातत्याने विचारलेला प्रश्न म्हणजे अधिमंडळाच्या सभेस उपस्थिती किंवा संस्थेच्या इलेक्शन वेळी सदस्य कोणाला म्हणावे? कायदा सर्वसामान्यांना माहित असतोच असे नाही. तेव्हा काही पदाधिकारी गोंधळून जातो. त्यामुळे सभेतील विषयांचे वाचन होण्याआधीच वातावरण तापलेले असते. काही कुटुंबातील व्यक्ती मूळ सदस्याचे पत्र घेऊन किंवा कुलमुखत्यार घेऊन येतात. जे पूर्णपणे चुकीचे असते. आजच्या लेखात आपण पाहणार आहोत की, संस्थेचा सदस्य म्हणून कोण पात्र असतात आणि कोणत्या शर्ती त्या व्यक्तींना पूर्ण कराव्या लागतात. […]

गृहनिर्माण संस्थेचे हेल्थ चेकअप कसे कराल ?

येणाऱ्या नवीन सहकार वर्षात, सदस्य आणि संस्थेचे पदाधिकारी यांत परस्पर सौदाह्याचे, आनंदाचे व सहकार्याचे वातावरण तयार करण्यास तसेच होणाऱ्या चुका कमी करण्याबाबत काय करावे? असा प्रश्न एका सदस्याने विचारला. “Precaution is always better than cure”. याचे उत्तर ज्या प्रमाणे इन्कमटॅक्स साठी CA, आजारी पडलात की डॉक्टर, त्याप्रमाणे आपण स्वत: आपला मौल्यवान वेळ कायद्याची पुस्तके वाचून चुकीचे निर्णय घेण्याआधी योग्य कायदेतज्ञ यांचा सल्ला आपल्याला नक्कीच उपयोगी येईल. बहुतेक लोकांना उपविधी म्हणजे कायदा किंवा एखादा सोशल मिडिया मेसेज हा आपल्या मनासारखा असेल तर बरोबर अशी चुकीची समजूत असते. आज या लेखात तुम्हाला सदस्यांनी काय काळजी घ्यावी याची माहिती देत आहे. […]

1 2 3 4 11
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..