नवीन लेखन...

आपल्याला अनेक बाबतीत कुतुहल असतं. अशा प्रश्नांची उत्तरं देणारं हे सदर

डीएनए आणि अमिनो आम्ल

डीऑक्सिरायबोज, एक फॉस्फेट आणि एक नत्रयुक्त घटक यांच्या मिळून बनणाऱ्या एका रेणूला न्युक्लिओटाइड म्हणतात. असा बनतो डीएनए साखळीचा एक मणी. डीएनए हा पेशीतील अतिशय महत्त्वाचा आणि अति कार्यरत असा बहुआयामी रेणू आहे. पेशीतील प्रथिनांच्या बांधणीत याचा मोठा सहभाग असतो. […]

खगोलशास्त्रावर आधारित गैरसमजुती कोणत्या?

खगोलशास्त्राबद्दल जनसामान्यांत अनेक समज-अपसमज प्रचलित असतात. मध्यंतरी अशी बातमी पसरली होती की मंगळ ग्रह पृथ्वीच्या खूपच जवळ येणार असून तो पौर्णिमेच्या चंद्राइतका मोठा दिसेल. ही बातमी खोटी होती. सर्व ग्रह हे सूर्याभोवती फिरताना ठरावीक कालाने परस्परांजवळ येतात. पण जवळ आल्यावरही थोडा तेजस्वी दिसण्यापलीकडे मंगळ नुसत्या डोळ्यांना मोठा दिसत नाही. कारण तो फारच दूर आहे. […]

निसर्ग हा अणुतंत्रज्ञान कशा प्रकारे राबवितो?

अणुतंत्रज्ञान हे निसर्गाला नवं नाही. निसर्ग हा ऊर्जानिर्मितीसाठी अणुसंमीलनाच्या तंत्राचा वापर अब्जावधी वर्षांपूर्वीपासून करतो आहे. आकाशात दिसणारे तारे म्हणजे प्रत्यक्षात प्रचंड आकाराच्या अणुभट्ट्याच आहेत. आपल्याला ऊर्जा पुरविणारा सूर्य हीसुद्धा यापैकीच एक अणुभट्टी असून, त्यात सतत हायड्रोजनच्या अणूंचं संमीलन होऊन त्याचं हेलियमच्या अणुंत रूपांतर होत आहे. अशा अणुभट्टीत ऊर्जेबरोबरच किरणोत्साराचीही निर्मिती होत असते. […]

बनावट संशोधन

चित्रपटांमध्ये कुणीतरी डॉ. नो,, सिंकारा, डाँग किंवा कोणतातरी ‘पुरी’ आपल्याजवळ वैज्ञानिकांची फौज बाळगतो आणि आपल्याला हवे असणारे रसायन, अस्त्र किंवा बॉम्ब तयार करवून घेतो. काही गोष्टी खऱ्या वाटत नाहीत, परंतु असे दृश्य खरे असावे यावर विश्वास ‘लायंसेंको’ प्रकरणावरून बसतो. या प्रकरणामुळे खोटे संशोधन, सत्ताधाऱ्यांचा स्वार्थ, शास्त्रज्ञांच्या हत्या आणि हे सर्व ज्याच्यामुळे घडून आले, त्या तथाकथित शास्त्रज्ञाची आत्महत्या इतके सर्व जगासमोर आले. […]

कार्बन आणि बेरियम तारे म्हणजे काय?

विश्वात रासायनिकदृष्ट्या वैविध्य बाळगणारे विविध प्रकारचे तारे असतात. त्यापैकी ‘कार्बन तारे’ हा एक प्रकार आहे. हे तारे आपल्या आयुष्यातील अखेरच्या टप्प्यांत शिरल्यामुळे राक्षसी आकार प्राप्त झालेले तारे असून, त्यांचे तापमान दोन हजार ते पाच अंश सेल्सियसच्या दरम्यान असते. या ताऱ्यांच्या वातावरणात कार्बनच्या ‘काजळी’ चे प्रमाण जास्त असते. त्यांच्या वातावरणात कार्बन मोनॉक्साईडही आढळतो. या ताऱ्यांचा शोध पिएत्रो अँजेलो सेखी या इटालिअन वैज्ञानिकाने इ. स. १८६० साली वर्णपटशास्त्राच्या साहाय्याने लावला. विसाव्या शतकातील संशोधनातून अनेक कार्बन ताऱ्यांतील कार्बनचे मूळ हे त्या ताऱ्यांच्या गाभ्यात घडणाऱ्या अणुगर्भीय क्रियांत असल्याचे स्पष्ट झाले. […]

अग्नीचा शोध

अग्नीचा शोध लागण्यापूर्वीचा आदिमानव शिकार करून मिळेल ते जनावर किंवा पक्षी फाडून कच्चाच खात असे. एकदा मांसभक्षणाची सवय लागल्याने मग त्याला दुसरे काही आवडत नसणार. आजच्यासारखे मांसाहारी आणि शाकाहारी गट तेव्हा निर्माण व्हायचे काही कारणच नव्हते. […]

पाण्याऐवजी पारा?

एकदा विचारेकाका, वहिनी आणि त्यांची काही मित्रमंडळी उंच डोंगरमाथ्यावरच्या थंड ठिकाणी सहलीला गेले. तिथे गेल्यावर चहासाठी आधण ठेवले गेले. पाणी उकळताना पाहिल्याबरोबर, विचारेंच्या डोक्यातला किडा वळवळू लागला. त्यांनी आपल्या बॅगेतला थर्मामीटर बाहेर काढला. पाणी उकळतंय म्हणजे त्याचे तापमान १०० अंश सेल्सिअस असले पाहिजे. […]

पाण्याच्या इडल्या

विद्यार्थ्यांना वर्गात आरसे आणि भिंगे शिकवतात. दरवेळी भिंगे बाजारातून आणूनच अभ्यासायला हवीत असे नाही. आपल्या घरातच ती मिळवायची. घरात इडली पात्र असते. त्या पात्रात पाणी भरून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायचे. त्या पाण्याचे बर्फ झाले की, बर्फाच्या त्या इडल्या बाहेर काढायच्या. […]

पाण्याची शुद्धीकरण प्रक्रिया

पाण्याच्या प्रत्येक थेंबात जीवन सामावलेलं आहे असं म्हटलं तर ते खोटं ठरू नये. पाणी हेच जीवन होय! आणि तरीसुद्धा याच पाण्याला आपण आपल्या रोजच्या जीवनात गृहितच धरतो, नाही का? स्वच्छ आणि शुद्ध पाणी आपल्याला जर सहजासहजी उपलब्ध होत असेल ना, तर खरोखरंच आपण स्वतःला अत्यंत नशीबवान समजलं पाहिजे कारण जगात, दर सहा जणांमधील एकाला शुद्ध पाणी सहजपणे मिळू शकत नाही. […]

आच्छादन प्रक्रिया- लॅमिनेशन

वह्या, पुस्तके पाण्याने भिजून खराब होऊ नयेत म्हणून पारदर्शक प्लास्टिकची फिल्म बाजारात उपलब्ध आहे. सुरुवातीला आच्छादनासाठी उपयोगात येणारे हे प्लास्टिक ‘पॉलिथीन’ नामक प्रकारचे असे. परंतु आता त्याची जागा ‘पीव्हीसी’ (पॉलिव्हिनाइल क्लोराइड) या प्रकाराने घेतली आहे. ‘पीव्हीसी’ची फिल्म निरनिराळ्या जाडीची तयार करता येते. […]

1 2 3 4 5 6 33
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..