नवीन लेखन...

आपल्याला अनेक बाबतीत कुतुहल असतं. अशा प्रश्नांची उत्तरं देणारं हे सदर

शिजवलेल्या पालेभाजीचा रंग

पानांना हिरवा रंग येतो ते हरितद्रव्यामुळं रितद्रव्य वनस्पतीच्या पेशीमध्ये असतं.वनस्पतींत पेशीआवरणाच्या भोवती सेल्युलोजची पेशीभित्तिका असते. शीभित्तिकेमुळेच पेशीला आधार आणि आकार या मिळत असतो. पेशीभोवती हवेचा थरही असतो. रितद्रव्याच्या मध्यभागी मॅग्नेशिअमचा अणू असतो. त्याच्यामुळे हरितद्रव्य तेथे तोलून धरलं जातं. मॅग्नेशिअमचा अणू तेथून गेला, तर हरितद्रव्य कोलमडून पडतं. […]

पान खाल्ल्यामुळे कॅन्सर होतो का?

पानाचा विडा तयार करण्यासाठी नागवेलीचं पान वापरलं जातं. या पानावर चुना आणि काथ लावला जातो. त्यावर सुपारी ठेवून पानाची पुडी केली जाते. यात आवडीनुसार लवंग, वेलची, गुंजेची पानं, गुलकंद, तंबाखू इत्यादी पदार्थ टाकतात. पण विड्यात नागवेलीच्या पानाबरोबर काथ, चुना आणि सुपारी हे पदार्थ मात्र हवेतच. पानात जे इतर पदार्थ टाकले जातात, तसंच पान कोणत्या प्रदेशातलं आहे, त्यावरून त्या विड्याला नाव दिलं जातं. उदा. मघई, बनारसी, कलकत्ता, पूना इत्यादी. […]

पाणी ‘वैश्विक द्रावक’ का आहे?

नाना तऱ्हेचे पदार्थ पाण्यात सहजतेने विरघळतात, कारण पाणी एक उत्तम द्रावक आहे. शास्त्रीय भाषेत ज्या द्रावणात आम्लधर्मी आणि आम्लारीधर्मी असे दोन्ही पदार्थ विरघळतात त्याला (सार्वत्रिक) वैश्विक द्रावक म्हणतात. पाणी हे वैश्विक द्रावक आहे. याचे कारण पाण्याच्या रेणूत दडलेले आहे. […]

कोवळ्या पानांचा लाल रंग

पान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर हिरव्या रंगाचं पान येतं. पण तुम्ही निरीक्षण केलं आहे का? आंबा, पिंपळासारख्या झाडांची पानं कोवळी असताना लाल असतात. नेहमी हिरवी असणारी पानं कोवळी असताना लाल का दिसतात? पानाला हिरवा रंग येतो ते त्याच्यात असलेल्या हरितद्रव्यामुळं, पण फक्त वनस्पतीत रंगाचेच हिरव्या रंगद्रव्य असतं असं नाही. […]

कुटुंब समृद्धी बाग

आपल्याकडच्या बहुसंख्य शेतकऱ्यांचं उत्पन्न जेमतेम कसंबसं जगण्याइतकंच असतं. त्यातच अलीकडे वाढलेले उत्पादन खर्च, शेतमालाला मिळणारे कमी भाव, यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत खालच्या पातळीवर पोहोचलेली दिसते. साहजिकच शेतकरी व त्याच्या कुटुंबीयांना आधुनिक आहारपद्धतीत तज्ज्ञांनी शिफारस केलेले अन्नघटक तसेच पोषणमूल्येही मिळत नाहीत. त्यामुळे शेतकरी कुटुंबांत कुपोषण वाढून त्यांचे आरोग्यमान दिवसेंदिवस ढासळत चालले आहे. […]

कुटूंब समृद्धी बागेतील पिके

कुटुंबे समृद्धी बाग तयार करताना जमिनीचे सपाटीकरण, बांधबंदिस्ती वगैरे जमिनीला खत देण्यापूर्वीच करावे. जमीन हलकी असेल तर किमान १५ ते २० सेंटिमीटर खोल माती राहील इतकी गाळाची वा काळी कसदार माती या क्षेत्रात टाकून घ्यावी. शेणखताबरोबरच तिसरा हिस्सा कोंबडी खत व तिसरा हिस्सा लेंडी खत मिसळून टाकले तर अधिक फायदा होईल. […]

फळांची साठवण

कैरी पिकून आंबे मिळावेत यासाठी आपण खास पेंढ्याची आढी घालतो. द्राक्षे, संत्रे यासारखी फळं आपण फ्रीजमध्ये ठेवतो. काही फळं मुद्दाम पिशवीत ठेवतो, तर केळ्यासारखी फळं बाहेर ठेवतो. सरक सगळ्या फळांना आपण एकाच पद्धतीने का ठेवत नाही? थोडक्यात आणलेलं फळं जास्त दिवस चांगल्या स्थितीत राहावं यासाठी आपण ते फळ कोणत्या प्रकारचं आहे, हे विचारात घेतो. […]

पिंकलेली मधुर फळं

टणक, फारसा वास नसलेली, अगदीच नकोशी, कडवट, आंबट-तुरट चवीची कच्ची फळं पिकल्यानंतर मात्र मधुर लागतात आणि हवीहवीशी वाटतात. असा आमूलाग्र बदल होतो तो कशामुळे?आंबा, चिकू, सफरचंदसारख्या फळांत गर असतो. अशा फळांत बी अजून तयार व्हायची असेल, तर फळाचा आतील भाग आम्लाने भरून जातो. त्यामुळे फळ आंबट लागतं. साहजिकच पक्षी, माकडे, कीटक वा इतर प्राणी या फळांपासून राहतात. […]

तिखट मिरची

हा हू करताहेत, डोळ्यातून, नाकातून पाणी येतंय, पण तरीही मिरची, तिखट पदार्थ चवीनं खात आहेत, असे अनेक जण आपल्या अवतीभवती सापडतील. खरं तर तिखट ही चव नव्हे, तर तोंडाचा दाह आहे. मिरची कुळातील वनस्पतींत कॅप्सायसायनॉइड प्रकारची संयुगं असतात. त्यापैकी ‘कॅप्सायनिन’ हे संयुग आपल्या वापरातील मिरच्यांत आढळतं. […]

सफरचंदातले पॉलिफिनॉल ऑक्सिडेज

सफरचंद आपल्या आहारातील एक महत्त्वाचा घटक झालेला आहे. ताज्या, कापलेल्या सफरचंदाच्या करकरीत पांढऱ्या फोडी खाण्यातली मजा काही वेगळीच. मात्र सफरचंद कापून ठेवलं की ते लालसर होतं, आणि मग खावंसं वाटत नाही. सफरचंद कापून ठेवलं की लालसर का होतं? आपण एक प्रयोग करू या. एक सफरचंद घ्या. ते उभे कापा. […]

1 2 3 4 33
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..