नवीन लेखन...

आरोग्यविषयक लेख

जवस आणि सांधेदुखी…नाण्याची दुसरी बाजू!!

सांधेदुखीवर औषध म्हणून ‘जवस’ वापरण्यावर एक पोस्ट फिरत आहे. यासंदर्भात लिहा म्हणून काहीजणांनी आग्रह केल्याने लिहितो आहे. जवस म्हणजे काय? सर्वप्रथम जवस आणि जव या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत हे लक्षात घ्या. जवस म्हणजे मराठीत अळशी; इंग्रजीमध्ये Flax seed. Linum usitatissimum हे जैवविज्ञानीय नाव. आधुनिक शास्त्रानुसार; या धान्याच्या तेलात omega 3 and omega 6 fatty acids […]

आहारातील बदल-शाकाहार भाग १२

आता काय करू? कोकणात गहू वापरायचा नाही तर आता काय करू ? आता गहू खायची एवढी सवय (सात्म्यता) झाली आहे आता काय करू ? गहू सोडता येणार नाही. आता काय करू ? सुखाची एवढी सवय झाली आहे आता काय करू? जसा प्रदेश, तसा आहार जसा आहार, तशी शरीरयष्टी जशी शरीरयष्टी, तसे काम जसे काम, तसा आहार. […]

वजन कमी करण्यासाठी उपास?

‘डायट’ हे आपल्याकडे गेल्या काही वर्षांत बरेच फोफावले फॅड आहे. ज्यूस डायट ते केटोजेनिक डायट असे विविध डायट प्रकार घाऊक दराने आढळून येतात. वजन कमी करण्यासाठी उपास करणे हा एक ‘अनोखा’ मार्ग काहीजण अवलंबतात. विशेषतः महिलावर्गात ही पद्धत फारच प्रसिद्ध आहे. “सध्या वेट ओब्सर्व्ह करतेय. डायटचा भाग म्हणून रात्री जेवत नाही.” असं वाक्य बऱ्याचदा कानावर पडत […]

फोडणी देण्यासाठी तेलाचा वापर करावा का?

फोडणी देण्यासाठी तेलाचा वापर करावा का?! काहींना हा प्रश्न वाचून आश्चर्य वाटले असेल. फोडणीसाठी तेलच वापरले जाते हे आपल्या सगळ्यांना तोंडपाठ असलेले उत्तर. त्या तेलातही सोयाबीन वापरावे की सूर्यफूल अशा प्रश्नातच आम्ही बुडालेले असतो. मात्र मुळात फोडणीसाठी तेलच वापरावे का अन्य काही पर्याय आहे? याचा विचारदेखील आमच्या मनाला शिवत नाही. फोडणी देताना नेमकी काय प्रक्रिया होते? […]

आहारातील बदल-शाकाहार भाग ११

जिथून समुद्र फक्त पन्नाससाठ किमी च्या अंतरावर आहे, तिथे तांदुळ हे मुख्य अन्न आहे, हे कदापि विसरून चालणार नाही. जरी ग्रंथामधे गोधूम म्हणजे गहू, प्रमेह म्हणजे प्रचलीत नावानुसार साखरेच्या आजारात, सांगितला गेला असला तरी, प्रदेश विचारानुसार आणि गुणधर्मांचा विचार करून, गहू अपथ्य (म्हणजे खाऊ नये ), म्हणून सांगायला सुरवात केल्यावर रूग्णांच्या लक्षणामधे खूप फरक पडलेला, मी […]

दिवाळीचा फराळ आणि आपले आरोग्य!!

लाडू, चिवडा, शेव, करंज्या, शंकरपाळे, अनारसे…..वाढता वाढता वाढे असलेली फराळाच्या पदार्थांची यादी. त्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले मिठाईचे बॉक्स आणि आता तर चॉकलेटस् चे डबेसुद्धा. दिवाळी आली म्हणजे आठवडा- पंधरा दिवसांत हे सगळे पदार्थ खाऊन पोटाचा घेर हा हा म्हणता वाढतो. वजनाच्या काट्याची तर गोष्टच निराळी. अशा माहौलात वजनावर नियंत्रण कसे ठेवावे  याकरता पाच सोप्या टिप्स. १. […]

परदेशी खाद्यपदार्थ वाईट असतात का?

ब्रेड, नुडल्स, पास्ता इत्यादि गोष्टी आरोग्यास अपायकारक आहेत असे म्हणणे असेल तर परदेशातील लोक अशाच गोष्टी खाऊनही निरोगी कसे असतात?’ अशा काहीशा आशयाचा प्रश्न काल-परवा विचारला गेला. खरं तर यावर त्या त्या देशातील खाद्यसंस्कृती आणि पदार्थ यांवर सविस्तरपणे एखादे पुस्तक लिहिता येईल इतका मोठा विषय आहे. तरी यावरील स्पष्टीकरण थोड्क्यात देतो. १. वरील पदार्थ वाईट आहेत […]

पालेभाज्यांचा बागुलबुवा!!

आजकाल जिथे तिथे ‘Green leafy vegetables’ चा बोलबाला ऐकू येतो. कित्येक आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टर्सदेखील नियमितपणे पालेभाज्या खाण्याचा सल्ला देतात. इतक्या प्रमाणात पालेभाज्या खाण्याची सवय आपल्याकडे पूर्वीपासून होती का? या प्रश्नाचे उत्तर बहुतांशी नकारार्थीच मिळते. मग आताच हा गवगवा का? याचे उत्तर नेहमीप्रमाणेच दडलेले आहे ते परदेशी संशोधनांत! Green leafy vegetables नियमितपणे आहारात घेतल्याने आतड्यांचा कर्करोग होण्याचा […]

1 125 126 127 128 129 156
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..