नवीन लेखन...

जेष्ठ नागरिकांचा साथी – जेष्ठमध

ज्येष्ठमध हे बहुगुणी औषध असून त्याचा वापर पित्तनाशक म्हणून देखील केला जातो. तसेच यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि बुद्धी देखील तेजस्वी बनते. ज्येष्ठमध वात आणि कफच्या समस्येवर देखील उपयुक्त आहे. […]

महाराष्ट्राच्या अरण्यातील वृक्ष संपदा – भाग २ – सुगंधित चंदनवृक्ष

सुगंधी तेलासाठी प्रसिद्ध असलेला एक वृक्ष. हा वृक्ष सँटॅलेसी कुलातील असून जगभर चंदनाच्या साधारणपणे २५ जाती आहेत. हा मूळचा भारतीय वृक्ष असून भारत, चीन, श्रीलंका, मलेशिया, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया ते हवाई बेटांमध्ये याची लागवड करण्यात आली आहे. कोरडया भागात समुद्रसपाटीपासून सु. १,२०० मी. उंचीपर्यंत चंदन मोठया प्रमाणात आढळतो. कर्नाटक, तामिळनाडू राज्यांत चंदनाचे वृक्ष विपुल प्रमाणात आढळतात. कर्नाटक राज्यात म्हैसूर तसेच इतर अनेक ठिकाणी या वृक्षावर आधारित अनेक लघुउद्योगांचा विकास झालेला दिसून येतो. याच्या सुवासिक गुणधर्मामुळे अनेक शतकांपासून ह्याचा वापर, लागवड व व्यापार चालत आला आहे. परंतु याच कारणामुळे या वृक्षाचे वन्य (Wild) वाण सध्या नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. मोठ्या आकारमानाची लाकडे आता आढळत नसल्यामुळे फर्निचरांसाठीच्या लाकूडकामासाठी याचा वापर संपला असला, तरीही सुवासिक तैलार्कासाठी याची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. […]

थंडी ही गुलाबी….

हिवाळा हा सर्वांचा आवडता ऋतू आहे. महाराष्ट्रातील हिवाळा हा उत्तर भारतातील थंडी पेक्षा खूपच सुसह्य व गुलाबी म्हणण्या इतपत आनंददायी असतो. या दिवसात ना पावसाची पिरपिर ना उन्हाच्या झळा. […]

महाराष्ट्राच्या अरण्यातील वृक्ष संपदा – भाग १ – चिंच

आपण यापूर्वी मराठीसृष्टीतील माझ्या लेख मालिकेतील अनुक्रमे १. महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग १-१० व २. ओळख महाराष्ट्रातील जंगलांची: भाग १-१० हे लेख वाचले आहेत. त्या पुढील नवीन लेख मालिका सुरु करत आहे. कारण अजूनही बरेच महत्वाचे वृक्ष व त्यांची माहिती राहिली आहे. नवीन लेख मालिकेचे शीर्षक आहे ” महाराष्ट्राच्या अरण्यातील वृक्ष संपदा “. या मालिकेचेही वाचक स्वागत करतील अशी आशा आहे. […]

रक्तदाब – कारणे व उपाय

रक्तदाब हा विशिष्ट जीवनशैलीमुळे निर्माण झालेला आजार आहे. गेल्या काही वर्षांत त्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. म्हणूनच अति किंवा कमी रक्तदाब निष्पन्न झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आधीच सजग होणे शहाणपणाचे आहे. […]

भारतीय स्त्रिया, व्याधिक्षमत्व आणि उपाय 

कोरोनाच्या संसर्गजन्य महामारीच्या साथीच्या निमित्ताने ‘व्याधिक्षमत्व’ हा विषय ऐरणीवर आला. जो-तो रोगप्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी काय काय करता येईल? यासाठी इंटरनेटवर माहिती शोधू लागला. जवळच्या डॉक्टरांनाही सल्ले विचारू लागला. […]

पंचकर्म, रोगप्रतिकारशक्ती आणि व्याधिक्षमत्व

कॉलेजला पोहोचायला उशीर होतोय असे घड्याळ ओरडून सांगत असल्यामुळे घाई-घाईत जिना उतरत असतानाच शेजारच्या प्रमिलाकाकूंचा आवाज कानावर पडला, ‘अरे सचिन, तो काढा आणखी किती दिवस घ्यायचा आहे? आज तब्बल साडेचार महिने झाले बघ. […]

व्याधिक्षमत्वाचा विचार (असा सुद्धा)

कठलाच भारतीय ‘२२ मार्च २०२०’ ही तारीख यापुढे विसरणार नाही. मुक्तपणे सर्वत्र संचार करणारे सर्व लोक एका आजारापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी आपल्या घरामध्ये स्वतःला कोंडून घेऊ लागले. त्या चार भिंती त्याच्यासाठी संरक्षक कवच बनल्या. आम्हा डॉक्टरांना दवाखान्यात जाण्यासाठी घराबाहेर पडावे लागत होते, त्यावेळी तो रस्त्यावरील शुकशुकाट, निर्मनुष्य रस्ते, एकही गाडी नाही, ट्रॅफिक नाही अशी भयाण शांतता, भयाण सन्नाटा आयुष्यात पूर्वी कधीच अनुभवला नव्हता. […]

जागसी का रे वाया?

रंजन दास हे SAP या मल्टी नॅशनल कंपनीचे CEO होते. भारतातल्या सर्व CEO पैकी सगळ्यात तरुण होते. वयाच्या फक्त बेचाळिसाव्या वर्षी ते ‘ही’ अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडत होते. प्रचंड हुशार, वक्तशीर आणि ‘हेल्थ कॉन्शियस’ म्हणून त्यांची ख्याती होती. […]

पचन चांगले तर रोग पांगले

‘भा’ म्हणजे तेज आणि ‘रत’ म्हणजे त्याच्या पूजेत मग्न असणारे. तेजाच्या म्हणजे अग्नीच्या पूजेत रत असलेल्या लोकांचा समूह म्हणजे भारत. ही व्याख्याच सांगते की आपण समस्त भारतीय मूलतः तेजाचे पुजारी आहोत. ऋग्वेदाच्या पहिल्या सूक्तातील पहिली ऋचा अग्नीच्या पूजनाचीच आहे: […]

1 2 3 52
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..