नवीन लेखन...

घट्ट कवडी दही लावण्याची शास्त्रीय पद्धत

दही लावण्याची परंपरा आपल्याकडे शेकडो वर्षांपासून आहे. पण बरेच वेळेला दही व्यवस्थित लागत नाही. त्यात पाणी व चोथा वेगळा होतो. अशावेळी दही कसे लागते व त्यासाठी कोणत्या परिस्थती अनुकूल व प्रतिकूल असतात याची आपण शास्त्रीय माहिती घेऊ. दही लागणे हे खालील गोष्टीवर अवलूंबून असते. […]

माझे खाद्यप्रेम – २

साधारणपणे ज्या लोकांना चवीने वेगवेगळ्या गोष्टी खाण्याची सवय आहे त्यांना खाऊ घालण्याची सवय सुद्धा असते, किंबहुना ती असावी. वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घालण्यात एक वेगळीच मजा आहे अर्थात ती स्वत: अनुभवावीच लागते, तिचा देखावा करून चालत नाही. तस पाहिलं तर आज जग खूप पुढे गेलय त्यामुळे आज अनेक जणांना जेवण करता आलच पाहिजे ही बाब पटेनाशी झाली आहे. स्वतःचा चहा देखील करता न येणारी आज समाजात अनेक माणसे आहेत. अर्थात त्यांना ह्या गोष्टीची लाज नव्हे तर भूषण वाटत. […]

माझे खाद्यप्रेम – १

स्वयंपाक हा विषय माझ्यासाठी फार जिव्हाळ्याचा आहे. अर्थात ह्यामध्ये करणं आणि खाणं असे दोन प्रकार पडतात. अर्थात दोनही प्रकार मला नेहमी आवडतात. पण शेवटी त्यातील दुसरा प्रकार माझ्या सर्वाधिक आवडीचा आहे. विविध चवींचा आस्वाद घेण्यासाठी माझी जीभ सदैव आतुर असते. म्हणजे तिखट, गोड, कडू, आंबट, तुरट , खारट अशा वेगवेगळ्या चवीचे वेगवेगळे पदार्थ डोळ्यासमोर आले की तोंडाला पाण्याची खळखळती धार सुरू होते. […]

शाकाहारी का मांसाहारी ?

इथ शाकाहार कि मांसाहार किंवा काय चांगल काय वाईट ? हा विषय च नाहीये. कोणी काय खाव हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.पण एवढच सांगण आहे कि कोणाच्या दबावाखाली किंवा एखाद्या बंधनात अडकून आपल मन मारू नका .. […]

आर टी इ – राईट टू इट

अमेरिकेच्या रेडी टू इट आरटीई खाद्यसंस्कृती बद्दल जेव्हा जेव्हा वाचायचो त्यावेळी वाटायचे की ही वेळ भारतात यायला अजून खूप अवकाश आहे. पण गेल्या सहा महिन्याच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये भारतामध्ये रेडी टू इट मिल्स बनवणाऱ्या कंपन्यांच्या उत्पादनांच्या मागणीमध्ये तब्बल ३० ते ४५ टक्क्याने वाढ झाली आहे! […]

फ्रान्समधील राष्ट्रीय वॅफल दिवस

आपल्याला लहानपणी खारुताईचं चित्र असलेलं एक वॅफल पॅकेट मिळायचं. बऱ्याच जणांना ते आवडत होतं. पण वेळ जसा पुढे सरकत गेला तसं ते पॅकेटही कालबाह्य होत गेलं. बऱ्याच लोकांना ते अजून डोळ्यांसमोर येत असेल पण काय करणार ते पॅकेट आता मिळत नाही. अशांना मी आज वॅफल कसं बनवतात ते सांगणार आहे. […]

करायला गेलो एक

माझे ‘Culinary Skills’ कसे वाढत गेले ते ह्या प्रसंगातून कळेल. पंचवीस वर्षापूर्वी मी माझे बिर्‍हाड पॅरिसला थाटले होते. किचनमधुन ‘आयफेल टॉवर’ दिसत असे. रोजचे जेवण बनविणे सवयीचे झाले होते (ब्रेडच्या विविध प्रकारांनी मला आधार दिला). एका सुट्टीच्या दिवशी माझ्या डोक्यात रवा, साखर व तूप यांचा झिम्मा सुरू झाला व मी शीरा करण्याचा निश्चय केला. […]

बेंगलोरमधली खवय्येगिरी

मला अजूनही आठवतं, कॉलेज मध्ये ट्रिप ला कुठं जायचं यावर आमच्या खलबती होत असताना साऊथला जाऊया असा आंधळा आग्रह होता माझा. कारण काय तर, साऊथ फूड ! कदाचित अन्नदेवतेने माझ्या मनातलं आणि पोटातलं ऐकलं असावं आणि मला बेंगलोरमध्ये इडली डोसाच्या रिंगणात बसवलं असावं. […]

सातारच्या पेढ्यांना कंदी पेढे अस कां म्हणतात?

महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणचे पेढे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. यात कोल्हापूरचे फिक्के पेढे, कुंथलगिरीचे पेढे, वाडीचे पेढे व खूप काही. मात्र इतर पेढ्यांच्या तुलनेत सातारचे पेढे हे खवा जास्त भाजल्यामुळे भुरकट दिसतात. कमी साखर हे या पेढ्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. परिणामी हा पेढा सहा ते आठ दिवस सहज टिकतो. […]

1 2 3 4 17
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..