नवीन लेखन...

अर्थ, वाणिज्य विषयक लेख

नोटा बंदीचे धोरण आणि चलन बदल

नोटाबंदीचा सर्वात मोठा परिणाम लघु उद्योगांवर झाला, नोटबंदीपूर्वी बहुतांशी उद्योगांमध्ये रोखीने व्यवहार होत होते. नोटाबंदीच्या काळात या उद्योगांमध्ये रोखीने व्यवहार होणे बंद झाले, रोख रकमेचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेकांचे उद्योग ठप्प झाले. परंतु पुढील काळात परिस्थिती सुधारली. […]

अर्थाने समर्थ होण्याचा स्वार्थ

ख्रिस्त पूर्व काळात विकसित झालेल्या सिंधू खोऱ्यातील सभ्यतेमध्ये प्रगत आणि भरभराटीची आर्थिक व्यवस्था होती. सिंधू खोऱ्यातील लोक शेती, पाळीव प्राणी, तांबे, कांस्य आणि कथील यापासून अवजारे आणि शस्त्रे बनवत तसेच मध्यपूर्वेतील काही देशांशी व्यापारही करत. […]

बचत आणि गुंतवणूक

गुंतवणूक करणे म्हणजे जमिनीत आंब्याचे बी पेरण्यासारखे असते. बी पेरून त्याची योग्य निगराणी करावी लागते, अनेक वर्षे वाट पाहावी लागते, तेव्हा त्याचे मोठ्या वृक्षात रूपांतर होते. हा वृक्ष नेमका किती मोठा होईल व किती वर्षांनी आंबे येतील हे आधीच अचूक सांगता येत नाही. […]

गुंतवणूक नियोजन

गुंतवणूक ही उत्तम प्रकारे करणं, पैशाला कष्ट करायला लावणं हे अतिशय आवश्यक असतं. आजही आपली कुटुंबपद्धती उत्तम प्रकारे सुरू आहे. त्यामुळे आपली पुढची पिढी आपली काळजी घेतेच, पण आपली अशी अपेक्षा असते की आपला आर्थिक भार पुढच्या पिढीवर पडू नये. तसेच पुढच्या पिढीची जी स्वप्नं आहेत, त्या स्वप्नपूर्तीसाठीसुद्धा आपला हातभार लावणं ही प्रत्येकाची इच्छा असते. […]

शेअर मार्केटशी मैत्री

अनेकदा कंपन्या भांडवल वाढीसाठी पब्लिक ऑफर न आणता कंपनीच्या भागधारकानाच नवीन समभाग अग्रहक्काने विकतात. बहुतेकदा अशा वेळी ऑफर करण्यात आलेले शेअर प्रचलित बाजारभावापेक्षा कमी असतात. त्यामुळे भागधारक ही ऑफर स्वीकारतात व कंपनीची भांडवल उभारणी होते. […]

डिजिटल रुपया आणि डिजिटल बँकिंग

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांनी संयुक्तपणे ‘लेस कॅश व्हीजन 2018’ असे पत्रक तयार केले. ज्यात ग्राहकांसाठी मजबूत पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. डिजिटल बँकिंग आणि डिजिटल रुपी लोकप्रिय करण्यासाठी केंद्र सरकार व रिझर्व्ह बँक सातत्याने प्रयत्न करताना दिसतात. त्यामध्ये व्यापारी बँकांचाही फार मोठा सहभाग व सहकार्य आहेच. […]

भारतीय अर्थव्यवस्था, बँकिंग क्षेत्र, सहकारी बँकिंग क्षेत्र, उद्योग व्यवसाय याबाबत…

भारत हा प्रामुख्याने गरिबांचा देश. युरोपीय किंवा अमेरिकन देशातील लोकांकडे ज्याप्रमाणे आर्थिक सुबत्ता असते, तशी आर्थिक सुबत्ता आपल्या देशातील नागरिकांकडे नसते. त्यामुळे, भारतातील सामान्य जनतेकडे उद्योग उभारणीसाठी पुरेसे भांडवल उपलब्ध नसते. म्हणूनच आर्थिक संस्थांकडून उद्योग व्यवसायाला कर्ज पुरवठा केला गेला. त्यामुळे उत्पन्नाचा स्तर वाढला. जनजीवन सुसह्य झाले. यामध्ये बँकांचा वाटा मोठा आहे. बँकिंगमुळेच उद्योग व्यवसायाला गती प्राप्त झाली. 1969 मध्ये झालेल्या बँकांच्या राष्ट्रीयकरणानंतर, बँकांनी भरीव कामगिरी केली. खेडोपाडी, अनेक शहरांमध्ये बँकांच्या शाखांचे जाळे वाढले. […]

स्टार नंबरच्या नोटा!

भारतीय नोटांना रिझर्व्ह बँकेकडून क्रमांक दिले जातात. नोटेवर मालिका आणि क्रमांक छापले जातात. त्यामुळे बँकेला प्रत्येक नोटेचा हिशेब ठेवता येतो. नोटेवर नोट धारकाला तेवढे पैसे देण्याचे अभिवचन छापलेले असते. एक रुपयाच्या नोटेवर अर्थ सचिवांची तर इतर सर्व नोटांवर  रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची सही असते. […]

खुळखुळणारी नाणी

गुप्तकाळात मातृदेवतांचा उठाव झाल्यानंतर त्यांनाही नाण्यांवर स्थान मिळू लागले. जसे सिंहासनाधिष्ठीत लक्ष्मी किंवा उमा, पार्वती. पुढे मुस्लिम राज्यकर्ते आल्यावर मानवी आकृत्याच गायब झाल्या. एका राजाने खलिफाचे चित्र असलेली नाणी काढली म्हणून असंतोष निर्माण झाला व नाणे मागे घ्यावे लागले. अशा काळात स्त्रियांना कोण स्थान देणार. तरीही एका मुस्लिम राजाने आपल्या रूपवती राणीची जन्मपत्रिकाच नाण्यावर छापली होती. […]

अर्थशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर

आपण आपल्या आवडत्या अभिनेत्याप्रमाणे आवडत्या नेत्यालाही कोणत्या ना कोणत्या साचात बंदिस्त करायला आपण व आपला समाज आतुर असतो. त्यामागचे कारण म्हणजे सर्वच पातळीवर त्याबाबतचे अज्ञान  किंवा बौद्धिक आळस. एकदा का आपल्या आवडत्या साच्यात त्यांना बसवले की, त्याच्या स्वतंत्र विचारशक्तीची वा आकलनाची गरज आपल्याला वाटत नाही. खरं तर आपले डोके चालवून आकलन करून घ्यायची वेळ येऊ नये, यासाठीच तर आपला आग्रह आणि अट्टाहास असतो. अशा साचेबद्ध रचनेत सर्वात जास्त अन्याय झालेले महापुरुष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. […]

1 2 3 4 19
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..