नवीन लेखन...

शैक्षणिक

सत्याचा शोध

गुन्हेगाराकडून सत्य वदवण्यासाठी विविध पद्धतींचा वापर केला जातो. या पद्धती वेगवेगळ्या तत्त्वांवर आधारलेल्या आहेत. काही पद्धती रसायनांचा वापर करतात, तर काही पद्धती इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात. प्रत्येक पद्धतीचे फायदे-तोटे आहेत, तसेच प्रत्येक पद्धतीला स्वतःच्या मर्यादा आहेत. सत्याचा शोध घेऊ पाहणाऱ्या या विविध प्रचलित पद्धतींची थोडक्यात ओळख करून देणारा हा लेख… […]

त्रिमितीय जीवाश्म

पृथ्वीवरच्या वृक्षांचं स्वरूप उक्रांतीद्वारे सतत बदलत आलं आहे. आज आपल्या अवतीभोवती अनेक जाती-प्रजातींचे मोठमोठे वृक्ष आढळतात. मात्र एकेकाळी पृथ्वीवर फक्त शेवाळासारख्या किंवा नेच्यांसारख्या दिसणाऱ्या, छोट्या अपुष्प वनस्पती अस्तित्वात होत्या. या वनस्पतींना वृक्षासारखं स्वरूप सुमारे अडतीस कोटी वर्षांपूर्वी प्राप्त झालं. या वृक्षांचं स्वरूप आजच्या वृक्षांपेक्षा खूपच वेगळं होतं. […]

इमारतींचे पाडकाम

एखाद्या प्रचंड आकाराच्या इमारतीची वा तत्सम बांधकामाची निर्मिती जशी आव्हानात्मक असते, तसेच त्या बांधकामाचे पाडकामही आव्हानात्मक असते. मोठे बांधकाम सुरक्षितपणे पाडताना, अनेक अडचणींवर मात तर करावी लागतेच; पण त्याचबरोबर पाडकाम करणाऱ्या तज्ज्ञांचे स्थापत्यशास्त्रातील ज्ञान, अनुभव, कौशल्य हे सर्वच पणास लागतात. अशी मोठी पाडकामे करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध पद्धतींची ही ओळख… […]

रेझान्ग्लाची लढाई

हि गोष्ट आहे १९६२ च्या चीनशी झालेल्या युद्धात, लडाखच्या रेझान्ग्ला खिंडीत शूर भारतीय सैनिकांनी केलेल्या, एका लढाईची. ही लढाई चुशुल जवळच्या बर्फाच्छादित पर्वतांमध्ये लढली गेली. […]

टेडी डे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट ह्यांचे टोपण नांव आहे टेडी.. एकदा ते शिकारीला गेले असतांना जखमी अस्वलाला पाहून त्यांचे मन द्रवले , त्यांनी त्याची शिकार केली नाही.त्यांच्या या उदारतेचे चित्र एका व्यंगचित्रकाराने , एका वृत्तपत्रात रेखाटले. ते पाहून एका उद्योगपतीच्या पत्नीला ,खेळण्यातले अस्वल बनवण्याची कल्पना सुचली .म्हणून त्या अस्वलाला टेडी हे नांव देऊन ते राष्ट्रपतींना समर्पित करण्याची परवानगी त्या उद्योग पतींनी मागितली आणि असा या टेडी बेयरचा जन्म २० व्या शतकांत झाला. […]

जागतिक कडधान्य दिन

‘जागतिक कडधान्य दिन’ पहिल्यांदा २०१६ मध्ये साजरा करण्यात आला, नंतर संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने १० फेब्रुवारी हा जागतिक कडधान्य दिन म्हणून साजरा करण्याचा ठराव मंजूर केला. तेव्हापासून हा दिवस ‘जागतिक कडधान्य दिन’ म्हणून साजरा केला जातो. […]

प्लॅस्टिकबंदी

सरकारने ठरवले, न्यायालयाने मान्य केले आणि महाराष्ट्रात ‘प्लॅस्टिकबंदी’ लागू झाली. प्लॅस्टिक हाच पर्यावरणाचा सर्वांत मोठा शत्रू आहे आणि या प्लॅस्टिकबंदीमुळे पर्यावरणाचा हास आणि मुक्या जनावरांचा त्रास थांबणार, असे घोषित केले गेले. समुद्रातल्या प्रदूषणाला या बंदीमुळे आळा बसेल अशी खात्री दिली गेली. प्लॅस्टिकला पर्यावरणाचा गुन्हेगार ठरवल्यावर, प्लॅस्टिक वापरत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना त्या वापराबद्दल कायद्याने चक्क गुन्हेगार ठरवले गेले आणि त्यांच्यावर अतिरेकी दंड लादण्यात आला […]

भविष्यातील जहाजे

भविष्यातला, पारंपरिक इंधनाच्या अभावी जहाज वाहतुकीवर होणारा प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची नवी इंजिने तयार केली जात आहेत. यांतली काही इंजिने ही नव्याने विकसित होत असली तरी काही इंजिनांत पूर्वीच्याच तंत्रज्ञानाचा अधिक कार्यक्षमतेने वापर केला गेला आहे. अशा या विविध प्रकारच्या आधुनिक इंजिनांचा आणि इंधनांचा हा वेध. […]

आयुका आणि चार्ल्स कोरिया

जगप्रसिद्ध वास्तुरचनाकार चार्ल्स कोरिया यांचे अलीकडेच निधन झाले. आयुका या विख्यात संस्थेची वास्तू ही चार्ल्स कोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आली. या निमित्ताने आयुकाचे संस्थापक-संचालक प्रा. जयंत नारळीकर यांचा चार्ल्स कोरिया यांच्याशी निकटचा संबंध आला प्रा. नारळीकरांनी लेखणीबद्ध केलेल्या, चार्ल्स कोरिया यांच्या या काही आठवणी. […]

आगीशी झुंजताना

मुंबईत आगी लागण्याच्या अनेक घटना घडतात. अग्निशमन दलातील जवान आणि अधिकारी आपला जीव धोक्यात घालून या आगी विझवतात. या विझवताना अनेकदा अग्निशमन दलाचे जवान आणि अधिकारी जखमी तर होतातच पण काही वेळा तर त्यांना प्राणही गमवावे लागतात […]

1 2 3 4 153
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..