नवीन लेखन...

महाराष्ट्र, महाराष्ट्र दिन आणि महाराष्ट्राची राजभाषा मराठी

महाराष्ट्र, महाराष्ट्र दिन आणि महाराष्ट्राची राजभाषा मराठी, एक चिंतन- वेडी स्वप्न पाहायची आणि सनदशीर मार्गाने वाटेल ते करून ती पूर्ण करायची हे मराठी माणसाच्या रक्तात आहे. त्यालाठी पडतील ते कष्ट करायची, संयमाने वाट पाहायची त्याची तयारी आहे. महाराष्ट्रात जन्मलेला माणूस ‘मराठी’ असुनही त्याला केवळ ‘मराठी’ हे ‘प्रांतिय’ लेबल लावलेलं आवडत नाही कारण देशातील इतर कोणत्याही प्रांतापेक्षा […]

मुंबईतली अस्तंगत झालेली ट्राम

आज साठीच्या जवळपासच्या मुंबईकरांना ट्रामचा प्रवास नक्कीच आठवत असेल. मुंबईत घोड्यांची पहिली ट्राम ९ मे १८७४ रोजी आली. तीन आण्यात कुलाबा ते पायधुणी आणि अर्ध्या आण्यात पायधुणी ते बोरीबंदर असा प्रवास करता येत असे. १८९९ सालच्या प्रारंभी ट्रामने एका आण्यात मुंबईत कुठेही जाता येत असे. सहा ते ८ घोड्यांनी ओढली जाणारी ही ट्राम एका तासात सुमारे […]

किल्ल्यातील मुंबई ते किल्ल्याबाहेरील आधुनिक मुंबई

मुंबई शहराबद्दल बरंच काही लिहिलं-बोललं गेलेलं आहे. त्यात आता ही नवी भर कशाला असं वाटणं सहाजिकच आहे. मात्र या लेखमालेत मुंबईच्या इतिहासाच्या काही महत्त्वाच्या टप्प्यांकडे नजर टाकण्याचा एक वेगळा प्रयत्न केला आहे. यामध्ये मुंबईतली दळणवळण साधने, रस्तावाहतूक, ट्राम, रेल्वे, टॅक्सी-रिक्शा यापासून थेट आत्ताच्या मेट्रोच्या होऊ घातलेल्या जाळ्याकडे एक नजर टाकलेय. मुंबईतली घरबांधणी आणि त्यातील स्थित्यंतरे, म्हाडा, […]

गोवा हिंदू असोसिएशन’ निर्मित ‘लेकुरे उदंड जाली’ ची पन्नाशी

३० ऑक्टोबर १९६६ रोजी दि गोवा हिंदू असोसिएशन’ निर्मित, वसंत कानेटकर लिखित व मो. ग. रांगणेकर दिग्दर्शित ‘लेकुरे  उदंड जाली’ या म्युझिकल  नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग मुंबईच्या रवींद्र नाटय़ मंदिरात सादर झाला. या घटनेला ३० ऑक्टोबर रोजी पन्नास वर्षे पूर्ण झाली. मराठी रंगभूमीवरील या आगळ्या नाटकाला संगीत पं. जीतेंद्र अभिषेकी यांनी खूप उत्तम प्रकारे नाटकातील सर्व गाण्यांच्या चाली बांधल्या होत्या. ताल, सूर व शब्द सगळे कसे चपखल बसवले होते. या नाटकातील मुक्तछंदातल्या संवादांना आणि छंदाला प्राधान्य असलेल्या गोव्यातल्या किरिस्तावांच्या तियात्रा या नाट्यप्रकारातल्या […]

सिद्धिविनायकचरणी २ कोटींचे हारतुरे..

निदान सिद्धिविनायक ट्रस्टने अशा प्रकारच्या उधळपट्टीला थारा देऊ नये. “मन्नत” वाल्याला तेच पैसे ट्रस्टच्या माध्यमातून एखाद्या चांगल्या कार्यासाठी देण्याची विनंती करावी. एवढीच गणेशभक्तांची अपेक्षा असणार. किमान तेवढी अपेक्षा ट्रस्टने पुरवावी. अर्थात ट्रस्टने पुरवली नाही तरी बाप्पा ही अपेक्षा नक्कीच पुरवेल. […]

मुंबईतील इतिहासप्रेमी राजभवन

श्रावण कृष्ण षष्ठी अर्थात २३ आॅगस्ट २०१६, वार मंगळवार. संध्याकाळी मला महाराष्ट्र राज्याचे घटनात्मक प्रमुख, म्हणजे माननीय राज्यपाल महाशयांच्या वाळकेश्वरातील ‘राजभवना’ला भेट देण्याची संधी मिळाली. निमित्त होतं राज्यपालांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री. उमेश काशिकर यांची आणि माझी आगाऊ ठरलेली भेट. माझे इतिहासप्रेमी स्नेही श्री. अनिल पाटील यांना सोबत घेतले आणि संध्याकाळी ४ वाजता राजभवनावर थडकलो. सर्व […]

माथेरानच्या राणीच्या निमित्ताने

मुंबई-पुण्याहून माथेरानला पर्यटनासाठी जाणार्‍यांना माथेरानच्या राणीने नेहमीच खुणावले आहे. गेली तब्बल १०९ वर्षे ही राणी दररोज अनेक प्रवाशांना आपल्या कुशीत घेउन माथेरानचा डोंगर चढत-उतरत आहे. दोन-सव्वादोन तासांच्या, २० किलोमीटरच्या प्रवासात गेल्या दोन वर्षात या राणीने जवळपास आठ लाख प्रवासांना माथेरानच्या निसर्गसौंदर्याचे दर्शन घडवले आहे. माथेरान हे ठिकाण पर्यावरणीय पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. या गावात प्रदूषण करणार्‍या […]

काळानुसार बदललेले ठाणे

मला कोणी विचारले की तुझे मुळ गाव कोणते तर सहजपणे माझ्या तोंडातून ठाण्याचेच नाव येते. खरंतर प्रधान कुटुंबीय मूळचे कोकणातले. मात्र आता कोकणात काहीही राहिले नाही. वाडवडिलांनी काही पिढ्यांपूर्वीच कोकण सोडून वेगवेगळ्या ठिकाणी आपले बस्तान बसवले. त्याचप्रमाणे माझ्याही कुटुंवाचे कोकणातून ठाण्याला स्थलांतर झाले मात्र तेही व्हाया गुजरात. माझा जन्म मुंबईतला. अगदी दादरच्या शिवाजी पार्कचा, कारण आजोळ […]

उपनगर नाही.. स्वतंत्र ओळख असलेलं डोंबिवली शहर

डोंबिवली हे शहर खूप पुरातन आहे असे म्हणतात. मात्र इतिहासात तसा डोंबिवली शहराचा फारसा उल्लेख सापडत नाही. इ. स. ८४३ मध्ये कोंकणचे राज्य शिलाहारास मिळाले. शिलाहारांनी पुढील ४५० वर्षे या प्रदेशावे सुखनैव राज्य केले. इ. स. १२६५ च्या सुमारास यादवांनी शिलाहार राजवटीचे उच्चाटन केले. अलाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर यादवांची सत्ता खिळखिळी झाली. त्यानंतर उदयास आलेल्या सुलतानांच्या अंकित […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..