नवीन लेखन...

मराठी संस्कृती विषयक लेख

सीकेपी म्हणजे …..

या एक दोन महिन्यातील वेगवेगळ्या मोर्चांच्या वातावरणामुळे हल्ली लोक खूप चौकशी करू लागलेत हो. म्हणजे,तुम्ही कोणत्या जातीचे, तुम्ही सीकेपी सीकेपी म्हणजे नक्की कोण वगैरे. उत्तरादाखल मी सांगतोच की आम्ही चांद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणजेच सीकेपी. साधारणपणे ठाणे मुंबई बाहेरच्या लोकांना हा प्रश्न पडतो. “अच्छा म्हणजे तुम्ही मच्छी खाणारे ब्राह्मण का ?” हे ऐकून तर मला गंमतच वाटते. […]

भाऊबिज..

आज भाऊबिज. भावाला बहिणीने ओवाळायचा दिवस. आपल्या हिन्दू संस्कृतीत प्रत्येक नात्याची पूजा बांधली आहे..बाकी सर्व सोडा पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ‘धद्या’ची पूजा करून ‘गल्ल्या’चीही कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत मला नाही वाटत अन्य कुठल्या धर्म-पंथात असेल म्हणून..तसंच भाऊबिजेचंही..! भावा-बहिणीच्या नात्यातील प्रेम अधिक गहीरं करणारा हा दिवस मला नाही वाटत अन्य कुठल्या धर्म-पंथात असेल म्हणून..सर्वसंपन्न, सामर्थ्यवान पण ज्याला बहिण […]

भाऊबीज – यमद्वितीया

कार्तिक शुक्ल पक्ष द्वितीया या दिवशी मृत्यूची देवता यम आपल्या बहिणीकडे जेवायला जात असल्याने नरकातील जिवांना या दिवशी नरकयातना भोगाव्या लागत नाही, असे म्हटले जाते. तसेच या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. पुराणकाळापासून चालत आलेल्या या सणाबाबतची शास्त्रीय माहिती या लेखाच्या माध्यमातून करून घेऊया. हा दिवस म्हणजे शरद ऋतुतील कार्तिक मासातील द्वितीया. द्वितीयेचा […]

आज बलिप्रतिपदा म्हणजेच पाडवा

कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो. हा दिवस ‘दिवाळी पाडवा’ म्हणूनही ओळखतात, या दिवशी बळी राजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि ‘इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो’ असे म्हणतात. शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके शेताच्या […]

दिवाळी पाडवा..

दिवाळीचा आजचा दिवस पाडव्याचा.. नविन विक्रमसंवताचा आज आरंभ..कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे पाडवा..प्रतिपदा या शब्दाचं बहुजनांनी केलेलं सुलभीकरण म्हणजे ‘पाडवा’ हा शब्द..’भाद्ररपदा’चं कसं ‘भादवा’ होतं, अगदी तसच..! या दिवसाला ‘बलीप्रतिपदा’ असंही म्हणतात..शेतकऱ्यांचा लोककल्याणकारी आद्य राजा बळी याचं स्मरण करण्याचा दिवाळीतील हा सर्वाधीक महत्वाचा दिवस..याच दिवशी वामनाने बळीला पृथ्वीवरून पाताळात ढकलले अशी पुराण कथा आहे..खरं तर ते एक […]

आकाशदीप

सर्वपित्रीत तृप्त झालेले पितर कोजागिरी ते अष्टमी या काळात पवित्र होऊन कराष्टमीपासून ध्रुवाकडे मार्गस्थ होतात. त्यांना मार्गदर्शनासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून सूर्यास्तानंतर एक प्रहारानंतर ते सुर्योदयापर्यंत घराबाहेर आकाश दिशेने एक तेलदिवा जळता ठेवतात तोच आकाशदीप. पृथ्वीपासून ध्रुवापर्यंतचे अंतर कापायला आत्म्यांना दहा दिवस लागतात. सतत प्रकाशाने त्यांचे मार्गक्रमण सुकर व्हावे यासाठी या दिवसापासून दिपोत्सवास (दिपावली) प्रारंभ होतो.  

काय निवडायचं… फटाके की पुस्तके ?

फटाके मोठा आवाज पुस्तके शांतपणे हळूवार भेटतात. फटाके हवेचं प्रदूषण करतात. पुस्तके वैचारिक प्रदूषण दूर करतात. फटाके अक्षरशः पैसे जाळतात. पुस्तके मात्र पैसे उभे करतात. फटाके लहानग्यांना इजा करतात पुस्तके बाळांना ?छान रमवतात फटाके पक्षीप्राण्यांना घाबरवतात पुस्तके सर्व माहिती पोहोचवतात फटाके कान किर्रर करुन सोडतात. पुस्तके मानसिक समाधान देतात. फटाके माणसाचा अहंकार कुरवाळतात. पुस्तके माणसाला जमिनीवर […]

आज लक्ष्मीपूजन

दिवाळीतील आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो. या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते, असा समज आहे. त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी […]

लक्ष्मीपूजन..

आज दिवाळसणाचा चवथा दिवस. दिवाळीची चवथा दिवस म्हणजे सरत्या विक्रमसंवताचा शेवटचा दिवस.. अश्विन वद्य अमावास्येचा हा दिवस ‘लक्ष्मीपूजना’चा दिवस.. शेतकऱ्याची दौलत, संपत्ती म्हणजे त्याचं गोधन.. कृषीसंस्कृतीतील सर्वात मोठ्या सणाच्या या चवथ्या दिवशी गांवाकडील शेतकरी गोठ्यातील गो-धनाची, शेळ्या-मेंढ्यांचीपुजा केली जाते…तर शहरात पैसा-सोनं-नाणं म्हणजे लक्ष्मी असं आपण मानत असल्याने त्यांची पूजा करतात..व्यापारीजनांचं नववर्ष उद्यापासून सुरू होणार म्हणून पुढील […]

दीपोत्सव

ग्रंथ दर्शन दिवाळी म्हणजे दिव्यांचा-प्रकाशाचा उत्सव! अंधाराकडून प्रकाशाकडे व अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्याची प्रेरणा देणारा दिपोत्सव! हल्लीच्या शिक्षणाने मार्क मिळतात, कधी-कधी नोकरी मिळते त्यातून बऱ्याचदा चांगले पैसेही मिळतात मात्र सन्मानाने व सर्वार्थाने जगण्याचं ज्ञान मिळतंच असं नाही. ते मिळण्याची सोय आणि व्यवस्थाही नाही. म्हणूनच ते ज्ञान आपल्याकडे दुर्मिळही आहे. बऱ्याचदा अज्ञानातच सुखही असतं. किती चांगलं किती वाईट […]

1 49 50 51 52 53 70
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..