मराठी संस्कृती विषयक लेख

घरंदाज वैविध्यपूर्ण गायकी

श्रीमती सुलोचना चव्हाण यांनी आपल्या घरंदाज, वैविध्यपूर्ण गायकीतून मराठी रसिकांवर अनेक दशके पेमाचे अधिराज्य गाजविले आहे. सुलोचनाबाईंना अलिकडेच महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन! […]

धर्म आणि आरोग्य

अश्विन महिन्यातील कृष्ण त्रयोदशी ज्या दिवशी प्रदोषकाल – व्यापिनी असेल त्या दिवसाला धर्मशास्त्राप्रमाणे धनत्रयोदशी म्हटले जाते. […]

दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव

दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे. हा प्रकाशाचा उत्सव साजरा करताना आपण काळोख्या रात्रीला तेजोरत्नांच्या अलंकारांनी सजवतो, नटवितो, शोभायमान करतो. सर्व प्रकारचे अंधार मागे टाकून उज्ज्वल प्रकाशाच्या दिशेने आपले प्रत्येक पाऊल पुढे पडावे, अशी मनोमन इच्छा बाळगून आपण दिवाळीचे स्वागत करूया असे ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी महान्यूजशी बोलतांना सांगितले.
[…]

आली दिवाळी सोनपावलांनी

सोनपावलांनी येणार्‍या दिवाळीतील प्रत्येक दिवसाला सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. धनत्रयोदशीपासून भाऊबीजेपर्यंत प्रत्येक दिवस थाटामाटात साजरा केला जातो. आजकाल केवळ हिदू लोकच नव्हे तर इतर धर्माचे लोकही लक्ष्मीपूजन करतात. हा सण सर्वांना आनंद आणि समृद्धी देणारा ठरतो. दिवाळीशी माझ्याही काही चांगल्या-वाईट आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत. […]

पारंपरिक सृजनोत्सव

अश्विन वद्य त्रयोदशीपासून कार्तिक शुद्ध प्रतिपदेपर्यंत साजरा केला जाणारा आनंदोत्सव म्हणजे दिवाळी. वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज हे दिवाळीचे दिवस असीम आनंदाचे ठरतात. दिवाळीत प्रत्येक दिवसाला आख्यायिकांचा आधार आहे. अमावस्येच्या रात्रीचा अंध:कार दूर सारून प्रकाशाच्या वाटा दाखवणारा हा सण ! या निमित्ताने आयुष्य जगण्याची नवी प्रेरणा मिळते.
[…]

संघटित भावना आणि नगर-संस्कृती

मुंबईमध्ये मराठी विरुद्ध बिगर मराठी आंदोलने होणे हे तसे नवीन नाही. राजकीय लाभासाठी काही तरी भावनात्मक निमित्त शोधण्याचे प्रयत्न राजकारणी करीत असतात आणि मुंबईसारखे महानगर त्यासाठी सुपीक भूमीसारखे असते.
[…]

मराठी आडनावांचे मानसशास्त्र

आडनावाची खरोखर गरज आहे का? आडनावे काय सांगतात? आडनाव सोडले तर काय बिघडते? विवाहानंतर महिलांनी कोणते आडनाव लावावे? सासरचे? की माहेरचे आडनाव सोडूच नये? की सासर-माहेरचे जोड आडनाव धारण करावे?
[…]

ट्रिमेंडस्! फफफफफफफफंटास्टिक! मूर्तिकार मार्व्हलस मूर्तिकार

या मूर्तिकारांना श्री गणपती बाप्पा बनवितांना अनेक अडचणी येत असतात. आजकाल काही कृत्रीम साचे तयार करुन बाप्पांची निर्मिती केली जात असते पण विशालकाय बाप्पांच्या निर्मितीमागचे परिश्रम, ते तयार करतांना त्यांची निर्माण होणारी कल्पकता त्यात ते भरीत असलेले कलात्मक रंग अन् त्यावर फिरणार्‍या हळूवार कुंचब्यांचा अद्भूत अविष्कार हा सर्व विचार मनात आला की या मूर्तिकाराचा खरोखरच खुप अभिमान वाटतो त्यांच्या कल्पक बुध्दीला सॅल्यूट ठोकावा वाटतो. त्यांच्या कलेपूढं नतमस्तक व्हावसं वाटतं मग ती मूर्ति भारताच्या खेड्यातल्या मलकापूर पासून अमेरिकेतल्या न्यूयॉर्कपर्यंत पोहचलेल्या श्री गणेशाच्या मनमोहक मूर्त्या बनविणार्‍या सर्व मूर्तिकारांना ग्रेटच म्हणायला हवं. केवळ निखळ आनंद देण्याशिवाय त्यांच्या या कलेनं दुसरं काहीच दिलं नाही. सो थँक्स् टू ऑल गणपती बाप्पा मेकर्स अॅन्ड हिज आर्टस् !
[…]

जाता गणपतीच्या गावां…

हे गणपतीचे गाव म्हणजे रायगड जिल्ह्यातील पेण होय. मुंबईपासून अंदाजे ९० किलोमीटर व रायगड या जिल्ह्याच्या ठिकाणापासून ४५ किलोमीटरवर असलेल्या या शहराचा उल्लेख करताच आपल्या डोळयासमोर येतात त्या गणपतीच्या सुबक मुर्त्या. त्यांच्या नाविन्यपूर्ण मांडणीमुळे पुणे- मुंबईपासून उर्वरित महाराष्ट्रातही इथल्या मुर्तींना प्रचंड मागणी असते. […]

1 48 49 50 51