नवीन लेखन...

मराठी संस्कृती विषयक लेख

दिव्यांची अमावस्या

दिव्यांच्या या अस्सल मराठी सणाला आपण गटारात नेण्याचे पाप करू नये असे मला वाटते. राजकारणी आणि व्यावसायिक प्रायोजक यांच्या प्रभावाखाली आपण आपल्या सणांचे खूपच विकृतीकरण केले आहे. आपला जुना धर्म आणि त्यामागील नवीन विज्ञान लक्षात घेऊन आपण आपल्याच सणांची विकृत थट्टा टाळायला हवी. […]

वर्‍हाडाची तर्‍हाच न्यारी….

लग्नसोहळा हा सर्वांच्या आवडीचा विषय. नवरदेव, नवरी, करवले, सोकाण्या, करवल्या, वरमाई, वरबाप , वर्हाड, मांडव, बोहला, जानवसा, देवक,अक्षता, परण्या ,आहेर, वरात हे शब्द मध्यमवर्गाच्या लग्नकार्याची साक्ष देणारे. ग्रामजीवनात लग्नपायर्या ठरलेल्या असतात. हळद लावणे, तेल चढवणे, देवाचे दर्शन, मिरवणूक , मंगलाष्टके, आशिर्वाद, सप्तपदी, सूनमुख पाहणे, भोजन,  रंगनाथ दर्शन, नवरी वाटं लावणे, येतीजाती, सोळावा वगैरे. तसेच वाजंत्री, तोफ […]

पंढरीच्या वाटेवर

महाराष्ट्राला वारकरी सांप्रदाय ही खूप मोठी अध्यात्मिक देणगी लाभलेली आहे.त्यातील वारी हा अविभाज्य भाग. दर आषाढ- कार्तिक महिन्यात असंख्य दिंड्या निघतात. पताका खांद्यावर घेऊन , टाळ आणि मृदंगाच्या गजरात ह्या दिंड्या पंढरीकडे आगेकुच करतात. हरिनामाचा घोष होतो. उत्साही वातावरण असते. मजूर, शेतकरी, व्यावसायिक सर्वच स्तरातील माणसं वारीत सहभागी होतात.आनंदाचे डोही, आनंद तरंग ची अनुभुति घेत.मुलांसाठी हा […]

घासावा शब्द.. तासावा शब्द..

संत तुकारामांनी सहज लिहिता लिहिता किती छान लिहून ठेवलेय बघा…. घासावा शब्द | तासावा शब्द | तोलावा शब्द | बोलण्या पूर्वी || शब्द हेचि कातर | शब्द सुईदोरा बेतावेत शब्द | शास्त्राधारे || बोलावे मोजके | नेमके ,खमंग ,खमके | ठेवावे भान | देश ,काळ ,पात्राचे बोलावे बरे | बोलावे खरे | कोणाच्याही मनावर | पाडू […]

श्रद्धा, अंधश्रद्धा आणि ज्योतिषशास्त्र

ज्योतिष ही श्रद्धा की अंधश्रद्धा या विषचाचं चर्वण करून करून चोथा झालाय अगदी. तरी पुन्हा पुन्हा नव्याने हा विषय चर्चिला जातोच. जो विषय चर्चेत असतो, त्या विषयाची लोकांना एकतर आवड असते किंवा नपड तरी असते. दोन्ही संदर्भात चर्चा ही होतेच. परंतू मी थोड्या वेगळ्या दृष्टीकोनातून या विषयांवर बोलणार आहे. लिहीण्याची सुरुवात करण्यापूर्वी मी एक गोष्ट स्पष्ट […]

गुरू….

‘गुरु’चा महिमा जेवढा आपल्या संस्कृतीत सांगीतला गेलाय, तेवढा क्वचितच इतरत्र सांगीतला गेला असावा. “गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णु, गुरुर देवो महेश्वर..गुरुः साक्षात्परब्रह्मा, तस्मै श्री गुरुवे नमः:” हे वचन आपल्या नित्याच्या व नैमितिक म्हणण्यात असतं. ब्रम्हा, विष्णू आणि महेश या विश्वाची उत्पत्ती, पोषण आणि लयाला कारणीभुत असणाऱ्या, उभ्या भारत देशाच्या धार्मिक आणि सांस्कृतीक आस्थेचा भाग असणाऱ्या त्रिमुर्तीची बरोबरी, […]

असे गुरू ! , असेही गुरू !

गुरुपौर्णिमा हा दिवस गुरूपूजेसाठी किंवा गुरूस्मृती जागवण्यासाठी असतो. शतकानुशतकें आपल्या संस्कृतीत गुरूचें महत्व अधोरेखित केलें गेलेलें आहे. […]

पांडुरंग-विठ्ठल

या दोन शब्दांचं अवघ्या महाराष्ट्रावर जी जादू आहे त्याला जगात कुठेच तोड नाही..रावा पासून रंका पर्यंत आणि मुख्यमंत्र्यापासून ते अगदी सामान्य माणसापर्यंत या दोन शब्दांचं आणि त्यावरच्या भक्तीचं गारुड आहे.. शेक्सपिअरने नांवात काय असतं असं म्हटलं होतं. त्यानं असं का म्हटलं, ते मला सांगता येणार नाही पण नांवात बरंच काही असतं हा माझा अनुभव आहे. अन्यथा […]

1 43 44 45 46 47 70
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..