नवीन लेखन...

लोकसंगीताचा अर्क – मांड

डिसेंबर मधील राजस्थानातील गारठवणारी रात्र. अवकाशात फक्त चांदण्यांचा प्रकाश, दूर कुठेतरी, कुणीतरी शेकोटी पेटवलेली दिसते परंतु आसमंत सगळाच काळा/निळा. कुठेच कसल्याच हालचालीची जाणीव नाही की आवाज देखील नाही. वाऱ्याने देखील आपले अस्तित्व लपवून ठेवलेले!! एखाद्या निर्वात पोकळीत फक्त स्वत:चेच अस्तित्व असावे, तरीही आजूबाजूला पसरलेल्या मूक वाळूची तितकीच मूक साथ. अशा वेळी वाळवंट देखील आपल्याशी संवाद साधू […]

दयार्द्र पिलू

“भरुनी राहिलीस तूच माझिया नेत्रांमधुनी        निद्रेमधुनि, स्वप्नामधुनी, जागृतीतुनी कळले आता असून डोळे नव्हती दृष्टी नव्हते दर्शन इतुके आलो जवळ जवळ की जवळपणाचे झाले बंधन” कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या एका अप्रतिम प्रणयी कवितेतील काही ओळी. अर्धोन्मिलित अवस्थेत असताना, निद्रीस्तावस्थेत जाणवणाऱ्या मुग्ध प्रणयाची सुंदर छटा आपल्याला या ओळींतून प्रतीत होते. आदल्या रात्रीच्या जागरणाने डोळ्यांवर गुंगी यावी […]

संयत वेदनेचा मारवा

“तुटते चिंधी जखमेवरची, आणिक उरते संथ चिघळणे “. ही ओळ जेंव्हा आरतीप्रभूंनी लिहिली तेंव्हा त्यांनी  मारवा ऐकला होता की नाही, याची कल्पना नाही. परंतु मारवा रागाचा “स्वभाव” मात्र या ओळीतून चपखलपणे दिसून येतो, हे नक्की. या रागात सुखाची सावली नाही किंवा बरेचवेळा असेच वाटते, काही आशा ठेवायला तरी जागा आहे का? महाभारतातील अश्वत्थाम्याची कपाळावरील चिरंतन जखम […]

पुरिया धनाश्री-संधिप्रकाश

“गाय जशी हंबरते, तसेच व्याकूळ व्हावें बुडतां बुडतां सांजप्रवाही; अलगद भरून यावे.” कवी ग्रेसच्या या अजरामर कवितेच्या ओळी वाचताना, मला नेहमी पुरिया धनाश्री रागाची आठवण येते. तसाच तो संधिप्रकाश, अंधार येत असतो पण प्रकाशाचे अस्तित्व जाणवत असतो. मनात कुठली एखादी आर्त आठवण दाटून येते आणि गळ्यात आवंढा अडकतो. आपल्याला फार एकटे, एकटे वाटत असते आणि त्या […]

विरही बागेश्री

रात्रीच्या शांत समयी, एकांतात भेटलेल्या विरहिणीची तरल मनोवस्था म्हणजे बागेश्री. आपल्या शेजारी बसलेला प्रियकर, साथीला आहे पण तरीही मनात कुठेतरी धडधड होत आहे आणि त्या स्पंदनातून उमटणारी वेदना आणि हुरहूर म्हणजे बागेश्री. बागेश्री रागाच्या या आणि अशा अनेक छटा आपल्याला एकाचवेळी आकर्षित करतात आणि त्याचबरोबर चकित देखील करतात. रागाची मांडणी बघायला  गेल्यास, आरोहात पाच स्वर तर […]

लडिवाळ आणि आर्जवी केदार

सर्वसामान्य माणसाचे आयुष्य तसे सरळसोट असते, खालच्या मानेने आयुष्य व्यतीत करण्याकडे त्याचा अधिककरून कल असतो. शक्यतो विना दैन्य, विना रोष, आणि शक्यतो इतरांशी जमवून घेण्याचा स्वभाव असतो. त्या आयुष्यात येणारी सुख-दु:खे देखील आत्ममश्गुल स्वरुपाची असतात आणि त्याची झळ किंवा प्रसंगोत्पात येणारे आनंदाचे प्रसंग देखील त्याच मर्यादेत बंदिस्त असतात. केदार रागाचा विचार करताना, हेच सूत्र माझ्या मनात […]

वैभवशाली, शांत, निरव…दरबारी

“इश्क मुझ को नहीं वहशत ही सही मेरी वहशत तेरी शोहरत ही सही हम भी दुश्मन तो नहीं हैं अपने गैर को तुझ से मोहब्बत ही सही” मिर्झा गालिब यांच्या एका सुप्रसिद्ध गझलेतील या ओळी म्हटले तर दरबारी रागाची तोंडओळख दाखवतात अन्यथा एका प्रेमी मनाची हैराणी अवस्था दर्शवतात. दरबारी राग हा असाच आहे, एकाच वेळी मानवी भावनांच्या […]

अंतर्मुख शिवरंजनी

क्षितिजावर संध्याकाळची रंगांची उधळण चालू असताना, अचानक एखादा प्रचंड ढग येउन, त्या रंगांची नक्षी पुसून, फिकट राखाडी रंग दिसावा आणि मनात कुठल्यातरी आर्त, हळव्या आठवणींच्या सुट्या आठवणी याव्यात, त्याप्रमाणे शिवरंजनी रागाचे स्वरूप मला वाटते. खरतर याचा पाच स्वरांचा कारभार. भूप रागातील शुध्द गंधार, कोमल केला की लगेच शिवरंजनी राग मिळतो. गमतीचा भाग म्हणजे याही रागात, “मध्यम” […]

आश्वासक जयजयवंती

मुळात भारतीय संगीत हे नेहमी(च) शांतीचा प्रसार करणारे, भक्तिमार्गाकडे नेणारे तसेच मनाचे उन्नयन करणारे आहे. या संगीतात, उथळ वृत्ती, भ्रमर वृत्ती याचा समावेश जवळपास नाही आणि याचा परिणाम असा झाला, भारतीय संगीत हे नेहमीच, लोकानुनयाचा मार्ग न स्वीकारता, काहीसे खडतर पण चिरस्थायी परिणाम देणारे संगीत झाले. खरतर, पहिल्याप्रथम दर्शनी रागदारी संगीत आवडेल, असे काही या संगीतात […]

ऋजू स्वभावाचा बिहाग

खरतर संगीतात अनेक भावना आढळतात पण त्या भावनांचा शास्त्राशी संबंध जोडला तर हाताशी तसे फारसे लागत नाही. काहीवेळा असेच वाटते, केवळ काही स्वरांच्या साद्धर्म्याने विचार केला तर, काही भावना मनाशी येऊ शकतात तरीही, अखेर शास्त्रकाट्यावर तपासणी करता, सूर आणि भावना, याचे नेमके नाते जोडता येत नाही, हेच खरे. मग प्रश्न पडतो, राग आणि समय, किंवा राग […]

1 2 3 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..