नवीन लेखन...

नियमितपणे प्रसिद्ध होणार्‍या मजकूरासाठी खास सदरे

कला

कला या “जनरिक” शब्दात व्यक्तीच्या हातून जन्माला येणाऱ्या – चित्रकला, शिल्पकला, छायाचित्रण अशा मानवी स्पर्शनिर्मित गृहीत असतात तर चित्रपट, नाटक, बॅले या “स्पेशलाइज्ड” आणि सामूहिक कला मानल्या जातात आणि त्यांत मानवेतर घटकांचे (वाद्य, रंगभूषा, प्रकाशयोजना इ) मोठे योगदान असावे लागते. […]

भारतीय रेल्वे आणि संगणकीकरण

भारतीय रेल्वेत संगणकीकरणाने विलक्षण क्रांती घडवून आणलेली आहे. ही प्रगती गेल्या २० ते २५ वर्षांतील असून, रोज ४००० पेक्षा जास्त जागांवरून १५ ते २० लाख तिकिटांचं भारत भरातील ५ ते ६ हजारांपेक्षा जास्त गाड्यांचं आरक्षण केलं जातं. आता ‘इ’ रिझर्व्हेशनमुळे तर हजारो तिकिटं खिडकीशी न जाता आरक्षित करण्याची सोय आहे. रेल्वेच्या या विभागाला पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम […]

जगभरातले काही महाकाय रेल्वे प्रकल्प

१. पेरुव्हियन सेंट्रल रेल्वे (दक्षिण अमेरिका) तिबेटिन रेल्वे बांधण्याआधी जगातील सर्वांत उंचावरील रेल्वेमार्ग म्हणून याची गणना होत असे. अँडीज पर्वतराजीत ४७८२ मीटर उंचीवरील हा रेल्वे मार्ग समुद्रसपाटीपासून सुरू होतो. १२ तासांच्या प्रवासात सहा विभागांमध्ये हवामान बदलत राहतं. सर्वांत उंच भागात प्रवाशांना ऑक्सिजन देण्याची सोय डब्यात करण्यात आली आहे. या रेल्वेमार्गाला ‘ढगांतून जाणारा रेल्वे मार्ग’ म्हणून ओळखलं […]

मुंबई-पुणे: रेल्वे प्रवास

१८५३ मध्ये मुंबई ठाणे रेल्वे सेवा सुरू झाली तरी पुणं गाठणं कठीणच होतं. याचं कारण होतं, मधला अजस्र खंडाळा घाट. त्या काळात बग्गीतून किंवा घोड्यावर बसून मुंबई-पुणे प्रवास ३-४ दिवसांत पुरा केला जाई. सन १८३१ मध्ये मुंबई-पुणे पत्रं पाठविण्याची पोस्टाची सोय होती. या प्रवासास ४८ ते ७२ तास लागत. घोडे व बैलगाड्यांच्या मदतीनं भारतभर पत्रे पाठविण्याची […]

रंगभूमी – जगण्यातील असणे आणि नसणे शोधण्याचे ठिकाण !

सांगलीत अभियांत्रिकी शिक्षणासाठी चार वर्षे होतो,पण रंगभूमी दिनाबद्दल (५ नोव्हेंबर) काहीच माहिती नव्हते.कदाचित तो त्यानंतर साजरा करायला सुरुवात झाली असावी. […]

थोर व्यक्ती आणि रेल्वे

महात्मा गांधींना दक्षिण अफ्रिकेत रेल्वेने प्रवास करत असताना फारच कटू अनुभव आला होता. ते फर्स्ट क्लासच्या डब्यामधून प्रवास करत असताना त्यांच्या डब्यात एक गोरा माणूस चढला. ‘भारतीय काळा माणूस माझ्याबरोबर प्रवास करण्यास धजतोच कसा?’ असं म्हणून गांधीजींना सामानासकट डब्यातून ढकलून देण्यात आलं होतं. या घटनेचे गंभीर पडसाद त्यांच्या पुढील जीवनातील विचारसरणीत पडले. आफ्रिकेतून भारतात परतल्यावर आपला […]

भारतीय रेल्वेचे गाढे अभ्यासक – एस. वेंकटरामन

एस. वेंकटरामन हे नव्वद वर्षांचे गृहस्थ खरे रेल्वेप्रेमी. १९२५ साली वयाच्या आठव्या वर्षी मद्रात ते विजयवाडा असा पहिला रेल्वेप्रवास त्यांनी केला. तेव्हापासून त्यांचं आयुष्य रेल्वेशी जोडलं गेलं आहे. रेल्वेत मटिरियल मॅनेजर म्हणून हुबळी, वाराणसी, अशा विविध गावांत त्यांनी काम केलं. रेल्वेमधून निवृत्त झाल्यावर ‘Indian Railways at a glance’ हे त्यांचं पहिलं पुस्तक प्रसिद्ध झालं. गेली ३० […]

भारतीय रेल्वे- अर्थसंकल्पाचा इतिहास

ब्रिटिशांनी १ ९ ५३ सालात भारतीय रेल्वेची उभारणी सुरू केली , पण ते या प्रकल्पाबद्दल साशंक होते ; कारण जुनी विचारसरणी असलेल्या भारतीय समाजाला हा एक भुताटकीचा प्रयोग आहे असं वाटत होतं . लोकांच्या मनातल्या शंकांचं प्रतिनिधित्व करणारी एक बातमी १८५४ मध्ये एका बंगाली दैनिकात छापून आली होती . ती बातमी अशी होती – ‘ एका […]

रेल्वेविकास – एक आव्हान

भारतीय रेल्वेच्या प्रगतीचा आलेख एका पातळीवर येऊन स्थिरावला आहे . गेल्या ५० वर्षांत रेल्वे – विकास ज्या प्रमाणात अपेक्षित होता तितका अजिबात झालेला नाही . रेल्वे – विकास युद्धपातळीवर पुढे नेण्याची नितांत गरज आहे . ‘ केवळ ५-५० कि.मी. लांबीचे नवीन रेल्वेमार्ग बांधणे , अस्तित्वात असलेल्या मार्गांवर नवीन गाड्या चालू करणे , वातानुकूलित गाड्या व डबे […]

रेल्वे प्रवासाचे नियोजन – भाग ४

भारतीय रेल्वेचं वर्तुळाकार मार्गाचं (सर्क्युलर) तिकीट – एक अनुभव १९५० ते १९६० सालांदरम्यान रेल्वेचं विविध विभागांचं अतिशय स्वस्त असं ‘झोनल तिकीट’ मिळत असे. निरनिराळी गावं त्या तिकिटात समाविष्ट होत व त्याची मुदत अगदी महिनाभर असे. निरनिराळ्या गावांतील नातेवाईक शोधून त्यांच्याकडे मुक्काम ठोकण्याचा हा एक उत्तम मार्ग होता. गमतीने तिकीटधारकाला ‘झोन्या’ म्हणत. ‘झोन्या’ केव्हा दत्त म्हणून समोर […]

1 2 3 4 5 6 141
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..