ब्रिगेडिअर हेमंत महाजन (निवृत्त) यांचे हे सदर अत्यंत लोकप्रिय आहे.

बिगर सरकारी संघटना संशयाच्या घेर्‍यात

गृहमंत्रालयाप्रमाणे भारतात लहान-मोठे २० लाखावर एनजीओ आहेत. गेल्या दहा वर्षांत विदेशातून भारतात येणार्‍या निधीची रक्कम सव्वा लाख कोटी आहे. यात सर्वाधिक वाटा  २० हजार कोटीं अमेरिकेने, आठ हजार कोटी ब्रिटनने दिले आहेत. त्यानंतर नंबर आहे जर्मनीचा. एकूण २५ देश भारतातील एनजीओज्ना नियमित निधी पाठवीत असतात.
[…]

भुतान आणि भारताची बाह्य, अंतर्गत ऊर्जा सुरक्षा

नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत येऊन तीन आठवडे होत आहेत तोच ते स्वतः भूतान दौर्यावर गेले. एवढ्या तातडीने परदेश दौर्यावर जाण्याचे कारण काय? आणि त्यातही त्यांनी भूतानचीच निवड का केली? पंतप्रधानांच्या भूतान दौर्यामागे राष्ट्रहिताची आणि संरक्षणाची महत्त्वाची कारणे आहेत. गेल्या दहा वर्षात आपल्या देशाचे शेजाराच्या देशांशी असलेले संबंध रसातळाला पोहोचले होते. 
[…]

संरक्षण क्षेत्रामध्ये १०० टक्के थेट परकीय गुंतवणुक एक चांगले पाऊल

नरेंद्र मोदी सरकारने नुकतेच संरक्षण क्षेत्रासंदर्भात नवे धोरण जाहीर केले. या धोरणानुसार परदेशी कंपन्या भारतात शस्त्रास्त्र निर्मितीसाठी शंभर टक्के गुंतवणूक करू शकणार आहेत. हे धोरण चांगले आहे की वाईट जाणून घेण्यापूर्वी सध्याची पद्धत काय आहे ती समजून घेणे आवश्यक आहे. सध्या आपण सैन्यासाठी जी शस्त्रास्त्रे वापरत आहोत त्यापैकी ७० टक्के शस्त्रास्त्रे आयात केली जातात. 
[…]

पुस्तक परिचय- आव्हानः जम्मू-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे

कोणकोणते धोके ह्या काळाच्या उदरात दडलेले आहेत? ते प्रत्येक सुजाण नागरिकाने समजून घेण्याची आवश्यकता आहे. मात्र ती माहिती सहजी उपलब्ध असणारी नाही. ब्रिगेडिअर हेमंत महाजन ह्यांनी ह्या पुस्तकाच्या रूपाने ती समोर आणली आहे. काश्मीरची समस्या काय आहे? हे जाणून घेण्याचा सोपा सोपान म्हणजेच, ’आव्हान जम्मू आणि काश्मीर मधील छुप्या युद्धाचे’ हे पुस्तक आहे.
[…]

नेपाळ मधील चीन व पाकिस्तानचे आक्रमण थांबवणे जरुरी

नेपाळ एकमेव हिंदू राष्ट्र आहे आणि विशेषकरून आयएसआय आणि चीन या राष्ट्रावर नजर ठेवून आहेत. नेपाळमध्ये सध्याचे सरकार धर्मनिरपेक्ष पद्धतीने काम करीत आहे. ख्रिश्‍चन व मुस्लिम समाज आपला धर्म व संस्कृतीचा नेपाळमध्ये प्रसार करण्याचा प्रयत्न करीत आहे. काठमांडू ही नेपाळची राजधानी व तिथे आयएसआय सक्रिय आहे.
[…]

भारतातील बांगलादेशी घुसखोरांना शोधणे कठीण

भारतातील बांगलादेशी घुसखोर बेकायदा असूनही ते येथे ‘मतदार’ बनले आहेत, या देशाचे अधिकृत नागरिक झाले आहेत. त्यामुळे त्यांना शोधून काढणे अजिबात कठीण नाही. सरकारने मनापासून ठरविले तर देशात कुठल्याही बिळात लपलेल्या बांगलादेशी घुसखोरांना सहज हुडकून काढू शकते. मात्र केंद्रीय गृह मंत्रालयानेच या घुसखोरांसमोर शेपूट घातले आहे. 
[…]

स्वातंत्र्यानंतरच्या ६६ वर्षानंतरही ७० टक्के शस्त्रास्त्रे परदेशातून आयात

सिप्रीने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार शस्त्रास्त्र आयातीत भारत आघाडीवर असून दुसर्‍या स्थानी चीन आणि तिसर्‍या स्थानी पाकिस्तान आहे, असे म्हटले आहे. अहवालातील ही आकडेवारी बरोबर आहे. यापूर्वी चीनचा क्रमांक शस्त्रास्त्र आयातीत पहिला होता. परंतु चीनने आपल्या शस्त्रास्त्रासंबंधीच्या धोरणात बदल केला.
[…]

माओवाद्यांच्या बीमोडासाठी व्यापक संयुक्त कारवाई जरुरी

केंद्र आणि राज्य सरकारने गुप्तचर यंत्रणा अधिक भक्कम करून जंगलात लपून बसलेल्या माओवाद्यांच्या टोळ्यांचे तळ उद्‌ध्वस्त करायला हवेत. माओवाद्यांचे आव्हान मोडून काढण्यासाठी हवी असलेली राजकीय इच्छाशक्ती केंद्र सरकारकडे नाही,ती येणे आवश्यक आहे. प्रश्न आहे की नेमके काय करायला पाहिजे? 
[…]

काश्मिरी विद्यार्थ्यांवरील राजद्रोहाचा गुन्हा एक योग्य निर्णय

काश्मिरी विद्यार्थ्यांवरील राजद्रोहाचा गुन्हा आणि कारवाई योग्य की अयोग्य यावर वाद सुरू आहे. पाकिस्तानच्या विरोधात जेव्हा सामना असतो, तेव्हा निव्वळ खेळाचा विचार होत नाही; कारण पाकिस्तान हा भारताचा शत्रू आहे. या दोन देशांमध्ये फाळणीचे कटू वास्तव आहे. 
[…]

सरकारकडून ‘वन रँक, वन पेन्शन’ योजनेच्या नावावर संरक्षण दलांची फसवणूक

`लष्करी जवानांच्या प्रश्नांवर सरकार असंवेदनशील आहे. माजी सैनिकांसाठी सरकारने `वन रँक, वन  पेन्शन’ ही योजना सुरू केली. मात्र अद्याप या योजनेची अंमलबजावणी सरकारने केली नाही. या योजनेची अंमलबजावणी न करता सरकारने जवानांच्या भावनांशी खेळ  केला आहे,’ 
[…]

1 20 21 22 23 24 28
error: कॉपी कशाला करता? लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची ? स्वत:च लिहा की....