नवीन लेखन...

व्यसनमुक्ती केंद्रात होणारे नेमके उपचार.. तेथिल वातावरण, बारा गावचे पाणी प्यायलेले बेरकी व्यसनी जेव्हा एकत्र रहातात तेव्हा होणाऱ्या गमती जमती, व्यसनामुळे झालेल्या शारीरिक व मानसिक नुकसानाचे गंभीर स्वरूप, पालकांची दयनिय अवस्था, व व्यसनी व्यक्तीच्या मानसिकतेत बदल घडवत त्याला व्यसनमुक्त करण्याचे केले जाणारे पयत्न हे सारे वास्तव या सदरात मांडले आहे.. व्यसनाच्या वाटेकडे न वळण्यासाठी प्रेरणा, ज्यांनी या वाटेचा प्रवास सुरु केलाय त्यांना सावधगिरीच्या सुचना अन परावृत्त होण्याची मदत तर जे अडकले आहेत त्यांच्या सुटकेचा मार्ग दाखवणारे हे सदर.

तुषार नातू यांच्या “बेवड्याची डायरी” या पुस्तकावर आधारित…

बेवड्याची डायरी – भाग ५ – “ड्रिंक्स” – दारूचे उदात्तीकरण

मी स्वतची ओळख करून देताना नाव.. .गाव ..सांगून झाल्यावर व्यसन कोणते ते सांगताना सरळ सरळ दारू असे न म्हणता ‘ ड्रिंक ‘ असे म्हंटल्यावर सगळेजण का हसले ते मला समजेना ..त्यावर एकजण ‘ कोणते ड्रिंक ? थम्सअप की लिम्का ? असेही ओरडला परत सगळे हसले ..मला कसेतरीच झाले ..परत जागेवर येऊन उभा राहिलो . […]

बेवड्याची डायरी – भाग ४ – कर्कश्य बेल

टर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र ..टर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र ्र्र्र्र्र..कर्कश्य आवाजात तिसर्यांदा बेल वाजली तेव्हा मी वैतागून तोंडावरचे पांघरून काढले अन डोळे उघडले ….आसपास बहुतेक लोक उठलेले होते .मी भिंतीवरच्या घड्याळात पहिले सकाळचे साडेपाच झाले होते ..बापरे इतक्या लवकर उठायचे ? आसपासचे लोक उठून आपापल्या चादरी घडी करण्यात आणि गाद्या गुंडाळून ठेवण्यात गुंग झाले होते ..मी काल रात्री सुमारे आठ वाजता जो गोळ्या […]

बेवड्याची डायरी – भाग ३ – सुटकेसाठी बैचैन

चहा घेऊन झाला तसे मी लघवी ला जाण्यासाठी उठलो तर एकदम अशक्तपणा जाणवला .. तो मघाचा मुलगा लगेच पुढे झाला आणि त्याने माझा हात धरला ..मला ते आवडले नाही ..मी काही लगेच पडणार नव्हतो .मी त्याच्या हातातून हात सोडवून घेतला आणि त्याल सांगितले मला बाथरूम ला जायचे आहे ..त्यावर त्याने सरळ कोपऱ्याकडे बोट दाखवले ..मी सावकाश तिकडे जाऊ लागलो तेव्हा आसपासचे बरेच लोक माझ्याकडे पाहत होते […]

बेवड्याची डायरी – भाग २ – पहिला दिवस व्यसनमुक्ती केंद्रातला

मला कोणीतरी ऑफिस मधून उठवून पलंगावर आणून झोपवले इतके लक्षात आहे फक्त नंतर मला एकदम जाग आली तेव्हा .आजूबाजूला खूप जण इकडे तिकडे फिरताना दिसत होते .मी डोळे चोळले ..आणि जरा डोक्याला ताण दिला तेव्हा लक्षात आले की आपण घरी नसून ‘ मैत्री ‘ व्यसनमुक्ती केंद्रात आहोत ते […]

बेवड्याची डायरी ! – भाग १

समोरच्या खुर्चीत ऐक प्रसन्न चेहऱ्याचा माणूस बसला होता , म्हणजे हे महाशय मला समजावणार तर ? …मी मनातल्या मनात हसलो ..या पूर्वी मला समजवायला आलेल्या अनेक लोकांना मी माझ्या युक्तिवादाने उडवून लावले होते . […]

बेवड्याची डायरी !

एका व्यसनीला व्यसनातून बाहेर पडण्यास इच्छाशक्ती देण्यासाठी नेमके काय उपचार होतात ? याबाबत अनेकांना कुतूहल असते. तसेच व्यसनमुक्ती केंद्राबाबत अनेक गैरसमज देखील असतात ..तेथे मारतात ..टाॅर्चर करतात ..पोटभर जेवण मिळत नाही वगैरे गैरसमज आहेत ..माझ्या ‘ बेवड्याची डायरी ” या लेखमालेत मी आमच्या ‘ मैत्री व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद ‘ नागपूर ..येथे कसे वातावरण असते ..काय काय घडते …कशा गमती जमती तसेच गंभीर घटना घडतात ..याबाबत लिहिले आहे […]

1 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..