नवीन लेखन...

संगीत, छायाचित्रण यासारख्या विविध कलांविषयी लेखन

दादरचा अभूतपूर्व छंदोत्सव

१० आणि ११ मार्चला दादरच्या दादर सार्वजनिक वाचनालयातील ” छंदोत्सव २०१७ ” या विविध छंद जोपासणाऱ्यांच्या छंदांच्या प्रदर्शनाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. होळीच्या  सणाची सुट्टी, दुसऱ्या  शनिवारची सुट्टी , उत्कंठा शिगेला पोचलेल्या उत्तरप्रदेश निकालांची  घोषणा  आणि मुलांच्या परीक्षांचे दिवस यामुळे प्रदर्शनाला कसा प्रतिसाद मिळणार याबद्दल  साशंकता होती. पण उ.प्र. च्या निकालांप्रमाणेच या प्रदर्शनाला छंदप्रेमी प्रेक्षकांनी अतिशय अनपेक्षित  आणि […]

राग मारवा

मारवा राग हा मारवा थाटातून तयार झाला असून हा मारवा थाटाचा आश्रयराग आहे. पंचम स्वर वर्ज असल्याने हा षाडव जातीचा समजतात. याचे रिषभ कोमल, मध्यम तीव्र आणि गंधार, निषाद, हे स्वर शुद्ध आहेत. आरोहाला सुरुवात मंद्र निषादापासून करतात. यात वादी संवादी रिषभ धैवत आहे. वादी संवादी एकमेकांचे मध्यम पंचम असतात, ह्या नियमाला हा राग अपवाद आहे. याचा […]

‘जिंगल म्हणजे नक्की काय?’

‘जिंगल म्हणजे नक्की काय?’ असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. जिंगल म्हणजे जाहिरातीचं गाणं किंवा जाहिरातीकरता बनवलेले संगीत. जिंगलचेही तीन प्रकार असतात. एक म्हणजे नुसतंच गाणं. दुसरा प्रकार- जिंगल कम् स्पॉट. (यामध्ये गाणं आणि निवेदनही असतं. याला ‘व्हॉइस ओव्हर’असं म्हणतात.) आणि तिसरा- नुसतंच पाश्र्वसंगीत व व्हॉइस ओव्हर! ही जिंगल्स दहा सेकंद, वीस सेकंद, तीस सेकंद, चाळीस सेकंद किंवा […]

दिन है सुहाना आज पहेली तारीख है..

आज डिसेंबरची एक तारीख .. दिन है सुहाना आज पहेली तारीख है..’ हे १९५४ साली आलेल्या, ‘पहेली तारीख’ या चित्रपटातील किशोरकुमार यांनी गायलेलं एक अफलातून गाणे, अजूनही रेडिओ सिलोनवर दर महिन्याच्या एक तारखेला सकाळी लागते. पहिल्या तारखेला होणाऱ्या पगाराची किमया सांगणारं, सहा मोठी कडवी असलेलं कदाचित त्याकाळी हे सर्वात मोठं गाणं असावं. दर वर्षी एक जानेवारीला […]

वाद्यांचे स्वभाव

बासरी – चिरकाल प्रेमात असलेली प्रेयसी. कधी नुकतीच प्रेमाशी ओळख झालेली मुग्धा, कधी प्रियकराच्या मीलनासाठी निघालेली अभिसारिका, कधी विरहाने व्याकुळ झालेली विरहिणी तर कधी त्या कृष्णाशी एकरूप झालेली राधा. प्रेमाचे वेगवेगळे आविष्कार. जलतरंग – मूर्तीमंत आशावाद. जीवनरसाने ओथंबलेला. सगळ्यात आनंद शोधून थुई थुई नाचणारा. हा आनंद आणि आशावाद पण दुस-याला सहज लागण करणारा. ह्याच्या सहवासात आल्यावर  […]

शास्त्रीय संगीतातील विविध रागांचे गुण-विशेष

खास संगीतप्रेमींसाठी काही महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती. भारतीत शास्त्रीय संगीतात अनेक राग आहेत. आपण जुन्या गोष्टीमध्ये वाचले आहे की तानसेनने राग गाता गाता पाऊस पाडला वगैरे. अशाच प्रकारे प्रत्येक रागाचे काही खास वैशिष्ट्य आहे. ते पुढे बघूया….. १. राग दुर्गा – आत्मविश्वास वाढविणारा २. राग यमन – कार्यशक्ती वाढवणारा ३. राग देसकार – उत्थान व संतुलन […]

दशावतारी पेन्शन !

एकंदरीतच वृद्धांची अवस्था बघुन मन भरून येते. आपल्या देशात आई-वडिलांना देवासारखा मान दिला जातो. पण काही घरात त्यांना अगदी परक्या सारखी वागणुक दिल्याचे बघुन मन अस्वस्थ होतं. खरच आपण इतके निष्ठूर, बेजबाबदार, असहीस्णू, कठोर, दगडाच्या काळजाचे झालो आहोत का? ज्या आई-वडिलांमुळे देवाने निर्माण केलेले हे सुंदर जग बघण्याचे भाग्य लाभले. तेच आई-वडिल आपल्याला जड व्हावेत यासारखे […]

पार्सल टेप आर्ट

काही कलाकार इतके प्रतिभावंत असतात की त्यांना कला साकारण्यासाठी कोणत्याही माध्यमाचा उपयोग करुन घेता येतो. चित्रकला ही साधारणपणे कागदावर ब्रशने किंवा इतर माध्यमातून रंगरंगोटी करुन साकारली जाते. मात्र ब्रश किंवा रंगाचा वापर न करता एकाद्याने अप्रतिम चित्रे साकारली तर आपण काय म्हणाल? जगावेगळा आणि प्रसिद्धीपासून दूर असलेला मुळचा युक्रेनमध्ये जन्मलेला आणि सध्या अमेरिकेतील फिलाडेल्फियामध्ये वास्तव्याला असलेला […]

1 2 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..