नवीन लेखन...

कृषी, शेतीविषयक माहिती, घडामोडी यावरील लेखन

समृद्ध शेती, श्रीमंत शेतकरी काल, आज आणि उद्या

शेती आणि शेतकरी देशातील सर्वात महत्त्वाचा घटक जो आपणास कधीही उपाशी ठेवत नाही मित्रहो आज आपण भारतीय शेतीचा इतिहास सुरुवात नवनिर्मिती तंत्रज्ञान प्रगती संशोधन उद्योग व्यवसाय निर्यात पर्यटन आणि बरेच काही  या लेखातून आपण चर्चा करूया. […]

कोकणातील बागायती फळ शेती

आम्हाला विकास हवा आहे, पण त्यासाठी मेहनत, पुढाकार, चिकाटी, सहनशीलता या गोष्टीची सुद्धा गरज असते. पण त्या बाबतीत कोकणातला माणूस थोडा कमी पडताना दिसतो. सद्यस्थिती  पाहिल्यास या समूहातील काही उद्योजकांनी काजू प्रक्रिया उद्योगात खूप मोठी भरारी घेतली आहे. यातील काही उद्योजक 2003 साली दिवसाला चाळीस ते पन्नास किलोच्या आसपास काजू बी वर प्रक्रिया करत होते. सद्यस्थिती ते दिवसाला अडीच ते तीन टन काजू बी वर प्रक्रिया करत आहेत. […]

कोकण, नारळ आणि कोकम

कोकण म्हणजे एक अंगठी मानली तर त्यात कोकम म्हणजे माणिक, पाचू म्हणजे हिरवागार निसर्ग आणि नारळ म्हणजे गोमेद अशी तीन रत्न त्यावर जडली आहेत असं म्हणायला हरकत नाही. आहे त्यात भागवण्यापेक्षा जे आहे त्यात साजरं कसं करता येईल असा स्वभाव असणाऱ्या कोकणी माणसाकडे आदरातिथ्य यथायोग्य होतंच. […]

वनस्पतींच्या बीजप्रसाराचे रहस्य

बीजप्रसार: प्राणी जसे त्यांच्या अस्तित्वासाठी व वाढीसाठी अधिवास बदलू शकतात, तसे वनस्पतींना अधिवास बदलता येत नाही. आपला प्रसार बीजांद्वारे व्हावा या उद्देशाने वनस्पती उत्क्रांत झालेल्या आहेत. मात्र अंकुरणासाठी व वाढीसाठी अनुकूल परिस्थिती असेल अशा ठिकाणी त्यांच्या बीजांचे आगमन व्हावे लागते. बीज म्हणजे व्यावहारिक भाषेतील बी. बीज म्हणजे भ्रूण स्वरूपातील वनस्पती असून ती संरक्षक बाह्यकवचाने आच्छादलेली असते. […]

विश्व कीटक भक्षक वनस्पतींचे

विश्व कीटक भक्षी वनस्पतींचे हे शीर्षक वाचून बऱ्याच वाचकांचे डोळे विस्फारतील. त्यांचा विश्वासही बसणार नाही. परंतु वनस्पती जगतात अशाही वनस्पती आहेत. त्यांची ओळख आपण ह्या लेखात करून घेणार आहोत. महाराष्ट्रातही अशा वनस्पती सापडतात. […]

ओळख महाराष्ट्रातील जंगलांची : भाग ७- पानझडी जंगलातील रंगत वाढवणारा – खैर वृक्ष

                                   पानझडी जंगलातील रंगत वाढवणारा – खैर वृक्ष खैर या वृक्षाचे (शास्त्रीय नाव: Acacia catechu, अकॅशिया कॅटिचू; इंग्लिश: Black Catechu (ब्लॅक कॅटिचू), Mimosa catechu (मिमोसा कॅटिचू); संस्कृत – खदिर) हा १५ मी. उंचीपर्यंत वाढणारा पानझडी जंगलातील काटेरी वृक्ष आहे. चीन, […]

ओळख महाराष्ट्रातील जंगलांची : भाग ५ – सदाहरित जंगलातील धन्वंतरी – अर्जुन वृक्ष

हा वृक्ष २५ ते ३० फुट वाढणारा असून तो आकाराने मोठा आहे. उभ्या व लांबट अशा त्याच्या खपल्या पडतात. त्याची पाने ही ऋतूपर्णी, चामड्यासारखी १३ ते २० से.मी. वाटूळकी व देठाकडे निमुळती होणारी असतात. शेंडे पिवळसर असतात. त्याची फळे ही २.५० ते ५ से.मी. लांब चामड्या सारखी जाड पंख, निमुळती व त्यावर आडव्या रेषा व त्याला पंचाकृती आवरण असते. […]

ओळख महाराष्ट्रातील जंगलांची: भाग ६ – संपूर्ण कोकणाला सुंगंधीत करणारा – सुरंगी वृक्ष

सुरंगीचे शास्त्रीय नाव Mammea suriga.हा कॅलोफायलेसी कुळातील वृक्ष आहे. (गोडी उंडी, पुन्नाग; हिं. नागकेसर, सुरंगी; गु. रतिनागकेसर; क. गार्दुंडी, पुने; सं. पुन्नाग, नागकेसर; लॅ. Mammea suriga). सुमारे १२–१८ मी. उंचीचा (घेर साधारण १.८मी.) हा सदापर्णी वृक्ष पश्चिम भारतातील गर्द जंगलांत खंडाळा ते दक्षिणेस मलबार व कोईमतूरपर्यंत (समुद्र सपाटीपासून पासून सु. ६०० मी. उंचीपर्यंत) आढळतो. तो ओडिशा, […]

ओळख महाराष्ट्रातील जंगलांची : भाग ४ – त्रिफळा चूर्णातील महत्वाचा घटक – बेहडा वृक्ष

लहानपणी बेहड्याची फळं दगडाने ठेचायची आणि त्यातील पिवळा गर खायचे मुलांचे उद्योग असायचे. बांधाच्या कडेने असणारे बेहडा खरं तर लक्ष्य वेधून घेणारा वृक्ष कधीच नव्हता. हिवाळा संपून उन्हाळा चालू झाला की यांच्या पिवळसर फुलांची रास झाडाखाली पडलेली दिसते आणि तेवढाच घमघमाट. बेहडा वर्षभर एवढी रूपे बदलतो की प्रत्येक ऋतू मध्ये त्याच्या नव्याने प्रेमात पडावं. लालसर पालवी […]

ओळख महाराष्ट्रातील जंगलांची : भाग ३ – पृथ्वी वरील अमृत वृक्ष हिरडा

पृथ्वी वरील अमृत वृक्ष हिरडा: हिरडा हा पर्णझडी जंगलामध्ये आढळणारा वृक्ष आहे. हा काँब्रेटेसी कुलातील आहे. याचे शास्त्रीय नांव Terminalia chebula आहे. हिमालयाच्या पायथ्यापासून ते दक्षिण भारतातील राज्यापर्यंत ही प्रजाती मुबलक आढळते. बिहार, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, मध्य भारत, महाराष्ट्र इ. ठिकाणी ही वनस्पती आढळते. महाराष्ट्रात कोकण प्रांत, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे, विदर्भ इत्यादी ठिकाणी हा वृक्ष […]

1 2 3 4 16
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..