नवीन लेखन...

दवबिंदुंचा थेंब पाहे

दवबिंदुंचा थेंब पाहे,प्रतिबिंब फुलाचे पाण्यात, पाणी का आरसा आहे, प्रश्न पडे त्यास मनात,–!!! रंग पाहून पाण्याचे, थेंबही भासे कसा रंगीत, विविधढंगी रूप असे, पाहून त्याचा जीव चकित,–!!! फूल कसे निडर असे, रंग त्याचे ना बदलत, पाणीच आपुले रंग बदले, प्रतिमा त्याची हृदयी ठसवत,–!!! आखीव-रेखीव पाकळ्यांचे, बाल- स्वरूप दिसे पाण्यात, थेंबात परागकण मोठाले, सारे थेंबाच्या आत डोकावत,–!!! […]

माझं मैत्र

अरे हे मैत्र मैत्र काय असतं? अरे हे मैत्र मैत्र काय असतं? मैत्रीच्या घट्ट नात्याने जमलेल्या दुधावरची साय असतं तासंतास शाळेच्या आठवणीत रामल्यावर भावनांच्या मंथनातून निघालेलं लोणी असतं अरे हे मैत्र मैत्र काय असतं? बऱ्याच वर्षांनी अचानक शाळेतील क्रश समोर दिसताच हृदयाच्या आतून उमटलेले हाssssय असतं तरीही मनातलं दुःख बाहेर न दाखवता हसून केलेलं हाय असतं अरे हे […]

दवाचा शिंपीत सडा

दवाचा शिंपीत सडा, पहाट उमलत आली, खेळ संपता तमाचा पृथ्वीवर बागडू लागली,–!!! पाने सारी भिजता, झाडांना निराळी टवटवी, रंग उठून दिसता, वाटते विलक्षण तरतरी,–!!! रस्ते थोडे भिजता, अवनीला येई तरारी, येऊ घातला भास्करराजा, आंस तिच्या किती उरी,–!!! भिजत्या भिजत्या पाकळ्या, थेंबांचे डंवरती मोती, रंगीबेरंगी नाना फुलांना, कसा मस्त उठाव देती,–!!! पाकळी – पाकळी फुलता, कळीकळी ओलावली, […]

डोळियांमध्ये किती तरंग

डोळियांमध्ये किती *तरंग*, सुख-दु:खांची प्रतिबिंबे, समाधान,तृप्ती,हर्ष,खेद, आनंद,लोभ,लालस *उधाणे*,–!! आत्मिक भावनांचे किती रंग, प्रेम, भूतदया,शांती,अशी रुपे, बोलकी उदाहरणे कित्येक,–! कधी मात्र असती *नि:स्संग*,–!!! डोळे रडती, डोळे हसती, डोळ्यातूनच उमटे राग, अस्वस्थता जिवाची *काहिली*, *घालमेल* कधी असते उगीच,–!! कधी कामवासना उफाळे, डोळे बोलती, माणसे राक्षस, बरसात करती *संजीवने*, कधी सुखाची ओसंडत *रांस*,–!!! डोळ्यांचे असते *विश्व* निराळे, त्यात माणसांची […]

लेक चालली सासरी

लेक चालली सासरी, डोळ्यांच्या कडा पाणावल्या, आज निघाली आपल्या घरी, तिच्याही पापण्या ओलावल्या,–!! काळीज तिचे *धपापे*, *अंतर्नाद* ऐकू येती, उलघालीचे स्वर *बोलके*, थेट कानास बघा भिडती,–!!! बदलले जीवन सारे, मांडेल नवीन संसारा, मने आमुची *कृतार्थ* झाली, लेक निघता *त्या* घरा,–!!! जावई *समजूतदार* ते, सासू सासरे *सूज्ञ* असती, लेकी सुनांनी घर *भरले*, *एकत्र* कुटुंब म्हटल्यावरती,–!!! माणूस म्हटल्यावर […]

आकाशाशी स्पर्धा करणे

आकाशाशी स्पर्धा करणे, हीच मातीची ओढ असे, खालून मुळ्यांची पेरणी, झाडाझुडपांचा पायाच असे, वाढावे असेच उदंड, खालून वरवर जावे, कितीही वर गेलो तरी, पायाला न कधी विसरावे, गगन विस्तीर्ण भोवती, बुंध्यातून वाढीस लागावे, फांद्या पाने ,फुले यांनी, खोडास सतत बिलगावे, झाड लेकुरवाळे असते, तरी किती निस्संग,—!!! एक निळाई त्याच्या डोळी, दुसरा न कुठला रंग ,–!!! हिरवे […]

या कातरल्या क्षणांना

या कातरल्या क्षणांना, सय तुझी येते,– उन्हाची तप्त काहिली, चटकन् दूर होते, वारा धुंद वाही, ढग जाती प्रवासी, अधूनमधून बिजलीही, उगा आपुले दर्शन देई, अशा वेळी आठवे मज, सोनेरी प्रभेची सांज, याच समुद्रकिनारी, वाजली मिलनाची गाज, नभ सुंदर सोनबावरे, होते भेटीस साक्षी, कूजन करीत बागडती, पक्षी आनंदें वृक्षी, किनारा दूरवर तटस्थ, उभ्याने राखी सागराला, मिलनाची किती […]

मित्रराज उगवताना

मित्रराज उगवताना, सृष्टीवर घडे करामत, आभाळ उतरे जळात, त्याचे रूप दिसे पाण्यात, आरस्पानी निळे सौंदर्य, नजरा खिळवून ठेवी, हलते डोलते आभाळ, पाण्यात प्रतिबिंबित होई, वृक्षांचे समूह किती, धरतीवर कोण पेरती, निळाईत उठून दिसती, पहा,हिरवाईने नटती ,–!! तमाची शामत नसे, हळूहळू तो नाहीसा होई, प्रकाशाचे किरण घेऊनी, दिनकराचा प्रवेश होई,-! अंधारी बुडालेली सृष्टी, रंग तिचा बदलून जाई, […]

शब्द माझा मोगरा

शब्द माझा मोगरा, अन शब्द माझा पिसारा, शब्द माझा बोलका, नि तोच माझा किनारा, तोलतो मापतो,वाटतो, शब्दही सतत ‘झुंज’ देतो, राखतो पूर्ण ताकदही, सत्ताही पालटून देतो,—!!! खेळतो खेळी कल्पनांची, काव्यतुरेही तो खोवतो , राखतो बहुत अंतरे,— नाना जिवांना सांभाळतो,–!!! प्रकटे पण शब्दांतूनही,— कितीक आकसनेमका, तोच कधी जिंकून घेईल, अनेक हृदय संपदा, –!!! वाट दाखवी कधी, वचन […]

लोंबकळलेल्या खाली शेपट्या

लोंबकळलेल्या खाली शेपट्या, पिल्लू मौज करे कशी,–? शोधक बुद्धी, चौकस नजर, अफलातून फळते अशी,–!!! युक्ती,शक्ती, बुद्धी, जिवाला आहे देणगी,—- सदुपयोगाने करा किमया, जगण्यात गंमत मोठी,–!!! दिसे पिल्लू छोटेसे,— तरी मस्त आहे कल्पनाशक्ती, आरामात कसे झोके घेई, दुनियाच भासे त्यास छोटी,—!! डोळे मिचकावत पिल्लू बघते, आजूबाजूच्या साऱ्या सृष्टीकडे, भरभरून लुटेन आनंद मी, सोडवेन अनवट निसर्ग कोडे,-! ©️ […]

1 2 3 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..