नवीन लेखन...

भारतमातेच्या वीरांगना – 15 – झाशीची राणी

सिंहासन हिल उठे राजवंशों ने भृकुटी तानी थी,
बूढ़े भारत में भी आई फिर से नयी जवानी थी,
गुमी हुई आज़ादी की कीमत सबने पहचानी थी,
दूर फिरंगी को करने की सबने मन में ठानी थी।
चमक उठी सन सत्तावन में, वह तलवार पुरानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी॥

– सुभद्रा कुमारी चौहान.

ह्या काव्यपंक्ती प्रत्येकवेळी ती घटना संपूर्ण चित्रपटा समान डोळ्यापुढे उभ्या करतात, असं वाटतं आपणही त्या संग्रामाचा, त्या रक्तरंजित क्रांतीचा एक भाग आहोत. ती बघा, तिकडे दूर, ती आपली राणी आपल्या बछड्याला पाठीशी बांधून रणांगणावर लढते आहे, आपल्या बरोबर आहे, आपणही त्या इतिहासाचे साक्षीदार होतो, त्या भारतातल्या पहिल्या मुक्तीसंग्रामचे.

मनकर्णीका तांबे जन्म १९ नोव्हेंबर १८२८, बनारस. दुसरे बाजीराव पेशवे ज्यांना प्रेमाने ‘छबिली’ म्हणायचे म्हणजेच सुंदरी, प्रसंन्नचित्त, घरच्यांचे लाडाचे नाव ‘मिनू’आणि तमाम भारतीयांचे प्रेरणास्थान झाशी ची राणी -राणी लक्ष्मीबाई. त्या लहानपणापासूनच आपल्या विचारांच्या प्रगल्भतेसाठी, वेगळेपणासाठी आणि ठामपणासाठी ओळखल्या जातात. वडील मोरोपंत तांबे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे सेनापती तर आई भागीरथी बाई उत्तम गृहिणी. मनकर्णिका ४ वर्षाच्या असतांनाच त्यांच्या आईचे देहावसान झाले. मनकर्णिका वडिलांच्या तालमीत मोठ्या झाल्या. त्याकाळच्या मुलींच्या संगोपनाच्या विपरीत त्यांचे संगोपन झाले. तलवार बाजी, नेमबाजी, घोडेस्वारी, मल्लखांब हे त्यांचे खेळ. खोट्या खोट्या लढाया करणे, त्यातून सहीसलामत बाहेर पडणे, शत्रूला चित करणे, शिवाजी महारांच्या गोष्टी वाचणे, गनिमीकावा शिकणे, व्यूहरचना करणे ही त्यांची करमणुकीची साधने. ह्या सगळ्यात त्यांच्याबरोबर त्यांचे बाल सवंगडी होते नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे. मनकर्णिका मोठ्या झाल्या त्या ह्या सगळ्या वातावरणात.

१८४२ साली त्यांचा विवाह गंगाधरराव नेवाळकर ह्यांच्याशी झाला, त्या झाशीच्या राणी, राणी लक्ष्मीबाई झाल्या. राणी लक्ष्मीबाई आई झाल्या, १८५१ साली दामोदर राव जन्माला आले पण विधिलिखित काही और होते, अवघे ४ महिन्यांचे आयुष्यमान त्यांना लाभले. गंगाधर रावांनी आपल्या चुलत भावाच्या मुलाला आनंद रावांना दत्तक घेतले. हा दत्तक सोहळा ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या उपस्थिती झाला आणि ब्रिटिशांना आपले हेतू साध्य करायला कारण मिळाले. गंगाधर रावांनी १८५३ साली इहलोकीची यात्रा संपवली. ब्रिटिशांची वक्रदृष्टी झाशीवर पडली. राणी त्या अतीव दुःखाच्या काळातसुद्धा गरजल्या “मै अपनी झाशी नही दुंगी”.

मे १८५७ ला मेरठ मधून संग्रामला सुरवात झाली. झाशी अजूनतरी शांत होते. राणी लक्ष्मीबाईंनी आपले सैन्य उभे करायला सुरुवात केली. हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करून, स्त्री शक्तीला जागृत केले, त्यांना आणि इतर बांधवांना धैर्य दिले. झाशी सदैव स्वतंत्र राहील ह्याचे आश्वासन सुद्धा दिले. जुनमहिन्यात संग्रामच्या झळा झाशीपर्यंत पोचल्या. आधी शेजारी राज्य ओरछा आणि दातीया राज्याकडून आक्रमण आणि मग ब्रिटिश सैन्याचे आक्रमण. शेजारी राज्यांना पराभूत करून राणी इंग्रजांविरुद्ध च्या लढाईसाठी सज्ज झाल्या. त्यावेळी राणीने आपल्या सैन्याला, लोकांना सांगितले, ‘आपण युद्धाला सज्ज आहोत, जर जिंकलो तर विजयाचा आनंदोत्सव साजरा करू आणि जर हरलो तर आपल्याला आत्मिक आनंद नक्कीच मिळेल की आपण शरणागती पत्करली नाही.’

इंग्रजी सैन्याशी दोन आठवडे सतत लढत सुरू असतांना, इंग्रजांनी झाशी शहर काबीज केले, त्यावेळी झलकारी बाई किल्ल्यात राणी ऐवजी लढत होत्या आणि राणींना दामोदररावांना पाठीवर बांधून किल्ला सोडायची संधी मिळाली, त्या कालपी येथे तात्या टोपे ह्यांना भेटल्या. त्यांनी ग्वालियर कडे कूच केले, तिथल्या सैन्याला जाऊन मिळाल्या. इंग्रजांनी ग्वालियर ला आक्रमण केलेच होते, तीन दिवसांच्या घमासान युद्धा नंतर १८ जून १८५८ साली ह्या रणरागिणीला रणांगणावर वीर मरण आले.

अवघे २९ वर्षाचे आयुष्यमान…..पण एकेक दिवस त्या जगल्या ते परिपूर्ण, आपल्या विचारांवर ठाम,आपल्या कृतीची पूर्ण जवाबदारी, आपल्या देशासाठी अतोनात प्रेम, आपला स्वाभिमान जपत. त्यांच्या व्यक्तिमत्वाची दखल शत्रूनेसुद्धा घेतली. इंग्रज जनरल ह्यूरोझ लिहितात, ‘राणी अतिशय बुद्धिमान, चपळ आणि सुंदर तर होत्याच त्याचबरोबर त्या सगळ्या शत्रूंमध्ये सगळ्यात खतरनाक होत्या’. अश्या रणरागिणीला साष्टांग नमन.

— सोनाली तेलंग.

१८/०६/२०२२

संदर्भ :

१. Rani of Jhansi : Amar chitra katha

२. १८५७ च्या वीर महिला : ह. वा. देशपांडे

३. wikipedia.com

Avatar
About सौ. सोनाली अनिरुद्ध तेलंग 60 Articles
मी सोनाली अनिरुद्ध तेलंग, विज्ञान शाखेत स्नातक आहे. सध्या "conginitive science based brain and skill development for growing child " वर काम करते. मी गेली १०-१२ वर्ष वेगवेगळ्या विषयांवर लिखाण करते. लिखाणाचा रोख मुख्यत्वे मनुष्य स्वभाव, भारतीय संस्कृती ह्यावर असतो. आपले पदार्थ आपल्या पुढच्या पिढीला वारसा हक्कात देण्याची जवाबदारी आपली असते, त्यामुळे मराठी व इतर पाककृती स्वतः करते आणि सगळ्यांबरोबर शेअर करते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..