नवीन लेखन...

भारतमातेच्या वीरांगना – 13 – कमलादेवी चटोपाध्याय

स्वातंत्र्यपूर्व काळात किव्हा स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या कामातून, आपल्या विचारातून, आपल्या लेखणीतून आपले राष्ट्रप्रेम सातत्याने उजागर केले, अशी स्त्री वीरांगना श्रीमती कमलादेवी चटोपाध्याय. सगळ्यांच लढायला मैदानात लढायच्या नसतात, तर काही सामाजिक कामातून राष्ट्र उत्थान, आपल्या समाजाचा उत्कर्ष सतत साधायचा असतो, ह्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्रीमती कमलादेवी चटोपाध्याय.

मंगोलर ला एका सारस्वत ब्राम्हण कुटुंबात जन्माला आलेल्या कमलादेवी ह्या ४थ्या आपत्य. अतिशय सुसंस्कृत घरात आणि विचारांनी प्रगल्भ वातावरणात त्यांचे लहानपण गेले. वडील अनंथ धारेश्वर हे तेव्हाचे डिस्ट्रिक्ट कलेक्टर होते आणि आई गिरीजाबाई अतिशय विद्वान होत्या. त्यांची आजीपण अभ्यासक होत्या आणि स्वतःचे ठाम विचारांच्या पुरस्करत्या होत्या. कमलादेवी ह्या दोघींच्या सावलीत मोठी झाल्या पण त्यांनी स्वतःच्या विचारांचे महत्व अगदी लहानपणापासूनच जाणले आणि त्यावर काम सुद्धा केले. त्यांचे आई-वडील आणि त्यांचा मित्र परिवार म्हणजे महादेव गोविंद रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, रमाबाई रानडे, ऍनी बेसंट अश्या सगळ्यांनी सवतंत्र्याचे संस्कार अगदी लहानपणापासूनच कमलादेवींवर केले. कमलादेवी स्वदेशी चळवळीची कार्यकर्ती झाल्या.

दुःखाचे डोंगर त्या परिवार कोसळला, जेव्हा त्यांची मोठी बहिणी ज्यांना त्या स्वतःच्या नायक मानायच्या ‘सगुणा’ ह्यांचा मृत्यू झाला. कमलादेवींच्या वयाच्या ७व्या वर्षीच त्यांच्या वडिलांचे छत्र सुद्धा हरवले. त्यांची सगळी संपत्ती वडिलांच्या सावत्र भावाने लुबाडली आणि एकेकाळी ऐश्वर्यात नांदणाऱ्या कमलादेवी, त्यांच्या आई आणि इतर बहिणीबरोबर दारिद्र्याची पाहुणी झाल्या. वयाच्या १४ व्या वर्षी लग्न झालं आणि दोनच वर्षात वैधव्य आलं. बंड वृत्ती परिस्थितीने जन्माला घातली असल्याने, वयाच्या २०व्या वर्षी कमलादेवी ह्या विधवेने पुनर्विवाह केला, हरींद्रनाथ चटोपाध्याय ह्यांच्याशी आणि कमलादेवी चटोपाध्याय झाल्या. लग्नानंतर त्यांनी आपलं वातस्तव्य लंडन येथे केले. बेडफोर्ड युनिव्हर्सिटीतून समाजशास्त्रात शिक्षण प्राप्त केलं. इकडे भारतात महात्माजींनी non-cooperation Movement सुरू केली आणि कमलादेवी भारतात आल्या. सेवा दलाची सेविका कमलादेवी लवकरच महिला आघाडीच्या प्रमुख झाल्या. भारतभर महिलांना स्वातंत्र्य लढ्यासाठी तयार करणं, त्यांना प्रत्यक्ष सहभागी करून घेणं, त्यांचे प्रशिक्षण करणं हे सगळं त्या करू लागल्या. भारतातील निवडणूक लढविणारी पहिली महिला ठरल्या. अश्या बऱ्याच बाबतीत त्या पहिल्या ठरल्या. All India Women’s Conference च्या founder member आणि सचिव झाल्या. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी ह्या संस्थेचे काम पूर्ण भारतभर वाढविले. त्यामार्फत, महिला संचलित महिला शिक्षण संस्था, सामाजिक कल्याणासाठी अनेक कार्यक्रम, सामाजिक सुधारणा ह्यासाठी अथक प्रयत्न केले. Lady Irwin Collage for Home Science हे त्यावेळचे अद्वितीय कॉलेज ह्याचीही स्थापना त्यांनी केली.

१९३० साली गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला त्यात जे ७ प्रमुख होते त्यातील एक कमलादेवी होत्या आणि दुसऱ्या स्त्री म्हणजे अवंतीकाबाई गोखले. कमलादेवी मुंबईतील हाय कोर्टात पोचल्या की आत्ताच तयार केलं गेलेलं सत्याग्रह मीठ जज साहेब घेतील का? २६जानेवारी १९३० ला झालेल्या गदारोळात आपल्या जीवापेक्षा आपल्या तिरंग्याला जपण्याऱ्या कमलादेवी चटोपाध्याय सगळ्यांच्याच लक्षात राहिल्या.

दुसऱ्या विश्व युद्धाच्या दरम्यान कमलादेवी इंग्लड मध्ये होत्या. ह्या आपत्कालीन स्थितीला त्यांनी भारताचे पारतंत्र्य सगळ्या जगासमोर मांडण्यासाठी प्रवास केला. भारताचे स्वातंत्र्य फाळणीच्या दरीत दुभंगले. कमलादेवी आता निर्वासित भारतीयांसाठी झटू लागल्या. तेव्हाचे पंतप्रधान श्री जवाहरलाल नेहरू ह्यांनी, राज्य सरकारची कुठल्याच प्रकारची मदत घेणार नाही, या अटीवर अनिच्छेने त्यांना परवानगी दिली. दिल्ली जवळील फरीदाबाद ५०००० निर्वासितांसाठी कमलादेवींनी अथक परिश्रम करून वसवले. केवळ त्यांना वसवले नाही तर त्यांच्या पोटा-पाण्यासाठी त्यांना वेग-वेगळे प्रशिक्षण दिले आणि त्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था केली. त्यांच्या आयुष्याचा आता उद्देश बदलला, भारतीय कला, हस्तकला ह्यांना अबाधित ठेवणे, त्यांचे पुनरुत्थान करणे. त्यासाठी त्यांनी भारतभर विविध संग्रहालय काढलीत. कलेला व्यवसायच्या दृष्टिकोनातून न बघता त्याची साधना व्हावी अशी त्यांची धारणा होती. All India Handicraft Board ची स्थापना त्यासाठीच त्यांनी केली. National School Of Drama आणि Sangeet Natak Academy ह्याची स्थापना त्यांनीच केली.

त्यांना भारत सरकारने पद्म भूषण (१९५५), आणि पद्म विभूषण (१९८७) देऊन सन्मानित केले. १९६६ चा रमोन मॅगसेसे पुरस्कार त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी मिळाला तर त्याचबरोबर UNESCO आणि शांतिनिकेतन ने सुद्धा त्यांना सन्मानित केले.

२९ ऑक्टोबर १९८८ साली वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांना देवाज्ञा झाली. आपल्या काळाच्या कितीतरी पुढे राहून, आपल्या देशासाठी झटणाऱ्या, आपल्या देशाची संस्कृती जपणाऱ्या अशा वीरांगानेला आमच्या आठवणींचे पुष्पसुमन.

||वंदे मातरम्||

— सोनाली तेलंग.

१६/०६/२०२२

संदर्भ :

१. देसीकोत्तमा कमलादेवी चटोपाध्यय : अपर्णा केळकर

२. Wikipedia.com

http://xn--g4b.amritmahotsav.com/

Avatar
About सौ. सोनाली अनिरुद्ध तेलंग 60 Articles
मी सोनाली अनिरुद्ध तेलंग, विज्ञान शाखेत स्नातक आहे. सध्या "conginitive science based brain and skill development for growing child " वर काम करते. मी गेली १०-१२ वर्ष वेगवेगळ्या विषयांवर लिखाण करते. लिखाणाचा रोख मुख्यत्वे मनुष्य स्वभाव, भारतीय संस्कृती ह्यावर असतो. आपले पदार्थ आपल्या पुढच्या पिढीला वारसा हक्कात देण्याची जवाबदारी आपली असते, त्यामुळे मराठी व इतर पाककृती स्वतः करते आणि सगळ्यांबरोबर शेअर करते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..